Submitted by प्रकाश साळवी on 18 July, 2017 - 05:24
एक सुंदर गझल "चामर वृत्त " मात्रा २३
मूक प्रीती
का प्रेम आपले हृदयी कवटाळीले ?
का अबोलपणाचे शल्य तु सांभाळीले ?
होती मनी प्रीत परी का न तू बोलली
परी ना त्याचे का काटे तु कुरवाळीले
होता एकदा शिंपडून गेला मोगरा
सुगंधाने पण नाही तुला गंधाळीले
आले कसे नाही मेघ एकदा भरोनि ?
त्या भिजल्या क्षणांना तु का न कवटाळीले ?
शोधला नाही कधी गंध तु कस्तुरीचा
नाही कधी प्रेम आपुले जुळवाळीले
श्री. प्रकाश साळवी दि. २१ मे २०१४.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा