तुझ्याशिवाय !

Submitted by मण - मानसी on 14 July, 2017 - 08:17

तुला पाहिले की दिवसाची सुरवात व्हायची,
मखमली स्वप्ने मनोमन फुलून जायची,
प्रतेक क्षणी ध्यानी मनी तूच होतास,
माझ्या सोनेरी दिवसांचा तूच तर बहार होतास,
किती अलगद बांधल्या गेली आपल्या मैत्रीची गाठ,
खूपच जवळ आलो आणि एकच झाली आपली वाट,
एकमेकांसाठी झुरलो, रडलो, भांडलो, हसलो,
Assignment च्या नावाखाली कित्तेक वेळा भेटलो,
आता मात्र सगळच निराशमय वाटतेय,
असं वाटतेय तू फक्त formality केली होतीस,
तुला माझ प्रेम कधी समजलच नाही,
की तुला माझ्या भावनाच समजल्या नाहीत,
तुझ्यासाठी मी लाखो-करोडो सारखीच एक होते न?
पण माझ्यासाठी मात्र लाखो-करोडो मध्ये फक्त तू होतास,
तुझ्याशिवाय मी राहू तर शकते,
पण खुश नाही,
तुझ्याशिवाय मी हसू तर शकते,
पण मनातून नाही,
तुझ्याशिवाय मी आयुष्य तर काढू शकते,
पण या वेड्या मनाला कसे समजाऊ,
जे फक्त तुझ्याच मागे पळते,
फक्त तुझ्याच मागे पळते !!!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

dabbu, दिल कु छू गया... जशा काही माझ्याच मनातील भावना लिहील्या आहेत.. धन्यवाद!!!! Happy