फ़ेक फ़ेमिनीस्ट

Submitted by जयश्री साळुंके on 18 July, 2017 - 00:39

हा माझा माबो वर लिखाणाचा पहिला प्रयत्न आहे. काही चुका असल्यास कळवावे. आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे हा लेख कोणालाही दुखावन्यासाठी नाही, हा माझा अनुभव आहे, सगळेच लोक असे नसतात हेही मला महिती आहे.

काही दिवसांपूर्वी माझ्या मित्रांपैकी एकजण मला म्हणाला की तो खरा फ़ेमिनीस्ट आहे. एक स्त्री म्हणून मी त्याला विचारले “भाऊ तु कोणत्या आधारावर हे म्हणतो आहे?” तर त्याने मला उत्तर दिले कि, “मी महिलांवर कविता आणि लघु कथा लिहितो, मी माझ्या कुटुंबातील महिलांना स्वतःच्या आवडीनुसार काम करण्याची परवानगी देतो, त्या स्वतःचे कपडे, शिक्षण, मित्र निवडू शकतात. आणि मला बर्याच मैत्रीण आहेत. मी मूलभूत गरजा भागविण्यासाठी संघर्ष करत असलेल्या अनेक गरीब आणि मागासवर्गीय मुलींना पाहिले आहे.” म्हणून मी त्याला एक विचारल की त्याच्या कविता आणि लघुकथांचा आधार काय आहे? त्यांनी सांगितले की मी आजच्या महिलांच्या विरोधात होणरा अन्याय, महिला सक्षमीकरण आणि स्त्रियांच्या समोर असलेल्या आवाहना बद्दल खूप लिहिले आहे. म्हणून मी खरा स्त्रीवादी आहे.
हे सगळ ऐकल्यावर एक प्रश्न मला पडला कि फ़क्त लिखाण, वाचन, आणि समस्या बघुन कोणी खरंच स्त्रीवादी होवु शकत का? कि आपल्याला त्या स्त्रियांची मदत करण देखिल गरजेच आहे? म्हणजे तुम्ही कोण आम्हाला कपडे कोणते घालयचे याची परवानगी देणारे किंवा शिक्षण कोणत घ्याव याची परवानगी देणारे? तो हक्क तर आम्हाला घटनेने आधीच दिला आहे. आपण अजुनही अश्या जगात राहतो जिथे रोजच्या वृत्तपत्रामधे हुंडाबळीच्या, बलात्काराच्या, रोड रोमिओ मुळे रोजचा होणारा त्रासाच्या, असिड हल्याच्या बातम्या खुप मोठ्या प्रमाणावर छापुन येतात आणि आपण त्या बातम्या चहा सोबत आवडीने वाचतो.
जर अश्या प्रकारे कोणी खरच फ़ेमिनीस्ट बनत असेल तर मी फ़ेमिनीस्ट नाही याचा मला आनंद आहे.

तेजय

Group content visibility: 
Use group defaults

फरहान आखतर ने दिल धडकने दो मध्ये सांगितलंय की जेव्हा तुम्ही एखाद्याला एखादी गोष्ट करायला परवानगी देता जसं तुमचा मित्र बोलतोय की मी अमुक गोष्टी करायला परवानगी देतो.....
तर जेव्हा कोणी एखाद्याला अशी परवानगी देता तेव्हा तुम्ही स्वतःला एक सुपिरियर जागेवर असल्याचं imagine करता. आणि समोरच्याला परवानगी देता. यात equality कुठेच नाही उलट मी परवानगी दिली म्हणून तिला हे सर्व करता आलं हा अहंभाव असतो

यात equality कुठेच नाही उलट मी परवानगी दिली म्हणून तिला हे सर्व करता आलं हा अहंभाव असतो>>पटलं

धन्यवाद अनिश्का आणि क ऊ... मुळात मला पण तेच म्हनायच आहे कि समानता नाहीच पण ईगो आहे...

तुमचं म्हणणं बरोबर आहे.

( एक लिखाणाची टीप : मराठी मध्ये फ च्या खाली नुक्ता देत नाहीत. ते हिंदी / उर्दू लिखाणात असते. )

'एखाद्याने हे अमुक/तमुक केलं तरी फेमिनिस्ट म्हणता येणार नाही' हे तुम्ही सांगितले पण तुमच्या मते एखाद्याला खरंच 'फेमिनिस्ट' व्हायचे असल्यास त्याने काय करणे अपेक्षित आहे ?

धनि मराठी मधे नुक्ता नसतो पण ते मला टाईप नाही करता आल, जरा सुचवाल का ते कस करतात.

हायझेनबर्ग जर तुम्ही खरच हा प्रश्न विचारत असाल तर फ़क्त एखाद्या समस्येबद्दल बोलुन काहिच होत नाहि हा मुळ मुद्दा. आणि जर एखाद्याला 'फेमिनिस्ट' व्हायच असेल तर सगळ्यात जास्त महत्व आहे ते समानतेला. सुरुवातीला 'फेमिनिसम' हा शब्द वापरला गेला तो काही मुलभुत हक्कासाठी (गुगल वर याबद्दल पुर्ण माहिती मिळेल).

मेधा "तर मी फ़ेमिनीस्ट नाही याचा मला आनंद आहे" यात मला ईतकच म्हणायच ए कि जर फ़क्त लिखाण, वाचण किंवा कुठलाही अधिकार एखाद्याला आपण देतो आहोत अस दाखवण म्हणजे फेमिनिसम नाही, आणि जर याला फेमिनिसम म्हणत असतील तर मी फ़ेमिनीस्ट नाही याचा मला आनंद आहे.

तुम्हीही ईथे बोलत/ लिहितंच आहात ना? मग तुमच्या बोलण्याने काहीच होणार नाही हे तुम्हाला माहित आहे पण तरी मग तुम्ही लिहिलेच ना?

तुमचा समानतेचा मुद्दा मान्यच आहे पण ज्याला जे बरोबर वाटते तो ते करतो, लिहिणार्‍यांच्या प्रयत्नांना आपण तोकडे म्हणु शकतो पण 'फेक' लेबल लावण्याचा मॉरल अधिकार आपल्याला नाही असे माझे मत आहे.

फरहान आखतर ने दिल धडकने दो मध्ये सांगितलंय की जेव्हा तुम्ही एखाद्याला एखादी गोष्ट करायला परवानगी देता जसं तुमचा मित्र बोलतोय की मी अमुक गोष्टी करायला परवानगी देतो.....
>>>>

वरचे वाचताना मला हेच आठवलेले. मी ऊठून मनातल्या मनात टाळ्या वाजवलेल्या त्या सीनला.

लिहिणार्‍यांच्या प्रयत्नांना आपण तोकडे म्हणु शकतो पण 'फेक' लेबल लावण्याचा मॉरल अधिकार आपल्याला नाही असे माझे मत आहे.
>>>>

प्लस सेव्हन एटी सिक्स !

एखादा व्यक्ती अश्या विषयांवर लिहिते किंवा मायबोली वा तत्सम सोशलसाईटवर धागे काढून त्या विषयाला वाचा फोडते वा लोकांपर्यंग पोहोचवते, किंवा चर्चेला एक प्लॅटफॉर्म देते.. ती फक्त तेवढेच करते आणि ईतर काही करतच नाही असे गृहीत धरणे चुकीचे.
तसेच लिखाणातील आणि या सोशल साईट माध्यमातील ताकद मान्य केली तर या प्रयत्नांना अगदी तोकडेही बोलता येणार नाही.

धनि मी f फ़क्त दाबतेय पण नाही होत आहे.

हायझेनबर्ग मी ईथे कोणत्याही स्री चे प्रश्न नाही लिहले, मी फ़क्त एक अनुभव लिहला आहे कि असे लोक आहेत ह्या जगात.

ऋन्मेऽऽष मी नाही बघितला दिल धडकने दो, पण आता बघेल.

हा धागा मी एक अनुभव म्हणुन काढला आहे. आणि ज्या व्यक्ति सोबत हे बोलण झाल आहे ती व्यक्ति फ़क्त बोलबच्चन आहे हे मला माहित आहे.

आणि जर याला फेमिनिसम म्हणत असतील तर मी फ़ेमिनीस्ट नाही याचा मला आनंद आहे. >> पण तुम्ही स्वत:ला फेमिनिस्ट मानता का ? कशावरुन मानता ? मी खरेच विचारते आहे . मला आजवर जे कोणी सेल्फ प्रोक्लेमड फेमिनिस्ट भेटलेत त्यातल्या फार थोड्या लोकांनी ते स्वतःला का फेमिनिस्ट समजतात याचं उत्तर दिलंय. बहुतांश लोक नुसतीच उडवा उडवी करतात .

हाब यांना अनुमोदन .
वाचण किंवा कुठलाही अधिकार एखाद्याला आपण देतो आहोत अस दाखवण >>तुम्हाला इतरांना फेक फेमिनिस्ट ठरवण्याचा अधिकार कसा काय ?

फेक फेमिनीसम असं नसून, या प्रकाराला "pseudo feminism" असं म्हणतात

तुम्ही जर दुसऱ्याचा मुद्दा "pseudo feminism" म्हणून फेटाळत लावत असाल तर मुळात फेमिनीसम काय आहे, आणि तुम्ही त्यासाठी काय करता हे जाणून घ्यायला मला ही आवडेल.

एखाद्याचे मत जर तुम्हाला पटत नसेल तर ती व्यक्ती किंवा ती संज्ञा कुचकामी ठरत नाही, तुम्ही म्हणताय तसे जर स्त्रीमुक्ती चळवळ याची व्याख्या किंवा विचार जर तुमच्या मित्राला माहित नसेल तर त्याला नावे न ठेवता, त्याला योग्य तो विचार सांगणे हे मित्र म्हणून तुमचे कर्तव्य आहे.

मी कोणालाही नाव ठेवत नाही. मला आवडेल जर कोणी असे अनुभव इथे शेअर केलेत तर. ज्या मित्रासोबत माझ हे बोलण झाल त्याला नाव ठेवायचा माझा कोणताही विचार नाही.
आणि मी फ़ेमिनीस्ट आहे or नाही अस मला नाही म्हणायच I am not self proclaimed feminist.

सर्वप्रथम मायबोली परिवारात आपले स्वागत.

मी f फ़क्त दाबतेय पण नाही होत आहे.

>> कुठला keyboard वापरताय ? मोबाइल वरून type करत असाल तर Google Indic Keyboard वापरा. Laptop/PC असेल तर Google input tools. दोन्ही बेस्ट आहेत.

कदाचित तुम्ही वापरताय त्या app वरही हा प्रश्न सोडवता येईल.
Feminist type केल्यावर दोन किंवा त्यापेक्षा जास्त पर्याय दाखवत असेल. त्यातला नुक्ता नसलेला शब्द निवडावा, तसा पर्याय दाखवत नसल्यास keyboard बदलावा.

आता लेखाबद्दल :

मानवी मनाचे दोन भाग आहेत : भावनिक मन आणि समाजमन. समाजमन म्हणजे शेकडो वर्षांपासून ज्या चाली रुढी परंपरा असतात त्याची छाप या मनावर असते. दुसऱ्या भाषेत सांगायचं तर cultural morals & ethics are in our blood, they resides in an unknown part of our genes. आपल्याकडे हजारो वर्षांपासून पुरुषप्रधान संस्कृती आहे. आज हे चित्र बदलतय पण कृतीतून बदल दिसला तरी पुरूषी मनांना हा बदल स्विकारायला अजून काही दशक जावे लागतील. हा त्यांचा दोष नाही कारण समाजमन बदलायला वेळ लागतो.
इगोमुळे का होईना ( काही) पुरुष स्त्रियांना समानतेने वागवतायेत हे स्वागतार्ह असायला हवं.

राहिला मुद्दा feminism च्या व्याख्येचा. कुणाला फेमिनिस्ट म्हणावं आणि कुणाला नाही ही फार अवघड गोष्ट आहे. Feminism च्या नावाखाली बऱ्याच वाईट घटना घडलेल्या आहेत. राजकारणी आणि समाज धुरिणांनी स्वार्थाची पोळी भाजून घेतली आहे.
नवरा बायकोने एकमेकांना फट पडणार नाही इतपत स्पेस दिली की पुष्कळ आहे

धन्यवाद अॅस्ट्रोनाट विनय . कदाचित keybord बदलावा लागेल.
कृतीतून बदल दिसला तरी पुरूषी मनांना हा बदल स्विकारायला अजून काही दशक जावे लागतील. हा त्यांचा दोष नाही कारण समाजमन बदलायला वेळ लागतो >> मान्य. आणि हे फक्त एका वर्गासाठी नाही लागु पडत. लहान पणापासुन मुलीला देखील आपण मुलापेक्षा वेगळी वागणुक देतो त्यामुळे तिची मानसिकता देखिल अशीच होते कि ती त्याच्यापेक्षा वेगळी आहे..
जिथे स्वतःचा ईगो असणारे पुरुष आहेत तिथेच काही असे पण आहेत जे खरच स्वतःच्या घरात तरी स्त्रियांना समानतेने वागवतायेत. आणि अश्याना सलाम. कारण एकदा असाच एक मुद्दा आमच्या ग्रुप वर चर्चिला गेलेला कि एखद्या महिले वर जर अन्याय होत असेल तर मोस्टली तिला मदत करणारा हा पुरुषच असतो. एक महिला दुसरीला सहजासहजी मदत नाही करत.

Feminism च्या नावाखाली बऱ्याच वाईट घटना घडलेल्या आहेत. राजकारणी आणि समाज धुरिणांनी स्वार्थाची पोळी भाजून घेतली आहे.

Examples????

फेमिनिझम बद्दलची माझी मते -

जेव्हा मी आंजावरती प्रथम आले, १०-१२ वर्षांपूर्वी, तेव्हा मी अतोनात पारंपारीक / नॉन- फेमिनिस्ट विचारसरणीची होते. किंबहुना माझा पहीला धागाच मला वाटतं वटपोर्णिमेच्या कौतुकाबद्दलचा होता. (https://www.misalpav.com/node/12901)
पुढे खूप लेख वाचले, कथा, कविता वाचल्या, समृद्ध होत गेले. यामध्ये काही स्त्री मुक्तीवादी अतिशय जेन्युइन आय डीज होते / आहेत ज्यांची मी फॅन आहे. हे आयडीज सातत्याने चूकीच्या पारंपारीक विचारसरणी बद्दल आवाज उठवत राहीलेले आहेत. खूप मोठा व कठीण लढा आहे हा पण अथक परिश्रमाने या आय डिजे ने लिखाण केलेले आहे, पुरुषसत्तक विचारपद्धतीच्या चूका व तोटे दाखविलेले आहेत. यातून समाजाचे प्र बोधन होते. विचारांची देवाण घेवाण होते.

यातून माझ्या खूपशा चूकीच्या समजूतींना छेद जरी गेला तरी त्यामानाने समाजजागृती झालीच की. उदाहरणार्थ - https://aisiakshare.com/node/2917 अपर्णा रामतीर्थंकरांबद्दलचा हा धागा. वेळोवेळि आपल्या विचारांना पडताळून पहायची संधी मला मिळत गेली, हा फायदाच आहे की.

तेव्हा फेक किंवा सुडो फेमिनिस्ट मी या आय डीज ना अजिबात म्हणणार नाही. सुडो-फेमिनिस्ट कोण तर खाण्याचे व दाखवण्याचे दात वेगळे ते लोक. म्हणजे उघड उघड स्त्रीमुक्तीवादाचे गुणगान गातात व घरात मात्र सूनेचा छळ करतात. किंवा कोणी स्त्री पुढे जात असेल तर पाय खेचतात.