Wilms tumour childhood cancer

Submitted by VaibhaviOvee on 14 July, 2017 - 12:37

Hi my ९ month baby had diagnosed with wilms tunour.
Ata amhi TATA center mumbai mdhe case register keli ahe pn khup long process vatatey we are still waiting for their investigation.
Koni oncologist kiva peaditrician asal tr please guide Kara.. Kuthe lavkr upchar milale tr.
Till now we have consulted 4 oncologist everyone is saying wait for tata's investigation then we can move forward.
Anybody who have experienced same symptoms with baby in family...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबईत एक शाळासोबती कोणत्यातरी खाजगी इस्पितळात ऑंकोलॉजिस्ट आहे. तुम्हाला संपर्कातून उद्यापर्यंत तिची माहिती देवू शकेन.

सदर धागाकर्तीने सहकार्याच्या अपेक्षेने तात्काळ माबोचं सदस्यत्व घेऊन हे आवाहन केलेलं दिसत आहे..विषयाशी संबंधितांनी त्वरीत त्यांना प्रतिसाद द्यावा. Happy

Vaibhavi, At TATA hospital, patient load is much higher. Some people prefer to get the tests done from outside n then at TATA for further treatment. Please feel free to call me at (9969491336 Mrs. Vaishali Bhogate). I might be able to help you to get proper reference once I get a clear idea of the reports you already have.

वैभवी, टाटा मधे फार लोड आहे पेशंट्सचा.
परेलला ग्लोबल हॉस्पिटल मधे प्रयत्न करुन बघु शकता. ग्लोबल केइएमच्या पुढे आहे.

वैभवीओवी, तुमची मनःस्थिती समजू शकते, पण धीर सोडू नका.
टाटाला गर्दी असते, ताटकळणे, वाट बघणे, तेसुद्धा छोट्या बाळाला घेऊन -- नकोसे वाटते, मान्य आहे;
पण
त्यांच्या हाताखालून दिवस-रात्र असे आणि असेच पेशंट जात असतात,
त्यामुळे अचूक निदान आणि उपचारांची योग्य दिशा याबाबतीत तिकडचे मार्गदर्शन जास्त मोलाचे ठरते.
उपचार लौकर होण्याइतकेच ते "योग्य" होणेही गरजेचे आहे
वेळ वाचवण्यासाठी तुन्ही टेस्टस / स्कॅन बाहेरून करून घेउ शकता
त्यांच्याकडून लाईन-ऑफ-ट्रीटमेंट आखून घेउन, प्रत्यक्ष उपचार ( केमो / रेडिएशन ) बाहेरून करून घेउ शकता
तसे चालते, तो पेशंटचा चॉईस असतो
पण निदान मात्र तिथेच करून घ्याल तर चांगले,

कॅन्सर म्हणजे सोप्या शब्दात पेशींची अनाकलनीय, अनिर्बंध वाढ ??
आणि उपचार ती अनैसर्गिक वाढ काबूत ठेवतात / थांबवतात
बाळाचे वय, नाजूक अवयव, आणि सगळे शरीरच वाढीच्या टप्प्यात असताना उपचारांचे निरोगी, नैसर्गिक रीत्या वाढणार्‍या पेशींवरही परिणाम होउ शकतो.
म्हणूनच या वयात --
** निदानासाठी सीटीस्कॅन / एम आर आय / पेटस्कॅन यापैकी नेमके काय करायचे
** उपचारात किती दिवस, किती स्ट्राँग/माईल्ड, किती गॅपने ट्रीटमेंट द्यायची
** एकीकडचा आजार बरा होताना दुसरीकडे पसरू नये म्हणून उपचारात आधीच काय सावधगिरी बाळगायची
याबाबतीत अतिशय काटेकोर, सुस्पष्ट ( जे असेल त्याची पूर्ण कल्पना देऊन), प्रामाणिक (पैसे काढण्यासठी -- हे करून बघू, त्याचा गुण नाही दिसत? मग ते करून बघू असे नव्हे ) आणि अनुभवी मार्गदर्शन, तुम्हाला टाटात खात्रीने मिळेल.

याउपर, तुम्हाला दुसरीकडे जायचे असेल तर, निर्णय तुमचा असेल.
टाटातच निदान / उपचार करायचे ठरले आणि काही मदत हवी असेल तर नक्की सांगा.
बाळ बरे होईल, चिंता करू नका. या आजारात मानसिक शक्ती आणि सकारात्मक विचार खूप चांगले रिझल्टस देतात.
मनापासून शुभेच्छा

Till now we have consulted 4 oncologist everyone is saying wait for tata's investigation then we can move forward. >> हे खरे आहे. जितके निदान अचूक, तितके उपचार जास्त परिणामकारक

Hi Vaibhavi,
I had Triple negative breast cancer last year and im BRCA 1 positive,
I travelled from Kuwait to TATA for my treatment plan and had my surgery at St Elizabeth hospital Malbar hill.
Moral of the story is TATA is the best hospital for you to take treatment plan.
Then you can opt out for actual treatment, and keep doing follow up with TATA team.
You can also take Ayurvedic treatment from Dadar which will help you minimize side effect.
My contact number is 965 66163597, plz let me know if you need any help or further info.
Sorry Admin  but I don’t know how to typed Marathi.

We are expecting to get detailed report investigation till Monday.on Thursday we have MRI planned in kharghar tata.I guess after this doctor will surely share their plan

I guess after this doctor will surely share their plan >>>
हो तपासण्या पूर्ण झाल्यावर पुढच्या ओपीडीला सगळे रिपोर्ट बघून, पेशंट तपासून ते उपचारांची दिशा सांगतात.
जर उपचार तातडीने करणे गरजेचे असेल तर --- आमच्याकडे ट्रीटमेंटसाठी नंबर येइपर्यन्त वेळ लागेल, तेव्हा तुम्ही थांबू नका, बाहेरून लगेचच करून घ्या असे सांगतील. तुमच्या पसंतीच्या हॉस्पीटलसाठी तसे रेफरल + ट्रीटमेंट डीटेल्स लिहूनही देतील.

टाटाची फाईल तुमच्याकडे असेलच + त्यांचे ऑनलाईन रिपोर्ट, तपासणीचे निष्कर्ष, केस हिस्टरी इ. बाहेरचे डॉक्टरही बघू शकतात. ( Tata Memorial Hospital- ELECTRONIC MEDICAL RECORDS ) ज्याचे लॉगईन पासवर्ड पेशंटकडेच असते.
तेव्हा तुम्हाला बाहेरच्या डॉक्टरकडून सुद्धा सेकंड ओपिनिअन घेण्यासाठी लागणारी सारी माहिती तुमच्याकडेच असते.

टाटा best आहे. तुमचं बाळ झटपट निदान होवून, योग्य treatment मिळून तुमच्यापाशी सुखरूप राहो. ह्या प्रवासात तुम्हाला भरपूर positive energy मिळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि शुभेच्छा. श्रीराम.

टाटा best आहे. तुमचं बाळ झटपट निदान होवून, योग्य treatment मिळून तुमच्यापाशी सुखरूप राहो. ह्या प्रवासात तुम्हाला भरपूर positive energy मिळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना >>>>>>> +९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९

मॅडम तुम्हाला मदत मिळाली का? मी मुंबईतील एक प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर प्रसाद दांडेकर यास आपल्याशी संपर्क साधायला सांगितलं होता . तसेच अमेरिकेत माझ्या मावसभावाची बायकी मुंलांच्या कॅन्सर वर रिसर्च करीत आहे . तर मी आपली काही मदत करू शकतो का ?