टीव्ही व मालिका

Submitted by शिवाजी उमाजी on 10 July, 2017 - 16:20

टीव्ही व मालिका

माणुस एक तर आक्रमक असावा किंवा फार दुबळा असावा, या दोघांनाही अनुक्रमे सर्वांचे लक्ष केंद्रित करता येते वा सहानुभुती मिळवता येते. असलेच विषय हल्लीचे हिंन्दी व मराठी मालिका तयार करणारे निवडतात, ज्या मधुन समाजाला कोणताच सकारात्मक संदेश दिला जात नाही. उलटपक्षी नैतिकतेच्या चिंद्या करीत, अनैतिक संबंधाचं बटबटीत चित्रण दाखवून केवळ साचेबद्ध नातेसंबधांच उदात्तीकरण केलेलं दाखवतात, जवळचेच काहि नातेवाईक, मित्र खलनायक दाखवत कथानक तयार करून प्रायोजक मिळवून प्रसारीत करायचे व गल्ला वाढवित रहायचे. या सार्‍यात केवळ टी.आर.पी. वाढवायच्या नावाखाली मुळ कथेचं पार मातेरं केलं जातं.

समाजात टी.व्ही. सारखे माध्यम फार व्यापक व ठोस परीणाम करणारे ठरते, परंतु काही लोकं याचं गांभिर्य न जाणता केवळ प्रायोजक सांगतात तेवढंच करतात. खोटेपणा, ढोंग, अवास्तव चांगुलपणा, पराकोटीचा द्वैष, तेवढीच सहनशीलता व जुन्या परंपरांचा पगडा व बेगडी अाव वगैरे गोष्टी सहज दाखवून लांबी वाढवत राहतात. मी मी म्हणनार्‍या एका चँनलच्या काही मालिका तर केवळ धंदेवाईक मुल्य जपून निर्माण केलेल्या स्पष्ट जाणवतात. निर्माते व प्रयोजकानी लोकांना, प्रेक्षकांना इतकं गृहित धरायला नको. एक प्रकारे हे लोक संस्कार मुल्याची पार वाट लावुन टाकतात.

(माझ्या विचारांशी सर्वांनी सहमत असावेच असा आग्रह नाही)

© शिवाजी सांगळे, मो. +91 9545976589
29/11-07-2017

Group content visibility: 
Use group defaults

अहो टीव्ही, सिनेमे, वर्तमानपत्रे, मासिके, जाहिराती असल्या गोष्टींतून काही सकारात्मक मिळेल ही अपेक्षा का?
सामान्य जनतेला जे काय हवे आहे, ज्यासाठी ते वाट्टेल तेव्हढे पैसे खर्च करायला तयार आहेत, तेच सर्व या गोष्टींमधून दाखवले, लिहीले जाते.
ही वस्तुस्थिती आहे. दुर्दैवाने सकारात्मक विचारांची आवड बहुजनसमाजात नाही. पण सकारात्मक वृत्ती अंगी असावी लागते, अशी ऐकून, वाचून ती निर्माण होत नाही.
सकारात्मक लोक टीव्ही, सिनेमे, वर्तमानपत्रे, मासिके, जाहिराती याकडे दुर्लक्ष करतात!
इतर अनेक ठिकाणी सकारात्मक विचार, उच्च विचार, योग्य मार्गदर्शन होत असते. उदा. तुम्हीच इथे एक लेख लिहीला आहे, तिथे पहा.