हिंदीचा अभ्यास कसा घ्यावा

Submitted by राजसी on 19 June, 2017 - 23:09

माझ्या मुलाची सेकंड लँग्वेज हिंदी आहे. दहावीला हिंदी चा पूर्ण पेपर आहे. रोज हिंदीचा अभ्यास कसा करवून घेऊ? किती वेळ द्यायला हवा. रोजच होमवर्क असतो. शुद्ध लेखन कसे सुधारता येईल? सराव म्हणून काय करवून घेऊ? भरपूर descriptive writing करावं लागतं. उदा. ---- ने क्या किया? क्यू? सही किया या नही? कारण लिखो. अगर आपके साथ ऐसा हो तो क्या करोगे ? Types....

Group content visibility: 
Use group defaults

मी ह्यात मदत करू शकते.

मी ह्यात मदत करू शकते. मुलांचा मेन प्रॉब्लेम म्हणजे त्यांनी धड्यातले वाताव्रण कधीच अनुभवलेले नस्ते. जसे अगदी खेडेगावातली एक मुलगी माहेरी येते व तिला भाउ आणि आई सर्वांची लहान प णातली आठवण येते. देअर इज कल्चरल डिस्कनेक्ट. माझ्यामुलीला पण हा प्रॉब्लेम. तर ते त्याना नीट समजवून सांगायला लागेल.

यूट्यूब वर दूरदर्शन च्या जुन्या सीरीअल्स, हिंदी बातम्या मुलाला ऐकायला लावा. जसे राजस्थान मधील यू पी मधील. तसेच तिथले कल्च् रल प्रोग्राम बघायला लावा.
ह्यामुळे जनरल शब्दसंपत्ती वाढेल. मुले इथे कमी पडतात. खेडवळ शब्द व प्युअर हिंदी त्याना माहीत नसते. मुहावरेंचा वाक्यात उपयोग करणे इथे पण प्रश्न येतो.
कविता समोर बसून वाचून शिकवावी लागेल. मी मुलीसाठी हे केले आहे. आता वर्शाची सुरुवात असेल तर आपल्या हातात वेळ आहे. आपण करू शकतो.
सैनिकाचे मनोगत. पूजाके फूल. असे काय काय विषय घेउन निबंध लिह्वून घ्या. मुळात ओव्हर ऑल शब्द संपत्ती व शुद्ध लेख्न प्रॅक्टिस वाढवायला लागेल. व्याकरणा चा वेग्ळा अभ्यास घ्यायला लागेल. हिंदी चा क्लास आहे का तिथे नाहीतर मी शिकवू शकेन त्याला. मला पुस्तक सांगा मी इथे विकत घेइन. ऑल द बेस्ट.

२१ अपेक्षित प्रश्न माला आहे का? तिथे प्रश्न उत्तरे मिळतील. पण त्याच्या कडून लिहायची भरपूर प्रॅक्टिस घ्या. ह्या मेहनती साठी परीक्षा झाल्याव्र एक खास बक्षिस त्याला अनाउन्स करा. नवनीत गाइड चा पण उपयोग होतो. कोणते सिलॅबस आहे? सीबीएस सी का? स्टेट बोर्ड. आय सी एस सी? शुद्धलेखनात मार्क जातात.

धन्यवाद अमा, तो सहावीत आहे. ICSE. गेल्यावर्षी एका retired शिक्षिकेच्या मदतीने चांगलं झालंय आता. पण आता त्या शिक्षिका उपलब्ध नाहीत. मी काही सांगायला बसले तर रडारड आणि रागावणे मधेच वेळ जातो. अर्धा -पाऊण तासात गृहपाठ आणि शुद्धलेखन पक्के आणि लिहिण्याचा सराव यासाठी आहे. मी जे काय सांगते, ते त्याला पटत नाही. म्हणून कमीत कमी श्रमात optimum अभ्यास हवाय.

त्याला वाचनाची आवड आहे पण हिंदी वाचायला तयार नाही. जर चांगल्या प्रकाशनाची, लेखकांची interesting, pure (पाठ्यपुस्तकांत आहे तितके) हिंदी गोष्टीची पुस्तकं कोणी सुचवली तर बरं पडेल. दरवर्षी वर्षाच्या सुरुवातीला भयंकर गृहपाठ देऊन दाबून टाकतात , ती फेज शाळेत सुरू आहे. त्यामुळे खाली खेळायला आणि hw मध्ये सध्या जेमतेम अर्धा तास tv बघायला वेळ आहे. त्यात हिंदी बघ सांगणे अवघड आहे Sad सकाळी आणि रात्री 10-15 मिनिटे पुस्तकं वाचायला वेळ आहे. एक वेळेस हिंदीच पुस्तक वाच सांगू शकते . तर प्लिज चांगली त्याला आवडतील अशी पुस्तकं सुचवा. Wimpy kid and Geronimo types पुस्तकं त्याला आवडतात.

विषयांतराबद्दल क्षमस्व
मी असं गृहीत धरतोय की शिक्षणाचं माध्यम इंग्रजी, म्हणजे पहिली भाषा इंग्रजी आहे. दुसरी भाषा तुम्ही सांगितल्याप्रमाणे हिंदी आहे. मग मराठी तिसरी भाषा आहे का? दुसऱ्या, तिसऱ्या भाषा अनिवार्य आहेत की त्यांच्या ऐवजी इतर भाषा घेऊ शकतो? उदाहरणार्थ हिंदी ऐवजी फ्रेंच, मराठी ऐवजी संस्कृत वगैरे. जर अभ्यासक्रमात मराठी असेल तर हिंदी शिकायला सोपे पडेल.

तिसरी भाषा कन्नड आहे. ती आठवीपर्यंत असणार आहे. दुसरी भाषा फ्रेंच घेण्याचा पर्याय होता परंतु त्यालाच हिंदी हवी होती. संस्कृत चा पर्याय नव्हता. हिंदीचा फायदा हा आहे की निदान मला अडचणी आणि तो कुठे कमी पडतोय कळतंय. फ्रेंच घेतली असती तर सध्या कसं कन्नड ला मी अजिबातच काही मदत करू शकत नाही तसेच झाले असते. तीन वेगवेगळ्या लिपी आणि भाषा आहेत. English चा problem फक्त पहिलीला आला. हिंदी मात्र जरा दुर्लक्ष झालं किंवा माझा मी अभ्यास करतो वर विसंबून राहिलं तर लगेच मुळाक्षरे विसरायला होतात किंवा दोन मूलक्षरांमध्ये गफलत करायला लागतो, जोडाक्षरे चुकतात, वेगवेगळे रफार गडबड करतो.

हिंदी कधीपासून सुरू झालंय? पाचवीपासून की तिसरीपासून?

रोजचे संभाषण हिंदीत करा. (त्यासाठी तुमचं हिंदी चांगलं असायला हवं)

हिंदीत नम्रता जरा जास्त आहे. तुम ऐवजी आप, इ.इ. तुम्हालाही तसंच बोलावं लागेल.

जर होमवर्कमध्ये हिंदीचं लिखाण भरपूर होतंय, तर वेगळ्या लिखाणाची गरज नाही.

घरी पाठ्यपुस्तक वा जे काही लिहीत / वाचत असेल ते करताना मोठ्याने वाचायला सांगा. तसंच र्‍हस्व दीर्घाचे उच्चार, अनुस्वार यांचे उच्चार छापल्याप्रमाणे होताहेत की नाही हे पहा. म्हणजे यांच्या उच्चारांवरच भर द्या. पुढे न पाहता लिहिताना हे उच्चार डोक्यात असले की त्याप्रमाणे लिहायला हवं.

इथे मुंबईत हिंदी मातृभाषा नसलेली मुलेही एकमेकांशी बोलून बोलून शाळेत जायच्या आधीच हिंदी बोलायला शिकतात. त्यामुळे हे फार कठीण वाटू नये.

पहिलीपासून आहे हिंदी. तिसरिपर्यंत फक्त अक्षरओळख, बाराखडी, 3-4 शब्दांची वाक्य, थोडीफार जोडाक्षरे असा आनंदी प्रकार होता. अचानक चौथीला निबंध, पत्र, अपने शब्द मे लिखो सुरू झालं, लगेच त्याची घसरगुंडी झालेली. गेल्या वर्षी त्या शिक्षिकेने त्याला परत पाचवी लेव्हल ला आणलंय. आता त्यांची मदत मिळणार नाहीये. मला त्याची भाषा पक्की करायची आहे. ज्यामुळे त्याला मदतीची गरज पडायला नको. त्याला छान बोलता आणि वाचता येत, लिखाणाचा प्रॉब्लेम आणि शब्दसंग्रह अडचण आहे. त्याचा breakthrough कसा मिळवू? English मध्ये hooked on phonics नी अचानक जादू झाली होती.

घरी पाठ्यपुस्तक वा जे काही लिहीत / वाचत असेल ते करताना मोठ्याने वाचायला सांगा. तसंच र्‍हस्व दीर्घाचे उच्चार, अनुस्वार यांचे उच्चार छापल्याप्रमाणे होताहेत की नाही हे पहा. म्हणजे यांच्या उच्चारांवरच भर द्या. पुढे न पाहता लिहिताना हे उच्चार डोक्यात असले की त्याप्रमाणे लिहायला हवं. ---- हे नक्की करायला घेते.

इथे घराबाहेर सरसकट संभाषणाची भाषा English आहे. घरात आम्ही मराठी बोलतो. परंतु तो English ला पटकन respond / react करतो त्यामुळे कमी वेळात जास्त डोकफोड न करता त्याच्याशी संभाषण करायचं असेल तर English वापरतो Sad

हिंदीचा शब्दसंग्रह वाढवायला रोज एक (हळूहळू वाढवत न्या) नवा शब्द शिकायचा. हे शब्द रँडम न निवडता एकेका प्रकारचे घ्यायचे.
उदा : शरीराचे अवयव, झाडांचे भाग, प्राणीपक्ष्यांची नावे, क्रियापदे, विशेषणे, संख्या इत्यादी.
यासाठी हिंदीभाषक नसलेल्यांना इंग्रजीतून हिंदी शिकायची पुस्तके मिळत असावीत (मराठीसाठी मिळतात) ती तुम्ही वापरा (मुलगा स्वतः च वापरून शिकायच्या स्टेजला नाही असं वाटतं)

हिंदीत बोलताना हिंदीत विचार करायची सवय हवी.
जर हिंदीत बोलायला बोअर वाटत असेल, तर त्यात इंटरेस्ट निर्माण करायला ते नाटकी पद्धतीने बोलायचं. उदा : सैगलच्या काळातल्याप्रमाणे उच्चार Lol

या सगळ्या गोष्टी एकदम करू नका. हळूहळू स्टेप बाय स्टेप करा. आधी बोलणं (अर्थ पोचल्याशी कारण) , मग नीट वाचणं (उच्चार आणि मग शुद्धलेखन) आणि त्यानंतर लिखाण.

भाषा पक्की करायचा अ‍ॅप्रोच योग्य आहे. इतक्यात परीक्षेत कमी गुण मिळाले तर धीर सोडू नका. भरपूर वेळ आहे.

त्याला मराठी नाहीए, हे एकापरी बरं आहे कारण मराठीचे आणि हिंदीचे शुद्धलेखनाचे नियम फार वेगळे आहेत. मराठीने तत्सम शब्दांच पार मराठीकरण करून टाकलंय (र्‍हस्व अन्त्य इकार, उकाराचे दीर्घीकरण, मग त्यात पुन्हा अपवाद). हिंदीत मात्र तत्सम शब्द तसेच चालतात. यामुळे दोन भाषा एकत्र शिकताना गोंधळ होतो. शिवाय अनेक शब्दांचे लिंगही भाषापरत्वे बदलते.

नॅशनल बुक ट्रस्ट ची हिंदीत बरीच चांगली पुस्तके आहेत. माझा मुलगा चौथीतच आहे त्यामूळे माझ्याकडे त्याच वयोगटातली हिंदी पुस्तके आहेत.
एक व्याकरणाच्या पुस्तकाचा संच गेल्या वर्षी विकत घेतला होता व्याकरण रश्मि १, २, ३ नावाचा.
तसेच अनुच्छेद लेखन १, २ आणि अपठित गद्यांश ची पण पुस्तके घरात ठेवली आहेत. मधून अधून वापरली जातात.
( हवे असल्यास या पुस्तकांच्या प्रकाशकाचे डिटेल देवू शकेन)

भरत नी लिहिल्याप्रमाणे वाचताना, बोलताना उच्चारांवर भर देणे, तो प्रश्न उत्तरे लिहित असताना/ होमवर्क करत असताना र्हस्व - दिर्घ, जोडाक्षरे तोंडी विचारणे इ गोष्टींची शुद्धलेखनासाठी खूप मदत होते.

धन्यवाद srd,भरत, अल्पना, अजबराव.
I will check national book trust. please do share more options for hindi story books either writers and publication. For now, school grammar book is looking to be sufficient.

भरत दादा , मस्त टिप्स...

मी कधी हिंदी शिकलेच नाही शाळेत असताना.. तरी मी बरं हिंदी बोलते.. कारण हिंदी सिनेमे आणि हिंदी मालिका असावं... त्याला हिंदी कार्टून्स बघायला दिली तर फायदा होईल का?

चांग ले उच्च प्रतीचे हिंदी आणि सिनेमातले हिंदी ह्यात खूप फरक आहे. उच्चार व लेखन फॉल्ट लेस बनवायचे असेल तर प्रॅक्टिस करायला लागेल व धडे आणी कवितांमधली रीजनल सेन्सिबिलिटी समजून घ्यावी लागेल. क्धी कधी कविता खूप अवघड वाट तात पण ते साधे निसर्ग चित्र असू शकते. मुलांना दोहे कबीर, देव धर्म ह्याचे बेसिक नॉलेज पण कमी असू शकते. माझी मुलगी एथिस्ट असल्याने हा प्रश्न यायचा. बारा बलुतेदार आता शहरी मुलांना माहीत नस्तात. ते समजावून सांगावे लागते. सौ सुनारकी एक लोहारकी हे त्यांना वाचता येते पण कळत नाही.

चांग ले उच्च प्रतीचे हिंदी आणि सिनेमातले हिंदी ह्यात खूप फरक आहे
>>
अर्थातच !

हा मुद्दा या धाग्यावर अवांतर होईल बहुदा पण जर हिंदी मधे करिअर करायचं नसेल तर उच्चप्रतिचं हिंदी शिकून काय करायचंय? कामचलाऊ आलं की झालं..
शाळेत हिंदी दुसरी भाषा असल्याने कदाचित तेवढं हार्ड अ‍ॅण्ड फास्ट हिंदी नसलं तरी चालेल का? (मला अर्थातच माहीत नाहीये कारण मला अभ्यासक्रमात हिंदी नव्हतंच)

मी कदाचित हिंदी 'येणं' आणि हिंदी 'जमणं' यात गल्लत करतेय. मी आपली जास्त डोकं न लावता वाचते फक्त शांतपणे

शाळेत हिंदी दुसरी भाषा असल्याने कदाचित तेवढं हार्ड अ‍ॅण्ड फास्ट हिंदी नसलं तरी चालेल का?>. अहो बाई त्या मुलाला १०० मार्काचा पेपर आहे. आता समजा त्याला ६० मार्क मिळतच आहेत तर ते ७५ ८० परेन्त मिळा वेत त्यासाठी हिंदी चांगले येणे गरजेचे आहे. व्याकरण शुद्ध लेखन सुधारून १० मार्काचा फरक नक्की पडेल. आणि शब्द संग्रह वाढवून भाषेची ओव्हर ऑल जाण वाढवल्यास त्याला निबंध, पत्र लेख्न जास्त चांगले जमेल. त्या साठी उपलब्ध वेळात काय करता येइल ते सुचवले आहे. शुद्ध चांगली भाषा आली तर बरेच की. तेरेको क्या करनेका असे नको.

इथे (म्ह्णजे गुरगावात) इग्लिश, हिंदी आणि फ्रेंच्/जर्मन/Spanish पैकी एक अशा तीन भाषा आहेत. त्यातल्या दोन घ्याव्या लागतात आठवी नंतर. त्यामुळे हिंदी सोडता येते आठवीनंतर Happy

मला माहीत आहे हिन्दी शकवणारे शिक्षक इतर प्रदेशांत शाळेत मिळणे फार भाग्याचे असते ...
माझी मुलगी पण आंध्र प्रदेशात शिकत असल्याने मी सुद्धा या साठी अनेक उपद्व्याप केले आहेत.
आधी कॉमिक बुक्स चा बराच फायदा होतो (सचित्र असल्याने). हळू हळू शब्द संग्रह वाढेल तसा प्रेमचंद किंवा तत्सम लेखकांची / पुस्तकांची ओळख करून देणे.

ऑनलाइन हिन्दी कॉमिक बुक्स: http://www.comicdex.com/read-hindi-comics/
बाल साहित्यः http://www.gadyakosh.org/gk/index.php (डावी कडे खाली - अनुभाग > बाल कथाएं / प्रेरक कहानियां / व्यंग्य ...)
थोडं प्रगल्भ (प्रेमचंद): http://hindisamay.com/premchand%20samagra/Indexpremchand.htm

मी या बोर्डाचं पाठ्यपुस्तक ऑनलाइन मिळतंय का ते पाहत होतो. पाठ्यपुस्तक नाही, पण सिलॅबस मिळालं.
इथे पान ६५ पासून हिंदी सहावीची माहिती आहे.

सहावीला ते अप्पर प्रायमरी म्हणताहेत.

त्यात टीव्ही सोशल मीडिया इत्यादींचा उल्लेख आहे. अमिताभच्या केबीसी आणि अमीरच्या सत्यमेव जयते, मिळाले तर सुरभीचे , अंताक्षरीचे एपिसोड्स , दूरदर्शन-आकाशवाणीवरच्या बातम्या, इ.चा उपयोग होईल. हिंदी वृत्तपत्रांतही मुलांसाठी पुरवण्या असतीलच. त्या ऑनलाइन/ छापील वाचता येतील.

इतका का लोड... हिंदी सोपी आहे पास वायला...
आत्ता ६ वित आहे आतापासून १० वि चे टेन्शन तुमाला.. हे जास्त नाही वाटतंय का..

त्याला संकल्प नावाचे पुस्तक आहे. मी दहावी साठी लोड घेत नाहीये. दहावीला पूर्ण पेपर आहे म्हणजे optional नाही, न येऊन सुटका नाही. मुळात त्याची भाषा कशी सुधारू, त्याला गोडी कशी लागेल , त्यासाठी कसा अभ्यास करून घेऊ अशा शंका आहेत. स्वतः अभ्यास करता यायला लागला की मी अजिबात मध्ये पडणार नाही. सध्या थोडं दुर्लक्ष झालं की घसरगुंडी अशी परिस्थिती आहे. रोज हिंदीचा अभ्यास शेवटी करायला बसतोय कारण आवडत नाहीये. मी न सांगता अभ्यास केला पाहिजे. तितकी गोडी जर विषय शिक्षकाला लावता येत नसेल तर माझी जबाबदारी आहे. मी शिक्षिका नाही. त्यामुळे माझ्याकडे trick, technic आणि patience नाहीये Sad ते सगळं मी शिकायच्या प्रयत्नात आहे. तो पूर्णपणे शिक्षकाचा विद्यार्थी आहे. जो विषय शिक्षक छान शिकवतात म्हणून त्याला आवडतो, त्याचा hw शाळेतूनच करून येतो. आणि घरी न कुरकुरता revision करतो. ह्या status ला हिंदी आलं की मी हिंदीचा नाद सोडणार आहे Happy

हिंदी वृत्तपत्रांतही मुलांसाठी पुरवण्या असतीलच--- गुड आयडिया. इथे राजस्थान पत्रिका येतो तो वीकेंडला सुरू करते.
होतं काय की अति विचार झाला की साध्या-साध्या गोष्टी सुचत नाहीत Sad

सुरभी आहे ऑनलाईन https://youtu.be/DLlVFxZrkoQ
दर रविवारी थोडं थोडं पाहता येईल. शिवाय यातून माहितीही मिळेल.
प्रत्येक शब्द कळलाच पाहिजे असा हट्ट सुरुवातीलाच नको.

प्रतिसाद देणार्यांचे धन्यवाद. कर्नाटकात इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सुद्धा तिसरी भाषा कन्नड सक्तीची आहे का? जर सक्तीची असेल तर त्याबद्दल कन्नड मातृभाषा नसणाऱ्या विद्यार्थी/पालकांची प्रतिक्रिया आणि सरकार/शाळा ह्यांची भूमिका काय असते ह्याचे कुतूहल आहे. माझ्या प्रमाणे महाराष्ट्रात मराठी सक्तीची नाही. वेगवेगळ्या राज्यांमध्ये असे वेगवेगळे धोरण दिसते आहे. असो.
तुमच्या मुलाला चांगले हिंदी सिनेमे दाखवा. विमल रॉय, हृषीकेश मुखर्जी ह्यांच्या सिनेमांमध्ये चांगलं हिंदी असायचं.

@ राजसी, मुलाला हिंदी यावी म्हणून तुमचा किती जीव तुटतोय हो!!! तुमच्या प्रत्येक प्रतिसादागणिक तुम्ही ह्या प्रश्नावर किती कळकळीने विचार आणि प्रयत्न करताय ते जाणवतेय. आपल्या प्रयत्नाला माझा सलाम! ह्या वेळी मला ते प्रसिद्ध वाक्य बदलून म्हणावेसे वाटतेय, "राजसीसारखी आमुची आई असती, तर आम्हीही अजून शिकलो असतो." Happy

आमच्या शाळेत कन्नड सक्तीची नाही. पहिलीला दुसरी भाषा हिंदी /कन्नड पैकी एक निवडायची. पाचवीला परत हिंदी/कन्नड / फ्रेंच पैकी एक दुसरी भाषा आणि कन्नड/हिंदी पैकी एक तिसरी भाषा. पहिलीत निवडलेला पर्याय तुम्ही पाचवीला बदलू शकता. दुसरी आणि तिसरी भाषा वेगवेगळ्या हव्यात Happy आम्ही पहिलीत हिंदी निवडली आणि पाचवीत हिंदी continue करून, कन्नड तिसरी भाषा निवडली. पहिलीत हिंदी निवडायचा निर्णय आमचा होता आणि पाचवीत हिंदी continue करून कन्नड निवडायचा निर्णय त्याचा होता. हिंदी देवनागरी लिपी शिकता येईल आणि कन्नड स्थानिक भाषा म्हणून निवडलेल्या आहेत. पहिली ते चौथी आम्ही संस्कृत सुरु करा / पर्याय ठेवा म्हणून feedback दिला पण शाळेला काही ते जमले नाही.

@सचिन काळे, प्लिज झाडावर बसवू नका. त्याने होमवर्क-शीट आणि उत्तरपत्रिकेवर स्वतः हून स्वतः च नाव शुद्धलेखनाची चूक न करता देवनागरीत टाकायला पाहिजे. सध्या सांगितले तरी जाऊ दे ना! म्हणत रोमन मध्ये लिहितो.

धन्यवाद भरत, सुरभी नक्की दाखवीन. मला पण आवडायची. आम्ही दोघे एकत्र बघू शकतो असं काहीतरी पण मिळेल.

तो पूर्णपणे शिक्षकाचा विद्यार्थी आहे. >>>> हिंदी शिक्षिकेने शाळेत थट्टा वगैरे केलीये का? आणि राग, विषयावर निघतोय... गोडीगुलाबीत विचारून पहा.... ; विषयाबद्दल मनात अढी असेल तर, बाकीचे उपाय तितके यशस्वी होणार नाहीत

माझा मुलगा आता दुसरीत आहे. त्याला इंग्रजी, हिंदी, संस्कृत, कन्नड अशा ४ भाषा आहेत. पाचवीत एक कमी होईल आणि आठवीत अजून एक कमी होईल. अजून तरी बरं चाललंय. Happy कन्नडचाच जरा प्रश्न येतो.

अमा>+१

माझ्या मुलीचे हिंदी TV Serial बघुनच सुधारले आहे. सुरवातिला तारक मेहता सारख्या सिरियल , नंतर जुन्या सिरियल बरोबर अदालत , तसेच मराठी मधिल काहे दिया परदेस सारख्या सिरियल बघण्यात आल्याने शुध्ध हिंदी आणी बोली हिंदी मधिल फरक काय आहे ते कळले,
तसेच दर रविवारी अमेरिकेतिल एका युनिवर्सिटीच्या कम्युनिटी सेंट्रर मध्ये १ तासा साठी व्याकरण, निंबध, पत्रलेखन शिकायला जात होती.
ह्या सगळ्याचा जोरावर मागच्या आठवड्यात भारतात ८वीत हिंदी हा दुसरा विषय घेउन प्रवेश घेतला. दोन आठवड्याचा शाळेतिल अभ्यासामध्ये कविता सोडुन बाकीच्या गोष्टी समजायला त्रास होत नाही.
कविता मात्र आम्हालाच समोर बसुन शिकवाव्या लागतिल.
भाषा कमित कमी वेळात शिकता येत नाही त्याकरता वेळ द्यावा लागेल.
आठवड्यातुन तास भर व्याकरण, शुध्ध लेखन , पत्रलेखन, निंबध ह्या सारख्या गोष्टी शिकण्यासाठी वेळ द्या
मार्क कमी पडले तरी चालतिल पण त्याला भाषेची गोडी कशी निर्माण होईल ते बघा.

ऐच्छिक भाषांच्या माहिती बद्दल धन्यवाद. तुमच्या मुलाने स्वतः कन्नड भाषा निवडली आहे ह्याबद्दल कौतुक वाटते. जर तुम्ही कर्नाटकात स्थायिक झाला असाल तर तिथली भाषा शिकणे हे चांगले. दुर्दैवाने महाराष्ट्रात मराठीच्या बाबतीत अशी परिस्थिती नाही. असो. दहावीला अजून चार वर्षे आहेत. तोवर शिकेल तो. त्याचा interest वाढण्यासाठी काका हाथरसी सारख्यांच्या विनोदी कवितांची पुस्तके आणून देऊ शकता.