काव्य-झुरळे एक मंथन

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
Time to
read
1’

(होळीचे औचित्य साधून,गुलमोहरावरील एक नव कवी तुषार शिंतोडे ह्यांची एक ज्वलंत कविता (म्हणजे ज्वलंत प्रतिसाद मिळवणारी कविता ) फॉलो करण्याचा एक प्रयत्न. ह्या प्रयत्नांमागे कुणालाही दुखावण्याचा किंवा सुखावण्याचा कुठलाही अंत्यस्थ (का अस्वस्थ) हेतू नाही. कृपया हलक्याने घ्यावे. )
------------------------------------------------------------------------------------
आम्ही टीकांना भीत नाही धमक्यांना घाबरत नाही
करतो कवने आम्ही होई समीकक्षकांचा हिरमोड होई
.
राज्याभिषेक झाला सिंहासनावर बसलो आम्ही
पर त्यातही दुर्दैव हे आमुचे सिंहासन कमोड निघाला
.
ते पोर गुळांबी , जणू रानतल अळंबी
मन मह्ये बोन्साय हे खुळांबी झाले
.
छळ छळ छळीता काव्य धारा गळीता
जणू तमाखू मळीता होय भुई थोडी पळीता
.
थांब ना वासू जरा थांब ना वासू
अरे अश्या कविता पाडणे गून्हा आहे
आज जरी तुला टाळल तरी
भोग हा माझ्या नशीबी पून्हा आहे.
.
श्री तुषार शिंतोडे
(नवकविंच्या भय कवितांमधून एक झलक. मूळ संग्रह गेल्या होळीत भस्मसात Sad )
------------------------------------------------------------------------------------ प्रतीक्रीया :
.
दूतोंडी ११ मार्च २००९ - ०७-२६
वा वा सुरेख कविता. दिवसाची आल्हाददायी सुरूवात
.
सुकांता ११ मार्च २००९ - ०७-३२
खासच. विशेषत: २ आणि ४ फारच आवडल
.
गणपुले ११ मार्च २००९ - ०७-४२
एक प्रामाणिक प्रयत्न Happy
.
तिरसट ११ मार्च २००९ - ०७-४९
एक तर सकाळी सकाळी बस चुकली आणि त्याय आयला हे असल दळभद्री काव्य वाचायला लागतय
.
बाष्कळ ११ मार्च २००९ - ०७-५७
प्रयत्न चांगलाय. पण तरीही मला कवितेच अधिक विवेचन करुन घ्यायला आवडेल
उदा: राज्याभिषेक झाला सिंहासनावर बसलो आम्ही
पर त्यातही दुर्दैव हे आमुचे सिंहासन कमोड निघाला >>>>
ह्यात कवी स्वत: सिंहसनावर बसतो इतरांना तुच्छ लेखतो असा अर्थ अभिप्रेत आहे. पण केवळ ओळी मीटर मध्ये बसण्या साठी कवीने स्वत : कमोड वर बसावे हे पटत नाही
तसेच ...
आम्ही टीकांना भीत नाही धमक्यांना घाबरत नाही
करतो कवने आम्ही होई समीकक्षकांचा हिरमोड होई>>>
'समीकक्षकांचा' हा शब्द विशेष आवडला.
.
डांबरट ११ मार्च २००९ - ०८-३३
ह्यात कवी स्वत: सिंहसनावर बसतो इतरांना तुच्छ लेखतो असा अर्थ अभिप्रेत आहे. पण केवळ ओळी मीटर मध्ये बसण्या साठी कवीने स्वत : कमोड वर बसावे हे पटत नाही >>>>>> Rofl
.
पळसुले ११ मार्च २००९ - ०८-४८
एक प्रामाणिक प्रयत्न Happy
.
डांबरट ११ मार्च २००९ - ०८-५७
अहो गणपुले/ पळसुले : नाव बदलत किमान पक्षी प्रतिसाद तरी बदला Rofl
.
हिरवा ११ मार्च २००९ - ०९-३७
मला कविता बिलकूल पचली नाही. प्रयत्न तोकडा पडलाय Sad Light 1
.
मानसकन्या ११ मार्च २००९ - ०९-५१
अय्या. ते दिवा चिन्ह कस द्यायच कळेल का ?
.
मी मराठी, तू मराठी ? ११ मार्च २००९ - १०-१२
अहो मानसकन्या 'दिवा' चिन्ह देण्यासाठी ह्या पानाच्या तळाशी मदत सूची आहे त्याचा लाभ घ्या. किंवा ': दिवा :' अस मोकळी जागा न सोडता लिहा.
मला २ कडव हे बिलकूल आवडल नाहीये. विशेषतः 'कमोड' हा शब्द खटकला. त्या ऐवजी 'परस' हा शब्द वापरला असता तर कविता अधिक मराठी झाली असती. अर्थात हे माझ स्वतःच वैयक्तीक मत झाल.
.
डांबरट ११ मार्च २००९ - ११-०७
हे माझ स्वतःच वैयक्तीक मत झाल >>>> Lol
.
मी मराठी, तू मराठी ? ११ मार्च २००९ - ११-३७
डांबरट : दूसर्‍याचे प्रतिसाद डकवून त्यावर हास्य करण्यापेक्षा स्वतःची बुद्द्धी वापरून काहीतरी लिहा Angry
.
डांबरट ११ मार्च २००९ - ११-४४
अहो 'परस' काय किंवा 'कमोड' काय भावना समजून घ्या ना Rofl
.
मानसकन्या ११ मार्च २००९ - ११-५७
Rofl
Lol
Light 1
अय्या. कधी पासून प्रयत्न करतेय चिन्ह द्यायचा आत्ता कुठेशी जमतय . Proud
.
तुषार शिंतोडे ११ मार्च २००९ - १२-००
आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.
माझ्या पुढच्या काव्य झुरळात मी अधिक काटेकोर प्रयत्न करेन
.
दूतोंडी ११ मार्च २००९ - १२-०२
प्रयत्न फसलाय
.
डांबरट ११ मार्च २००९ - १२-२६
माझ्या पुढच्या काव्य झुरळात मी अधिक काटेकोर प्रयत्न करेन >>>>
अरे बापरे
------------------------------------------------------------------------------------चु भू द्या घ्या

विषय: 
प्रकार: 

वरच्या प्रतिसादांपैकी कुठला प्रतिसाद कॉपी पेस्ट करावा याचा विचार करतेय. Proud
Lol आवडले केदार हे झुरळ मंथन.

Lol

प्रतिसाद too good. आवडले. खासच आहे.

Rofl
Rofl
Rofl

Proud Rofl

Proud
केदार दिवसाचा झकास शेवट.

आम्ही टीकांना भीत नाही धमक्यांना घाबरत नाही
करतो कवने आम्ही होई समीकक्षकांचा हिरमोड होई>>> दोन वेळा होई वापरल्यामुळे समिकक्षकांना अगदी 'टुक टुक' केल्यासारखं वाटतंय. एकदाच लिहिलं असतं तर नुसतं 'टुक' वाटलं असतं .. ते मला व्याकरणदृष्ट्या चुकीचं वाटलं असतं.

राज्याभिषेक झाला सिंहासनावर बसलो आम्ही
पर त्यातही दुर्दैव हे आमुचे सिंहासन कमोड निघाला>> इथे निघाला च्या ऐवजी 'झाला' हा शब्द घातल्यास कविचे आणि कवितेचे सामर्थ्य त्यातून प्रतित होईल असं वाटतंय.

तुझ्या कवितेवरुन मला 'काव्य पुरळे' लिहायची स्फूर्ती होतेय. बघते प्रयत्न करुन.
~~~~~~~~~

Lol प्रतिसाद भारी आहेत ...

Lol चांगलं आहे काव्य नी झुरळं.

केदार,
क्लास. लगे रहो!!

Biggrin

शरद
.............................
"मैं क्यों उसको फोन करूं?
उसके भी तो इल्म में होगा; कल शब, मौसमकी पहली बारिश थी!" 'परवीन शाकर'
............................

Rofl महान !

  ***
  Entropy : It isn't what it used to be.

  कमोड अन झुरळे मस्त!! Lol Lol
  प्रतिसाद तर अफाट्च !! Rofl

  Rofl

  rofl.giflaughing.gif

  Happy छान.

  व्वा! Biggrin

  *********************
  All desirable things in life are either:
  1.Illegal
  2.Banned
  3.Fattening or
  4.Married to Others.
  Wink Biggrin

  बाबा रे Rofl

  केदुमामा आप महान हो!

  कमोड ला एक समानार्थी शब्द मिळाला. " सिंहासन " Lol

  सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना.....

  Lol
  ************
  अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग

  उच्च! Lol

  प्रयत्न फसलाय Lol

  केदारा .. अशक्य आहेस तु Lol
  प्रतिसादातले आयडी आता प्रत्यक्षात माबोवर येतील बघ Happy

  कवितेपेक्षा मला "प्रतिसादच" जास्त आवडले! अफलातून.......
  ...;
  आपला, लिम्बुटिम्बु

  अफलातुन प्रतिसाद. Lol

  'परस' काय किंवा 'कमोड' काय भावना समजून घ्या>>> :lol:

  मंथन !! Rofl

  -प्रकाश
  -------------------------------------------------------
  दीवाना हुआ बादल !

  कविता शक्य, प्रतिसाद अशक्य Proud
  ********************************
  द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

  जहबहर्‍या... Rofl
  प्रतिसाद तर अफाट
  =========================
  रस्त्याने जाताना वाटेत नाचत मासे पाहत थांबू नये...

  धन्स Happy
  .
  मीनू , संघमित्रा Lol
  .
  पण अजूनही झुरळे फिरताहेत Proud
  ------------------------
  देवा तुझे किती सुंदर आकाश
  सुंदर प्रकाश सूर्य देतो

  पण मी काय म्हणते सिंहासनामधे खरंच जर्म आहे ( तसला हार्पिक च्या अ‍ॅड मधला खदाखदा हसणारा हिरवा जर्म नाही तर "काव्य जंतू ") तर तू खरंच त्या शेराला अनुकूल अशी एक अक्खी गजलच का लिहीत नाहीस?
  आणि छळ छळ छळिता मधे तर लोकगीताची पोटेन्शल आहे.
  Proud Proud Proud
  अगदी हिम्सकूल म्हणतो तस्सं जहबहर्‍या...
  लगे रहो!

  Pages