हा आलाच पाऊस

Submitted by प्रकाशसाळवी on 17 June, 2017 - 04:59

हा आलाच पाऊस...
----------------
आलाच एकदाचा जुनाच पाऊस
भिजवून गेला हा तुलाच पाऊस
**
कोसळल्या एकदा सरीवर सरी
आला घेउन हा मृदगंधच पाऊस
**
आदळल्या जणू सागरीच्या लाटा
बरसला हा नयनांचाच पाऊस
**
शब्द थेंब झाला ऋतूभरल्या वेदनांचा
आले आभाळ भरुन हा स्वप्नाचाच पाऊस
**
देउन अश्वासने मिटलेल्या लोचनांनी
सरसरुन आला हा बोलघेवडाच पाऊस
**
सांभाळ नागीण तुझी गं केवड्याची
डंख मारील गं हा विखारीच पाऊस
**
कधी हासविल कधी रडविल कधी फसविल
सखा बळीराजाचा हा नाचराच पाऊस
**
तुझं माझं जमेना तुज वाचून करमेना
तरीही म्हणावे हा आमचाच पाऊस
**
प्रकाश साळवी
१२-०६-२०१७
०९१५८२५६०५४

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोल घेवडा म्हणजे तोंडाने फक्त बोलणारा आणि जसे बोलतो तसे न वागणारा व्यर्थ बड बडणारा आणि पावसाच्या बाबतीत असे म्हणावे लागेल की आता पडेल असं वाटून न पडणारा