कोरम

Submitted by विजय दिनकर पाटील on 7 July, 2017 - 04:30

जगाचे लाड साला खूप झाले
उभे कापू जगाला....खूप झाले

जमत नाही तुला तर धाड दुसरा
मला कोरम मिळाला खूप झाले

कुणाला हौस आहे सिक्स पॅक्ची
जरासा घाम आला खूप झाले

जमीनीची कदाचित खैर नाही
उचलणारे नभाला खूप झाले

तुझे कर्तृत्व नव्हते फार काही
तुझा उल्लेख झाला खूप झाले

- विजय दिनकर पाटील

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला प्रत्येक शेराचा आशय आवड्ला...
गझलेतलं फार कळत नाही, पण कविता कशी एक संध असते तसा नियम गझलेला नसतो ना?
म्हणजे प्रत्येक शेर हा नि राळा असला (आशयाने) तरिही चालतो ना?

आणि पॅक्ची आहे ते पॅकची हवंय का?
की तुमच्या मीटर मध्ये, जमिनीत, बंधारे, खंदारे यात बसवायला लिहिलं आहे तसं? Uhoh