मुझको बाकी रहने दे..!

Submitted by शिवाजी उमाजी on 23 July, 2017 - 07:12

मुझको बाकी रहने दे..!

'कितना और बदलूँ खुद को,जीने के लिए ऐ ज़िन्दगी...मुझमें थोडा सा तो...मुझको बाकी रहने दे..!'
वाँट्स अँप वर मित्राने पाठवलेला एक शेर, त्याने त्याच्या मित्रांकडून ऐकलेला...कदाचित त्याच्या मित्रांचा जीवनानुभव असावा...

खरचं तर आहे, ते काय आपण काय किती जगतो स्वतःसाठी? आपण सारेच धावत आहोत केवळ जगतांना लागणा-या गरजा पुर्ण करण्यासाठी (ज्या कधीच पुर्ण होत नाहीत) आणि स्वतःला विसरून जातो. उरतो फक्त रोबोट भावना नसलेला.
लहाणपण शाळेत, टयुशन क्लासेस मध्ये हरवतं, तारूण्य देतं थोडी झिंग पण काहि काळ.... नोकरी लागली, लग्न झालं कि बाँस, प्रोजेक्ट, मिटींगा, सासु-सासरे, नातेवाईक तीचे व आपले सुध्दा, मुलं यात गुरफटत असतो... अन् उतरत जाते ती झिंग, नशा, तरीही जगत असतो पण मन हरवुन, जबरदस्तीने. एखादया रविवारी विचार करतो कि झोपावं निवांत आज, नेमक तेव्हा ती म्हणते "अरे जरा चिंटूचा प्रोजेक्ट करून दे, उदया हवाय त्याला", झालं मन मारून उठायच, प्रोजेक्टला झटायचं।

असच "अन् प्रिडीक्टेड", "अन् प्रोजेक्टेड" आयुष्य आपलं, सतत काही तरी नवं घडतच असतं, स्वतःसाठी किती जगतोय? काय काय राहीलय करायचं? याचा विचार करतो आपण? इथ मला व.पु.चे शब्द आठवतात "एकदा कधीतरी शांत बसावं, आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्यात याचा आढावा घ्यवा, मग लक्षात येतं गाभोळलेली चिंच अनेक वर्ष खाल्लेली नाही, जत्रेत मिळणारी पत्र्याची शिटी वाजवलेली नाही, चटक्यांच्या बिया घासुन चटके दयावेत असं वाटत नाही, कारण परीस्थितीने दिलेलेच चटके सोसतांना पुरेवाट झालेली आहे ......"
थोडासा वेळ स्वतःसाठी ठेवायला हवा, तसा मिळतो वेळ कधी कधी प्रवासात एकटं असतांना, मग डोळे मिटुन बोलु लागतो स्वतःशी आपण, ब-याच गोष्टी आठवतात... स्वतःशीच हसतो आपण, हळुच जाणिव होते आजुबाजुच्या लोकांची आणि आपण परत जागेवर सावरून बसतो.
तसचं कधी कधी डोळे मिटुन शांत बसायचं, असं काही नाही कि नामस्मरण वा जप केलाच पाहीजे फक्त बसायच, आपल मुल्य मापण आपणच करायचं. निदान "जगलेल्या क्षणांचा" हिशोब लक्षात येईल, नवा जोम, उत्साह येईल आणि पुन्हा नव्या प्रवासाला हुरूप येईल.

स्वतःतल्या स्वतःतासाठी जगण्यासाठी एवढं पुरेस आहे, समर्थांनी म्हटलेलच आहे कि...
"जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तुच शोधोनि पाहे।।मनालाच सांगतात तु विचारी आहेस, तुच शोध कोण सुखी आहे ते? हया प्रश्नाचं उत्तर त्या शांत, एकांती डोळे मिटलेल्या अल्प वेळात मिळते.

© शिवाजी सांगळे, मो.+91 9545976589

Group content visibility: 
Use group defaults

छान झालाय लेख, आज जगणं एवढ धकाधकीच झालंय कि मनासारखं काही करायला वेळ आणि इच्छा हि नसते इतके आपण गुंतून गेलेलो असतो .