पूर्व युरोपातील खाबुगिरी.

Submitted by उदे on 24 June, 2017 - 08:29

यावेळच्या पूर्व युरोपच्या सफरीत ऑस्ट्रिया,स्लोवाकिया,झेक रिपब्लिक,पूर्व जर्मनी आणि हंगेरी या देशांतील शहरात रोजच छानशी पायपीट करायची होती! साहजिकच रोज चांगला फेरा झाला. त्याबरोबरीने चांगली खाबुगिरीही झाली.

एक गोष्ट आवर्जून सांगायला हवी. यावेळी युरोपात चांगलीच गरमी होती!(ग्लोबल वार्मिंग??) चालताना विश्रांतीसाठी सावलीत आलं तर गार जरी वाटत असलं तरी पुन्हा उन्हात चालताना चटके सोशितच चालावं लागत होतं . युरोपात फिरणाऱ्या ईतर मित्र-मैत्रिणींकडूनही हेच ऐकायला मिळालं. त्यामुळे पर्यटक उन्हाने परेशान असले तरी प्रत्येक टळटळीत दुपार आम्ही वेगवेगळे फ्रुट जुईसेस आणि क्रिमी आईसक्रीम्स खाऊन, आमच्यापुरती मनोरंजक करून टाकली.
IMG_8906.JPEG
उत्कृष्ट हॉटेल्सच्या बाहेर वेगवेगळ्या अल-फ्रेस्कोज मध्ये आणि पेशिओ मध्ये विविध प्रकारचे पिझ्झा, पास्ता आणि चित्रविचित्र (आम्हाला काळात नसल्यामुळे!) नावं असलेल्या कॉंटिनेंटल डिशेश खाताना चवीपेक्षा उदरभरणाचाच योग जास्त वेळा आला. अपवाद करायचाच झाला ता ब्रातिस्लाव्हा येथे टोमॅटो-चीज पिझ्झा खाल्ला त्याची चव अजूनही मनात रेंगाळतेय! (चतकोर तुकड्याचा फोटो) तिथेच पास्ता म्हणून मागवलेला पदार्थ हा तंदूर पापलेट अख्खा ठेवला तर कसा दिसेल? नेमका तसा होता. वरून कडक वाटणारा परंतु लिबलिबीत असा तो पदार्थ वांग्याच्या भरताचा चुलत भाऊच होता जणू!!
IMG_8908.JPEG
नुसतं पायी भटकण्यासाठी उत्कृष्ट असलेल्या,व्हिएन्ना शहराच्या मध्यभागी असलेल्या सेंट्रल मार्केट प्लेसची मुख्य चिंचोळी गल्ली जी फक्त पादचाऱ्यांसाठीच आहे,तेथून खवय्यांनी भटकणं हे नुसतंच रोमांचक किंवा आल्हाददायक नव्हे तर त्यांचं मन उल्हसित करून टाकणारं ठरावं !!

प्राग नगरीचं सुंदर दर्शन घेऊन बागेतून खालच्या मुख्य रस्त्यावर उतरत असताना 'ऍमेझॉन' हे लिची,स्ट्राबेरी आणि त्यांची इतर देशी फळं यांचं मिश्रण असलेला फळांचा रस ऐन उकाड्यात क्षुधा भागवणारा होता!

एक मजेदार किस्सा आठवतो. ब्रातिस्लाव्हात स्वाती आणि मी जोगी कुटुंबियांसोबत खाबुगिरी करीत असताना पाणी मागितल्यावर वेटरने भरपूर लिंबू घातलेला एक जार च आमच्या समोर ठेवला. आम्ही दुसरा मागवल्यावर दुसराही दिला. नंतर बिलात त्याचे गुपचूप नव्हे-सरळ सरळ ४ युरो म्हंजे सुमारे ३०० रुपये लावून टाकले! असो. पण मजा आली. कारण बाटलीशिवाय कुणी पाणी देतच नव्हतं ना!

सकाळी निघताना भरपेट नाश्ता आवडीनिवडीनुसार मुबलक प्रमाणात झालेला असे. रात्री सामिष भोजनासाठी सर्वत्र उत्तम भारतीय हॉटेलातील उत्तम खाणं असे. त्यामुळे दुपारच्या जेवणात आम्ही वेगवेगळे पदार्थ रोजचा नेहेमीचा एक पिझ्झा नक्की करून (हो! कारण दुसरा पदार्थ आवडला नाही तर?) खात असू. त्यामुळे यावेळची टूर खाण्याच्या बाबतीतही मैफल जुळवून यावी त्या पद्धतीची झाली. जास्त कशाला बोलू नव्हे लिहू ? सोबतचे फोटोच आमची खाद्ययात्रेची चित्तरकथा तुम्हाला उलट जास्त रंगवून सांगतील नाही का?

--------------उदय ठाकूरदेसाई
uthadesai.com

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

जाई ,पद्मावती आणि अजय ... मनापासून धन्यवाद.
मजा काय झाली की, मी डॅन्यूबच्या काठाने छान गावं फिरलो त्यांची नाव अगदी आठवणीने वगैरे लिहीत गेलो. परंतु काय काय खाल्लं त्याची नावं लिहिलीसुद्धा नाहीत आणि लक्षातही राहिली नाहीत. मागे गंगटोकला सिक्किमी भोजन खाल्लं आणि लिहूनही घेतलं काय खाल्लं ते!! असो. डिटेल लिहीन. धन्यवाद.