आर के फॅन क्लब - जग्गा जासूस !

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 July, 2017 - 16:07

मी रणबीरच्या तीन वेळा प्रेमात पडलोय!

तसे आवडीचे चित्रपट कैक आहेत, उल्लेखून सांगायचे झाल्यास वेक अप सिद आणि रॉकेटसिंग मध्ये तो भावलेला, पण जे चित्रपट बघताना ‘ईटस रणबीर कपूर शो’ असे जे काही फिलींग आले ते मोजून तीनदा! १...अजब प्रेम की गजब कहाणी २...बर्फी आणि ३... जग्गा जासूस... आणि या तिघांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. पहिल्यात रणबीरचा बोलायचा प्रॉब्लेम दाखवला आहे. जेव्हा तो दुखी होतो, त्याच्या तोंडातून शब्द फुटायचे बंद होतात, अडखळत बाहेर येतात. दुसर्‍यात तो मुका आणि बहिरा दाखवला आहे. आणि या तिसर्‍या जग्गा जासूस मध्ये पुन्हा एकदा तोतरा दाखवला आहे., पण तिघांमधील जे कॅरेक्टर आहे ते मात्र एकूणच भिन्न आहेत, आणि तिन्हीमध्ये त्याने आपल्या अदाकारीने जबरदस्त जान आणलीय.

चित्रपट वेगळाच आहे जग्गा जासूस. कोणाला झेपणार नाही, तर कोणाला प्रचंड आवडेल, तर कोण एक वेगळा प्रयोग म्हणून स्वागत करेन. पण या सर्वात एक गोष्ट कॉमन असेल, रणबीरचे कौतुक मात्र एकूण एकाने केलेच पाहिजे. दिग्दर्शक, कोरीओग्राफर, सिनेमॅटोग्राफर यांच्या टिमने चित्रपट सजवायला आणि आकर्षक करायला प्रचंड मेहनत घेतली असली तरी अख्ख्या बॉलीवूडमध्ये रणबीरशिवाय आणखी कोणाला घेत असे कॉमिक व्यक्तीमत्व उभारणे शक्यच नव्हते. खरे तर असा नेहमीच्या पठडीपेक्षा वेगळा चित्रपट पाहिल्यानंतर आणि तो आवडल्यानंतर देखील चित्रपटावर बोलावेसे लिहावेसे वाटण्याऐवजी रणबीरवरच बोलावेसे वाटतेय आणि त्याच्यावरच लिहावेसे वाटतेय यातच सारे आले....

ज्या कोणाला रणबीर आवडत असेल तर तो का आवडतो. किती आवडतो. आणि कश्याकश्यात आवडला याची, आणि फक्त त्याच्याच चित्रपटांची चर्चा करायला हा फक्त त्याचाच फॅन क्लब..

माझ्यापुरते सांगायचे झाल्यास, मला काही आवडत असेल तर तो त्याचा सरस असा मुद्राअभिनय. त्याच्या दिसण्यातील एक्स फॅक्टर जो प्रत्येक कपूर घेऊनच पैदा होत असावा. सोबत असलेली निरागसता जी तो थेट राजकपूरकडून घेऊन आला असावा. त्याच्यातील एनर्जी जी शम्मी कपूरने त्याला बहाल केली असावी. त्याची स्वत:ची शैली सांगणारा उत्स्फुर्त आणि उत्कृष्ट नाच. आणि या चित्रपटात त्याच्या नाचात काही ठिकाणी मला चक्क किशोरकुमार सुद्धा दिसला. तेच ते आपले, खुदकन हसवणारे वेडे चाळे... पण या सर्वातही एक गोष्ट जी मला प्रत्येक आवडीच्या कलाकारात बघायला आवडते ती म्हणजे त्याचे जमिनीवर असलेले पाय. मला आठवतेय त्याची एक मुलाखत जेव्हा त्याला सुपर्रस्टार असे संबोधले गेले, तेव्हा त्याने या उपाधीला विनम्रपणे नकार दिला, आणि म्हणाला, "अगर मै सुपर्रस्टार हू तो उस लिहाज से तिन्हो खानोंको भगवान कहना होगा" .... पण प्रत्यक्षात एखादा अक्षयकुमार वा एखादा रणवीरसिंग या खान सुपर्रस्टारशी स्पर्धा करत असेल, पण रणबीर कपूरने मात्र स्वत:ची वेगळी जागा बनवली आहे.. बॉलीवूडमध्येही, आणि माझ्यासारख्या चाहत्यांच्या मनातही Happy

आणि हा आजच्या दिवसातला आवडलेला बेस्ट पार्ट.. रणबीर जग्गाची हेअर स्टाईल !
असेना कुठूनही कॉपी...
पण उद्या ब्रश करतो, आणि आंघोळ न करता पहिले आधी एखादा न्हावी गाठतो Happy

jagga jasoos.jpeg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला रणबीर इतका आवडत नाही पण त्याचे काही सिनेमे खुप आवडतात...अजब प्रेम की गजब कहाणी,वेक अप सिद परत ये जवानी है दिवानी, बचना ए हसिनो आवडलेले सिनेमे...

फेन क्लब बंद झाला का?
>>>>
एखादा खान आवडतो हे कबूल करणे तुलनेत सोपे आहे, एखादा कपूर आवडतो हे कबूल करणे किंचित अवघड. त्यामुळे ईथे ब्रेक ब्रेक लागत पोस्ट येतील.

क्वाण्टीटी जास्त असून काय कामाची..
एक काळ होता जेव्हा युसुफ खान सारख्या अभिनेत्याला आपले आडनाव बदलून कुमार करावे लागायचे.
आता मात्र खान हे नावच एक ब्रांड झाले आहे. थॅण्क्स टू शाहरूख आणि काही प्रमाणात आमीर सलमान.

मला आवडलेला त्याचा सर्वात बेस्ट सिनेमा म्हणजे "ए दिल है मुश्किल" त्या सिनेमात त्याने इतका भारी इमोश्नल पर्फारमन्स दिले आहेत की क्या बात है इसपेशली त्याचे ते डोळे भयंकर आवडतात मला.

रणबीर मलाही खूप आवडतो.. दिसतो तर मस्तच, स्पेशली त्याचे डोळे..
वेक अप सिड आणि तमाशा ( काही प्रमाणात राॅकस्टार.. पहिले पाहिला तेव्हा झेपलाच नाही म्हणून समजला पण नाही.. आता थोडासा कळलाय)
तिन्ही पिक्चरमधलं त्याचं काम अफलातून!!!

रॉकस्टार, संजू, बर्फी, रॉकेट मे पॉकेट सिंग, अजब प्यार की गजब कहाणी, छान वेगवेगळ्या आणि गोड भुमिका आहेत.

मला शाहरुख अजिबात आवडत नाही हे नक्की.
>>>

यात वाईट वाटण्यासारखे काही नाहीये Happy
लोकांच्या तो एकतर प्रचंड आवडीचा असतो वा थेट नावडीचा असतो. अधले मधले काही नसते..

एक सहज आठवले.
मागे एका मुलाखतीत रणबीरला विचारलेले की तू स्वत:ला या जनरेशनचा सुपर्रस्टार समजतोस का?
त्यावर त्याने छान उत्तर दिले,
म्हणाला, अगर मै सुपर्रस्टार हू तो फिर शाहरूख खान भगवान हो गया Happy

#RK_SRK