Submitted by मी अभिजीत on 10 March, 2009 - 00:35
(संदिप खरे आणि त्याच्या तमाम पंख्यांची क्षमा मागून)
एसी असता फ्रीज असता गरम होऊ लागले.
जाहले इतुकेच होते भारनियमन वाढले.
मीटरावीण सदनी त्याच्या बल्ब कैसा पेटला.
आकड्याने चोरताना काल त्याला पाहिले.
एवढे का घोळ करिसी वीज नियामक मंडळा,
तू दिलेले बिल खिशाला फार वाटू लागले.
वीज जाता बंद टीव्ही संगणकही पांगळा.
पोर ते क्रिडांगणावर खेळ मांडू लागले.
लाख उपकरणे हाताशी, शहर तरिही हळहळे.
मंडळाचे प्रेम केवळ मुंबईवर राहिले.
भर पहाटे अन दुपारी वीज काढून टाकली.
राहती इन्व्हर्टरावर, सुख तयांना लाभले.
-- अभिजीत दाते
(एक लोडशेडींगने त्रस्त मायबोलीकर)
मूळ गीत - मेघ नसता वीज नसता
कवी - संदिप खरे
गुलमोहर:
शेअर करा
छान. जयदीप
छान.
जयदीप ओक
**********
मी दुसर्यांन सारखा होऊ शकत नाही कारण मी माझत्वं घालवु शकत नाही.
सुन्दर !
सुन्दर !
चांगले
चांगले झालेय विडंबन.
आवडले. मूळ
आवडले.
मूळ गीतातले "वीज नसता" हे शब्द विडंबनातपण कुठेतरी वापरता आले असते का जसेच्या तसे की तसे वापरायचे नसतात?
मस्तच आहे.
मस्तच आहे. तमाम लोडशेडिंग त्रस्त लोकांचे मनोगत आहे.
सहिये
सहिये
छान जमलय.
छान जमलय.
सुन्दर !
सुन्दर ! सहि!!
मस्त जमलय..
मस्त जमलय..
---------------------------------
देणार्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी
सुन्दर !
सुन्दर ! सहि!!
जमलंय... पोर
जमलंय...
पोर ते क्रिडांगणावर खेळ मांडू लागले.>>
हा एक चांगला फायदा म्हणायचा का भार नियमनाचा..
=========================
रस्त्याने जाताना वाटेत नाचत मासे पाहत थांबू नये...
चांगलय... अज
चांगलय...
अजून चांगले होउ शकले असते..
-------
स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या डोहातले
स्वप्न एखादे जणू आतून आहे गोठले