महावितरण वीजबिलाचा झोल

Submitted by मार्मिक गोडसे on 19 July, 2017 - 04:48

जून महिन्यात महावितरणच्या सगळ्याच ग्राहकांची वीजबिलं नेहमीपेक्षा अधिक आल्याची तक्रार होती. जे ग्राहक तक्रार करायला गेले त्यांना उन्हाळ्यात पंख्यामुळे बिल जास्त येते असं कारण सांगितले. मी बिल नीट बघितले तर आमचे बिल १ महिन्याचे नसून १.३ महिन्याचे होते. म्हणजे ९ दिवस उशीरा मिटर रिडींग घेतले होते, त्यामुळे अधिक युनिट पडल्याने बिलही जास्त आले होते . बाबा तक्रार करायला महावितरणच्या कार्यालयात गेले, तेथील अधिकार्‍याने उशीरा रिडींग घेतल्याचे मान्य केले. पुढील महीन्यात ८-९ दिवस आधी रिडींग घेतले जाईल ,त्यामुळे पुढचे बिल कमी येईल. खरोखरच पुढील महिन्याचे बिल ०.७३ महिन्याचे म्हणजे २२ दिवसाचे आले , बिल कमी आल्याचे समाधान वाटले. वरवर पाहता ह्यात आपले काही नुकसान झाले नाही असं वाटेल, परंतू प्रत्यक्षात महावितरणने ग्राहकांच्या खिशातून पैसे चोरले आहेत.

ज्या ग्राहकांचा नेहमी महिन्याचा वीज वापर १०० किंवा वरील स्लॅबच्या आत असेल त्यांचे रिडींग १.३ महिन्याने घेतल्याने काही युनिट वरच्या स्लॅबमध्ये गेल्याने तितक्या युनिटला अधिक दर लागल्याने त्या ग्राहकाला नाहक भुर्दंड पडला. पुढील महिन्यात लवकर रिडींग घेतले तरी त्या ग्राहकाला त्याचा काहीही फायदा झाला नाही,कारण जरी एक महिन्यानी रिडींग घेतले असते तरी त्याचा वीज वापर ठरावीक स्लॅबच्या आतच आला असता. ह्याला महावितरणची छुपी भाववाढ म्हणायचे काय?

वीजबिलातील 'आकार' हे नक्की काय असतात हे कळतच नाही. नोव्हें.१६पर्यंत वीजबिलात स्थिर आकार, वीज आकार, वीज शुल्क व इंधन समयोजन आकार ह्यांचा समावेश होता. डिसें.१६ पासून त्यात वहन आकाराची भर पडली.वीज आकार स्थिर ठेवले जातात व बाकीचे आकार वाढवून वीज ग्राहकांची लूट केली जाते. स्थिर आकार एक वर्षात २०% ने वाढला. ग्राहकाला बुचकाळयात टाकणार्‍या ह्या आकारांची खरोखरच आवश्यकता आहे का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या सोसायटीत प्री पेड मिटर आहे विजेचे. आपला ग्राहक क्रमांक टाकला की ऑनलाईन रिचार्ज करता येते.
ते झाले की आपल्याला २१ आकडी काही ओळी मिळतात टोकन च्या स्वरूपात. त्या मीटर मध्ये विशिष्ट पद्धतीने फिड केल्या की झाले मीटर रिचार्ज.
माझा महिन्याचा विजेचा खर्च फारतर ३०० रुपये डोक्यावरून पाणी.
(गिझर, इस्त्री, मावे, टिव्हि, म्युझिक सिस्टिम, मिक्सर, लॅपटॉप सर्व वापरते...
आणि हो पंखे सुद्धा Proud

अरेच्चा! अगदी सेम टू सेम अनुभव...

मी ह्या नवीन घरात मागच्या म्हणजे मे महिन्याच्या एक तारखेला आलो. नवीनच फ्लॅट असल्याने मीटरवर झिरो रिडिंग होते. पहिल्या महिन्यात आम्हाला ७८ युनिटचे ३५१ रुपये बिल आले.. आता जूनचे बिल आले आहे तब्बल 939.34 रुपये. युनिट कन्झम्प्शन आहे १३१ युनिट्स... आम्हीही चक्रावलोय.

आणी तुम्ही म्हणताय ते १०० च्या वर युनिट गेले की दुप्पट दर होतो... आमचे ७८ युनिटमध्ये हे जास्तीचे ५० युनिट घालून महावितरणने लूट केली आहे असे दिसते. यावर काय उपाय करावा? कारण ही अगदी कायदेशीर लूट आहे, त्याविरुद्ध तक्रार कशी करावी?

हो अगदी बरोबर आहे,
आम्ही तर १ आठवडा गावी गेलेलो, तरी बिल खूप जास्त आले.

बिल रेट्स MERC रिव्हाइज करते ,,, ते वितरक कंपनीच्या हातात नसतं..
आता MERC मधे घोळ असु शकतो ती वेगळी गोष्ट
मल्टिइयर टॅरिफठरतो.. आणि वेगवेगळ्या कारणानी तो मधे आधे रिव्हाइज पण होतो..

आता तुम्ही सांगितल्या प्रमाणे जर मुद्दाम उशिरा मिटर रिडिंग्ला लोक पाठवत असतिल तर ती फसवणुक आहे..
एखाद्या वेळी असं घडु शकत पण सतत असं करत असतिल तर तक्रार करा

कस्ट्मर केअर सेंटर .. टोल फ्रि नंबर किंवा डायरेक्ट त्यांच्या ऑफिस मधे जाउन.. त्यांच्या वेब्साईट वर.. एमई आर सी च्या वेब्साइट वर पण सांगु शकतो..
ऑफिस मधे जाणे बर्यापैकी बरा मार्ग

उन्हाळ्यात ४० किंवा अधिक दिवसांचं तर हिवाळा आणि पावसाळ्यात २२ दिवसांचं रिडींग घेणं ही महावितरणची जुनी सवय आहे. आधीच एसी / फॅनमूळे उन्हाळ्यात युनिट वाढलेले असतात त्यात अजुन ही वाढीवर रेट्सची भर. बिल चांगलंच वाढलेलं दिसतं.

किती छान दक्षिणा,
असे प्रीपेड मीटर कळवा ला मिळतील का? आमचे बिल कायम हजाराच्या पटीत असते, घरात दिवसभर मी, आई नि माझी दोन छोटी मुलंच असतो. नवरोजी म्हणतात वीज खाता की काय? Angry

अरे आमच्याकडे उलटी परिस्थिती आहे. (आमचं वीजबील दरमहा ₹1200 ते 1500.)
आमचं जून महिन्याचं वीजबील फक्त ₹190 आलं. ते भरायचं राहून गेलं. ते या महिन्याच्या वीजबीलात अॅड होऊन या महिन्याचं वीजबील
₹ 252 आलंय. म्हणजे या महिन्याचं बील फक्त ₹60.??? एवढं कमी बील बघून मला कैतरी झोल असल्याचं सतत फिलिंग येतय. Proud
नाहीतर पुढच्या महिन्याचं बील भरमसाठ यायचं म्हणून टेंशन पण आलंय. Uhoh

ऑफिस मधे जाणे बर्यापैकी बरा मार्ग <<< अतिशय थंड प्रतिसाद असतो ऑफिसमध्ये. जास्तीचा चिवटपणा सोबत घेऊन जावे.

Ok जुन महिन्यात सगळी कडे लफडे झालेले दिसतायत,
माझ्या पाहण्यात 2 घरी 21हजार आणि 25 हजार बिल आलय गेल्या महिन्याचे,
पैकी 21 हजार वाले 45 दिवस US ला गेलेले मुलीकडे.

आमचे बिल पण कायम 1800 ते 2000 च्या घरात येतंय. दर महिन्याला बिल आलं की "अरेच्चा इतकं कसं काय येतंय जाऊन बघायला पाहिजे !" एवढे एक वाक्य बोलून सगळे आपापल्या कामात बिझी Lol

त्या महावीतरणाकडे जाऊन तक्रार करायला कधी मुहूर्त लागतोय बघायचे.

रच्याकने: एक प्रश्न आहे, जिथे inverter बसवला आहे तिथे ते सारखं उठसुठ चार्ज होत असल्याने बिल जास्त येते का ?
आमच्या जुन्या घरी इतके बिल कधीच यायचे नाही. नवीन ठिकाणी खूप येत आहे. सगळी उपकरणे अलमोस्ट तेवढीच आणि तीच आहेत. फरक फक्त इन्व्हर्टरचा आहे. पण बिलात अलमोस्ट 150 ते 200% वाढ आहे.

अरेच्चा इतकं कसं काय येतंय जाऊन बघायला पाहिजे !" एवढे एक वाक्य बोलून सगळे आपापल्या कामात बिझी Lol

आमच्या घरी अगदी हीच परिस्थिती आहे. Happy

आमच्याकडेही ह्या वेळी हेच झालंय - नेहमी जास्तीत जास्त १०० युनिट्स होतात. जून च्या बिलात (९ जून ते १० जुलै) ७२५ युनिट्स!! साडेआठ हजार वगैरे आलंय बिल.

अतरंगी आमच्या घरी आहे इन्वर्टर. बिल थोडं जास्त येतंच. जुनं घर आहे. बहुतेक सगळं वायरिंग नवीन आहेच पण. ७ फॅन्स आणि १२/१५ दिवे आहेत (बहुतेक सगळे एल.ई.डी). डबल डोअर फ्रीज, एक लॅपी, एक काँप्युटर, मावे, टिवी. एसी नाही.
हे सगळं वापरून १०००/- रुपये अ‍ॅव्हरेज बिल आहे.

आणि इथे पुण्यात नवा कोरा फ्लॅट आहे. ५ फॅन्स आणि ७/८ दिवे. मोठा फ्रिज मात्र आहे. सगळे एल.ई.डी. उन्हाळ्यात छोटा कूलर वापरतो. तरीही बिल ११००/- येतंय गेले २/३ महिने. नेहेमी ४००/४५० येतं...

हायला,
इतके कमी ? आमच्याकडे 3 फॅन, 5 ट्यूब, फ्रीज, मिक्सर, वायफाय, लॅपटॉप, मोबाईल चार्जिंग, दिवसातून अर्धा ते एक तास टीव्ही, गिझर, आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वॉशिंग मशीन. तरी बिल 1500 ते 1800 कमीत कमी येतं. जास्त म्हणजे 2000 ते 2100.

आता मात्र मला खरेच जायला हवे mseb मध्ये.

आता मात्र मला खरेच जायला हवे mseb मध्ये.
तुमचा mseb वर भरोसा हाय काय? माझा नाय हाय. तुमाचाही नसेल तर घरच्या घरी आपले वीजमिटर तपासू शकता.
शक्यतो घरी एकटे असताना केलं तर अधिक चांगले. प्रथम घरातील सगळी विद्युत उपकरणे बंद करा व आपल्या मिटर चे रिडिंग घ्या. घरात 100 watt चा एक बल्ब १० तास चालू ठेवा . १० तासात मिटरचे रिडिंग 1 ने वाढले असल्यास आपले मिटर योग्य आहे असे समजावे.

इंटरेस्टिंग पद्धत आहे जास्त

इंटरेस्टिंग पद्धत आहे जास्त पैसे घ्यायची Lol
३० पेक्षा जास्त दिवस झाले तर स्लॅबस पण त्या वाढीव दिवसांच्या पटीत बदलल्या पाहिजेत. programmer च्या आळसाचा फायदा उठवतायत.

@ मार्मिक गोडसे, १० तासात मिटरचे रिडिंग 1 ने वाढले असल्यास आपले मिटर योग्य आहे असे समजावे. >>> कल्पना छान आहे. मीटरवर अपूर्णांकसुद्धा दिसत असल्याने बल्ब एक तास पेटवूनसुध्दा तपासणी करता येईल, होय ना!!?

अपूर्णांकात दिसत असेल तर १० तासाच्या रिडींगमुळे अधिक अचुकता येईल. ०.९ किंवा त्यापेक्षा कमी रिडींग आल्यास मिटर स्लो आहे हे कळेल, १ पेक्षा अधिक रिडींग आल्यास मिटर किती फास्ट आहे हे अचूकपणे कळेल

Ok

आम्ही कोपुला रहात असतानाचा एक किस्सा आठवला Lol
आमच्या शेजार्‍यांच्या नातेवाईकांकडे घरगुती गिरणी होती, थोडं फार कमवायचे त्यातून. पण एकदा एका महिन्यात त्यांना १०,००० बिल आले, चरफडत विजेच्या कार्यालयात गेले आणि तक्रार दिली मग ते सॉल्व्ह झालं त्या महिन्यापुरतं, पण नेक्स्ट मन्थ मध्ये परत १०,००० बिल.. घरगुती गिरणीचे बिल इतके येत नाही. तो माणूस इतका चिडला की त्याने जवळ पडलेली एक वीट विजेच्या मिटरवर फेकून मारली जोरात.
नेक्स्ट मन्थ त्यांचं बिल जितकं यायला हवं त्यापेक्षाही कितीतरी कमी आलं होतं Rofl

हे युनिट्सची स्लॅब आपल्या फायद्याप्रमाणे वापरणे सगळेच करतात बहुतेक.
टाटा पॉवरचे पण Metered Units 85, Billed Units 93. साधारण १०% वाढीव धरतात असे दिसले. ११३ Metered Units असतील तर १२४ Billed Units. त्यात १०% वाढीत स्लॅब बदलली तर अजून फायदा. असे का विचारले तर समाधानकारक उत्तर नाही. पाठपुरावा केला पाहिजे.

या महिन्यात १२१३ बिल झाले. ऑनलाईन बिल भरण्याच्या २ एजन्सी / गेटवे आहेत. एकात ( TechProcess) बिलाची बाकी असलेले रक्कम null येते आहे आणि दुसर्‍यात ( BillDesk) २०३९. १५ दिवस झाले तक्रार करून, अजून त्यांचा टेक्निकल प्रॉब्लेम संपत नाहीये.

आता म्हणतात २०३९ वाल्या गेटवेतून बिल भरा. मग मी विचारले की BillDesk वर २०३९ outstanding दाखवते आहे.
त्यापैकी खरे बिल १२१३ जर मी भरले, तर ते पार्ट पेमेंट समजून उरलेल्या ८०० रूपयांसाठी तुम्ही तगादा लावणार नाही कशावरून.
तसे तुमच्या अधिकृत ईमेल किंवा पत्राद्वारे मला आधी लिहून द्या मग मी BillDesk वर बिल भरते. तर बोलती बंद.

बाकी -- तुमचा कॉल आमच्यासाठी महत्त्वाचा आहे; तुमच्या पेशंसबद्दल तुमचे कौतुक; आम्हाला सेवेची संधी दिल्याबद्दल धन्यावाद ..... या सगळ्यासाठी ई-कानफटात मारायची सोय कुठल्या अ‍ॅपमध्ये सुरू झाली तर मी वाट बघतेय...

आमच्याकडे पण खूप येतं बिल. दर महिन्याला वापर तेवढाच असून १४०० ते २००० मध्ये फिरत असतं ! आम्हीही असंच बघायला पाहिजे म्हणत सोडून देतोय. पंखा, दिवा जेमतेम एक दोन खोल्यातला चालू, ते सुद्धा रोजच्यारोज नाही कारण पश्चिमेचं ऊन पडत नसल्याने घर अजिबात तापत नाही. एसी नाही, वॉ म रोज एक लोड, मा वे फक्त पदार्थ गरम करण्यासाठी. गिझर प्रत्येकी एक बादली ( तीन लोक )
आमच्या सोसायटीत ऑन अ‍ॅन अ‍ॅव्हरेज प्रत्येकाचंच बिल जास्त साईडलाच येतंय आणि काहीतरी गडबड आहे ह्यावर चर्चा झडत असतात पण सगळेच सोडून देतायंत Proud