हसतायं ना?

Submitted by कृष्णा on 15 June, 2017 - 05:14

सकाळी गप्पांच्या धाग्यावर काय हसताय ना? हा प्रश्न वाचला आणि त्यावरुन सुचलेली ही कविता!

आम्ही नेहमीच हसत असतो
कधी इतरांवर कधी स्वतःवर
कधी आलेल्या संकटांवर
तर कधी मिळालेल्या वेदनांवर
कधी गमावलेल्या संधीवर
कधी कमावलेल्या व्याधीवर
कधी पाहिलेल्या अपघातावर
तर कधी सोसलेल्या आघातावर
कधी रुसलेल्या नशिबावर
कधी हसलेल्या दु:खावर
कधी फसलेल्या प्रयत्नावर
तर कधी नसलेल्या बळावर
आम्ही सततच हसत असतो
आमच्याच आमच्यातल्या आमच्यांवर

... किशोर

Group content visibility: 
Use group defaults

कृष्णाजी छान केलीये कविता... Happy
सकाळिच त्या बाफवर वाचलेली..बर झालं सेपरेट लिहिली,नाहितर वाहून गेली असती.. Proud

छान .

कृष्णा छान लिहिलस... Happy एकवेळ वाटलं च.ह.ये. मध्ये रिप्लेस झालास की काय बिचार्‍या निलेशच्या पोटावर पाय Proud

धन्यवाद कावेरि, रीया, दिपक, मानव, अक्षय, दक्षिणा, राहुल, पंडीत, भावना, अनघा आणि सर्वांना!

मी काही कवी नाही पण कधीतरी कुठेतरी काही सुचले की टाईपतो झालं !:)