आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ५

Submitted by मानव पृथ्वीकर on 22 June, 2017 - 00:48

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१४४८ - उत्तर
पाखरा जा दूर देशी
सांग माझा निरोप माझ्या साजणा

१४४९
हिंदी (१९६० - ७०)

ज त न न क क द
ज त द म ध ज
त म स म द भ द
अ ब त श

क्ल्यू - "भारत कुमार"

कृष्णाजी वाढदिवसानिमित्त अनंत मंगल कामना!

१४४९ चे उत्तर,
कांच की गुडिया(१९६०),हरियाली और रास्ता(१९६२),वो कौन थी(१९६४),हिमालय की गोद में(१९६५),शहीद(१९६५),उपकार(१९६७)

यांपैकी एकाही चित्रपटात सापडले नाही!

ग्रहस्ती

जाने तेरी नजरोंने क्या कर दिया
जब तुझे देखूं मेरा धडके जिया
तू ने महोब्बतसे मेरा दिल भर दिया
अपना बनानेवाले तेरा शुक्रिया

कोडे क्र १४५१ हिंदी (१९९१-२०००)
प क क म ल क म म
प क श श म च ह ज ज म
ग स द
सत्यजितजी राळ म्हणजे काय तुमच्याच एका गझलेत वाचलेलं (हा क्लू नाहीये बरं का असंच विचारलं)

राळ एक सुगंधी पदार्थ आहे,जो निखाऱ्यांवर जाळला असता सुगंध पसरतो...यांस "राळ बाळणे' म्हणतात! सहसा, महालक्ष्मी ई. देवींच्या आराधनेत मानाने राळ बाळली जाते.

पंडितजी येतील तोपर्यंत हे ओळखा
कोडे क्र १४५३ हिंदी (२०१२-२०१७)
अ य प र र र
अ य म च द प द प द प
द ल त क ग द ब च ह स
क र क र क प क र
प न त स भ ह स क र
य र प र प र प र..

क्लू
विंग्रजी बाराखडी भाग पहिला

ओके.. Happy

१४५४ , हिन्दी ,२०१२-१०१७
अ द क ट प,
क ग इ स अ ज्
,च ग त फ न अ क ब,
र द ज स स
म ब त र,
म स स अ म,
र ह त प थ ज ज ,
म ब त र...

ओ आशिक दिल की टसन पुरानी
कहते ज्ञानी इश्क सियापा, आग जवानी
चली गयी तो फिर नहीं आनी कुड़ी बेगानी
रहने दे जीना सीधा सादा
मैं बनी तेरी राधा

पहिल्यांदाच माहिती झालं हे गाणं!

पहिल्यांदाच माहिती झालं हे गाणं!>>

तरी देखिल विना क्ल्युचे सोडविले!

तुम्हाला सापडतात तरी कुठे हे!
आम्ही आपली अक्षरे लावत बसतो एकेक!

>>>म ब त र...>>> यावरुन तुक्का मारला,गुगल प्रसन्न!
सुरुवातीचे शब्द जुळले नाही म्हणून संपादित केलेलं आधी,पण नंतरच्या ओळी जुळत असल्याचे पाहिल्यावर पुन्हा लिहिलं!

Pages