" दूध "

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 19 July, 2017 - 11:23

कुणी दूध वा साय निवडतो
मी तिसरा पर्याय निवडतो

निवड करा तुमचीच तुम्ही पण
बघू नका मी काय निवडतो

लाख मराठे दिसल्यावरती
मी केवळ शिवराय निवडतो

प्रधान तर व्हायचेच आहे
धंद्यासाठी चाय निवडतो

नव्या दमाचा इंग्रज आहे
नव्या दमाची टाय निवडतो

त्यांचा दाउद त्यांचा डॅडी
मीही " छोटा " भाय निवडतो

जिवंत तर लाथाडुन देती
मी दगडाचे पाय निवडतो

सोमवार आल्यावर कैलास
ओम नम: शीवाय निवडतो

-डॉ. कैलास गायकवाड

Group content visibility: 
Use group defaults