कशी विसरू गं तुझी माझी प्रीत ...!

Submitted by प्रकाशसाळवी on 21 June, 2017 - 06:53

कशी विसरू ग तुझी माझी प्रीत!!

कशी विसरू ग तुझी माझी प्रीत
कसे विसरू आपले प्रेमगीत
विसरलीस तू जरी, नाही विसरलो मी तुला,
शब्दात बांधून ठेविले मी तुला
हसतेस जरी तू तिथे मी मात्र वेडा इथे,
किती आठवणी, आणि मन माझे तिथे,
हृदयावर ठेवून धोंडा गेलीस तू निघून,
पाहून घायाळ मी, गेलीस तू इथून,
विसरणे सोपे नसते ग "खरी प्रीत"
विश्वास नाही मला, "माधुरी" हीच का तुझी रीत,
पाहीन वाट तुझी या जन्मी जरी ना भेटली तू
अनंत जन्म घेईन मी तुज साठी, भेटू आपण मी आणि तु.
*****-> स्वरचित प्रकाश साळवी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान .. Happy
विश्वास नाही मला, "माधुरी" हीच का तुझी रीत,>> > हे तुमच्या आयुष्या शी संबधित असेल तर (नावाचा उल्लेख आहे म्हणुन वाटलं) ..एवढेच बोलेन कि निराश होऊ नका...स्वत:ला वेळ द्या... Happy