सांग आयुष्या ...!

Submitted by प्रकाशसाळवी on 20 June, 2017 - 04:51

सांग आयुष्या ...!
~~~~~~~~~
सांग आयुष्या कसे तुझ्यावर प्रेम करू ?
जे भेटले गुरू ते सारेच होते पोटभरू
**
राग, लोभ, माया , यांचे थाटले दुकान
सारेच मागती सुख, तर कुणी मागती कल्पतरू
**
ती म्हणाली " ब्रेक अप " झाला माझा
काय हे प्रेम आहे? हे प्रेम तर बाजारू
**
सा-यांना देशाच्या विकासाची चिंता
का मग फुकट लटकले भगत सिंग राजगूरू?
**
आध्यात्माचे धडे शिकविती आसाराम, ओशो गुरु
म्हणा भक्तगण हो " हरी ॐ सद्गुरू "
**
या फुलावर त्या फुलावर आनंद घेई जीवनाचा
आयुष्य थोडे तरीही जगते सुखाने फुलपाखरू
**
प्रकाश साळवी
१९-०६-२०१७
०९१५८२५६०५४

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults