विचारशील ना गं?..

Submitted by दिपक ०५ on 9 June, 2017 - 17:18

वेड्या मना... आजकाल माझ्या ताब्यात नाहिस तु..
आधि वाटलं..
अरे.. हि तर बेईमानी झाली ना?
याला थांबवायला हवं..

पण हळूहळू आता सवय झाले..
दिवसा स्वप्ने पाहायची,
तुला डोळे भरुन बघायची..

पण कधी कधी वाटतं..
हे असं किती दिवस चालनार?
किती दिवस तुला लांबुनच पाहनार?
तु जवळ आलीस कि खाली बघनार..

तुला खुप काही सांगु वाटतं गं..
पण तु समोर आलीस ना, हृदयाचे ठोके वाढतात माझ्या..
जनु ते मला हेच सांगु पाहतात..
कि आपल्या एका चुकीने हिची मैत्री सुध्दा गमावु शकते...

असतात गं अशी काही लोकं..
जी एखाद्यावर जिवापाड प्रेम करुनही,
त्या प्रेमाला कधि व्यक्त करत नाहीत..

आता तु विचारशील..
का?..
त्यांच्यात हिम्मत नसेल बहुतेक, पुढाकार घेण्याची...

हो तु असं म्हणू शकतीस..
पण मला असं वाटतं.. कि या लोकांच प्रेम तुम्हा मुलिनी ओळखायला हवं..
कारण यांना कशाचीही आशा नसते..
ते फक्त प्रेम करतात..
अगदी शेवटच्या श्वासा पर्यंत...

आता तु विचारशील, तुला हे सगळं कसं माहित?..

कारण मिही यातलाच आहे..
मिही वाट पाहतोय..
तु एक दिवस येशील, आनि विचरशिल..
दिप्प्या लग्न करनार का माझ्याशी??

विचारशील ना गं.....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आ दिपक! आवडलं Happy

तुला खुप काही सांगु वाटतं गं..
पण तु समोर आलीस ना, हृदयाचे ठोके वाढतात माझ्या..
जनु ते मला हेच सांगु पाहतात..
कि आपल्या एका चुकीने हिची मैत्री सुध्दा गमावु शकते...
असतात गं अशी काही लोकं..
जी एखाद्यावर जिवापाड प्रेम करुनही,
त्या प्रेमाला कधि व्यक्त करत नाहीत..

अगदी मनातलं लिहीलंय बरका. यावर माझा आणखी एक धागा नक्कीच. Happy

मिही वाट पाहतोय..
तु एक दिवस येशील, आनि विचरशिल..
दिप्या लग्न करनार का माझ्याशी?
....
असंच घडावं..शुभेच्छा!

मनापासून धन्यवाद राहुल...
पहिल्यांदाच positive response मिळाला...
धन्यवाद!..

आणि तुमच्या लेखाची वाट पाहत आहे..

<<<चांगले लिहीलेय.
जरा शुद्धलेखन बघाल का??>>>

- हो नक्कीच बघेन विनिताजी..

<<< 'सैराट' कधी पुर्ण होनार...??? >>>

लवकरच त्याचा शेवटचा भाग सादर करण्यात येईल..
प्रतिसाद चांगला मिळत नाहीये..

प्रतिसाद देण्यासाठी धन्यवाद!... अब्दुल हमीद..