तुम्ही आपल्या मुलांना शिक्षण का देता?

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 July, 2017 - 13:20

तुम्ही आपल्या मुलांना शिक्षण का देता?

मुलांना एक उत्तम मनुष्य बनवायला?
त्यांच्या व्यक्तीमत्वाचा सर्वांगीण विकास घडवायला?
त्यांना देशाचा (किंवा समाजाचा) एक आदर्श नागरीक बनवायला?
की त्यांच्यावर पैश्याची गुंतवणूक करून पैसे कमवायला?

>>>>>
धागा सुचायला संदर्भ हायझेनबर्ग यांची माझ्या खालील धाग्यावर आलेली शिक्षण आणि जुगाराची तुलना करणारी पोस्ट -

>>>>>>

http://www.maayboli.com/node/63125?page=2

>>>>>>>>

एक सोपे ऊदाहरण देतो, समजा तुम्ही वडिलांकडून १लाख रुपये घेवून तुमच्या शिक्षणा वर लावले, मग कॉलेज बंक करून, कमीत कमी अभ्यास करून लाखातले ८० हजार वाया घालवले, मग पास होण्यासाठी क्लासेस लावून अजून ५० हजार लावले, वर जाण्या येण्याच्या खर्चाला, चहा पाण्याला, बिडी सिगरेटला, शाहरूख स्व्पनिल ला अजून २० हजार लावले, गर्लफ्रेंडवर अजून ३० हजार लावले अशी चार पाच वर्षानंतर अंदाजे ५ लाख लावल्यानंतर डिग्री मिळाली, मग मह्त्प्रयासाने नोकरी मिळाली आणि तुम्ही वर्षाला कसे बसे १-२ लाख रुपये कमवू लागलात.

ह्या ऊलट एखाद्या जुगार्‍याने वडिलांकडून १ लाख रुपये घेवून एका दिवसात १ का ५ करत ५ लाख केले तर सांगा बरं हुशार कोण ठरला?

पास होऊ की नाही, झालो तर डिग्री मिळेल की नाही, मिळाली तर नोकरी मिळेल की नाही, मिळाली तर टिकेल की नाही, टिकली तर खर्च भागेल की नाही, भागला तर सेविंग होईल की नाही एवढे सगळे ऑड्स असतांनाही तुम्ही शिक्षणावर पैसे लावले मग आता सांगा बरं बेटिंग कोण करतंय?
जुगार/बेटिंग मध्ये मॅथेमॅटिकल फॉर्म्युला वापरून आपले ऑड्स तरी माहित करून घेता येतात पण ह्या तुमच्या आंधळ्या बेटिंगचे काय?

>>>>>>>>>>

माझे मत -

शिक्षणाकडे आर्थिक स्थैर्य मिळवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणून बघण्यात काहीही गैर नाही. मात्र जेव्हा शिक्षणाची तुलना जुगाराशी होत आपण किती गुंतवले आणि आपल्याला किती रिटर्न्स मिळाले असा हिशोब आपण करू लागतो तेव्हा मात्र खरेच मनात शंकेची पाल चुकचुकते.

जेव्हा आपण आपल्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करताना ते त्याचा पैश्यात किती परतावा करतील असा विचार करू लागतो तेव्हा आपण त्यांच्याकडून साहजिकपणे अपेक्षाही तश्याच ठेवू लागतो. मग आपल्या मुलाने नेहमी वर्गात पहिले पाचातच राहायला हवे. मग आपल्या मुलाने सर्वाधिक परतावा मिळेल अशीच शिक्षणाची शाखा निवडायला हवी.

ज्यांनी थ्री ईडियटस पाहिला असेल त्यांना वेगळे काही सांगायला नकोच, पण जर आपल्या आवडीचा एखादा जॉब जो आपल्या छण्दाशी रिलेट होतोय तो आपल्या मुलांना कमी पैसे देत असेल तर त्यांनी तो न करता आपण त्यांच्या शिक्षणावर केलेली गुण्तवणूक वसूल करणारे क्षेत्र निवडावे ही जबरदस्ती देखील मग सहजच होते.

शिक्षण आपल्याला ज्ञान देते. जसे चांगले विचार आपले आयुष्य समृद्ध करतात तसे शिक्षण घेण्यामागचा हेतूही ज्ञान प्राप्त करून आपले आयुष्य समृद्ध करणे असावा. त्यानुसार आपली आवड बघून शिक्षण घ्यावे. त्यानंतर मग आपण घेतलेल्या शिक्षणाचा समाजासाठी आणि अर्थातच स्वत:साठीही कसा वापर होईल हे बघावे.

स्त्रीशिक्षण ही आपल्या देशासमोर एक समस्या आहे. याचे कारणही हा पैश्याची गुण्तवणूक हाच विचार आहे. मुली तर शिक्षण घेऊन चूल आणि मूलच सांभाळणार, तर मग त्यांना शिक्षण का द्या? किंवा मग मुलींच्या शिक्षणावर खर्च आपण करणार आणि तिचा पगार मात्र सासरच्या घरात जाणार. मग कोणी सांगितलेय मुलींना शिकवायला? आणि मग आपल्याला मुलगीच नको जी आपली गुण्तवणूक वायाच घालवणार आहे..

मला कल्पना आहे की हायझेनबर्ग यांनी वरची पोस्ट सिरीअसली लिहिली नसावी आणि मला प्रतिवाद म्हणून गंमतीत लिहिली असावी.
मात्र मला हा विषय सिरीअस वाटला. कारण समाजात बरेच जण असा विचार करणारे खरेच असू शकतात. नव्हे असतीलच. त्या धाग्यावर जुगाराला मी विरोध करतोय ते येणारी पिढीची उर्जा चुकीच्या मार्गाला लागू नये. आपला देश बदलतोय. आणि या देशाची ताकद आहे भावी पिढी. आणि त्यांचे सर्वात मोठे हत्यार आहे शिक्षण. पण तेच घेण्याचा उद्देश चुकत असेल तर मात्र ....
चूक भूल माफ !
पण तो विषय तिथेच थांबवून तातडीने हा धागा काढावा लागला.. काही चुकत असेल तर जरूर सांगा __/\__

आपलाच,

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुढेमागे माबो वर धागे काढायला पैसे द्यावे लागले तरीसुद्धा रुनमेश असे "दुसर्या कुठल्यातरी धाग्यातल्या तिसर्या कुठल्यातरी प्रतिसादां वरुन" सुचलेला धागा काढेल का ?
><>>
जर असे पैसे द्यावे लागले तर त्या खाली आलेल्या प्रतिसादांच्या संख्येनुसार पैसेही मिळतील ना?

असो,
हा आपला माझ्या धाग्यावरच्या एका प्रतिसादावर आलेला प्रतिसाद -
"फार फार हसले."
हिच माझी आजची कमाई Happy

माझ्या मुलांना तर मि नक्किच मराठी किंवा सेमि-मराठी शाळेत टाकेल....

???
कमी खर्चिक म्हणून ??

पॉईण्ट चांगला आहे. तसेही मुले शाळेत जाऊन काय करतात.. मग ती ईंग्लिश असो वा मराठी काय फरक पडतोय Happy

शिक्षणाची तुलना जुगाराशी.

आयुष्यातल्या सर्वच गोष्टी जुगार खेळण्यासारख्या असतात! शिक्षण, त्यातहि कुठल्या विषयाचे, कुठल्या कॉलेजात? नंतर नोकरी किंवा व्यवसाय. कसला व्यवसाय, कुठे. नोकरी सुद्धा कुठे?
लग्न? नवीन घर घेणे, मायबोलीवर आपली मते स्पष्ट मांडणे, सगळे जुगारच हो.
जुगार हाच एक व्यवसाय बालकांपासून वृद्धावस्थेपर्यंत लोक करत असतात, नावे वेगळी वेगळी!
म्हणजे कसे, यातच तुम्हाला जवळपास पाच सहा धाग्यांना विषय मिळेल.
मग त्या निरनिराळ्या जुगारांची आपआपसात तुलना असे धागे.
मज्जाच मज्जा.

तुम्ही आपल्या मुलांना शिक्षण का देता?>>>>
१. त्यांनी मोठे होउन रिअअ‍ॅलिटी शो बघावेत (बिग बॉस आणि तत्सम) आणि आपण इतकी वर्ष शिक्षणात का वाया घालवली असा विचार करावा म्हणुन ,
२.दाक्षिण्यात सिनेमे बघुन फिजिक्स बिजिक्स काही नसतं असा विचार करावा म्हणुन, (पाहा तो शिनेमा ज्यात एक माकड थर्माकोल चे हृदय बनवतो आणि ते OT बेड वर झोपलेल्या पेशंटच्या छातित अपोआप जाउन बसत)
३.पुढेमागे त्यांनी जेन्यु / एफ्टिआय त अ‍ॅडमिशन घेउन बापाने भरलेला टॅक्स वसुल करावा म्हणुन,
४. माबोवर येउन हे असले जिलब्या लेख वाचावेत म्हणुन.
५.स्वकमाईचे पैसे खानावळ आणी इ लोक्सानी बनवलेले तद्दन फा सिनेमावर खर्च करावेत म्हनुन,
ताक. म्या हा लेख वाचलेला नाय, हेडींग वाचुन उत्तर देत हाय.

म्या हा लेख वाचलेला नाय, हेडींग वाचुन उत्तर देत हाय.

>>>>>>

ओके Happy

शीर्षकातच विषय कमीत कमी शब्दात स्पष्ट केला असल्याने लेख वाचण्याची फारशी गरजही नव्हतीच.

शीर्षकातच विषय कमीत कमी शब्दात स्पष्ट केला असल्याने लेख वाचण्याची फारशी गरजही नव्हतीच.
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 21 July, 2017 - 12:26

मग आता ठरले. ऋ भाऊ आता फक्त शिर्षक लिहीणार बाकी लेख लिहायची गरज नाही. आणि आपण शिर्षकाला शिर्षक जिलब्या पाडू.

Pages