त्या रात्री ......... (भाग ३)

Submitted by निर्झरा on 6 June, 2017 - 03:01

स्थळ – समीरच घर
समीर – ये सुजय, कालच्या मिटींगमधे काय झाल?
सुजय – समीर, तुझ्या साठी एक चांगली बातमी आहे. कालची मिटींग सक्सेसफुल झाली. लवकरच आपल पुढच काम सुरू होईल. पुढच्या आढवड्यात आपल अॅग्रिमेंट करायच ठरलय.
समीर – आज राधा असती तर किती खुष झाली असती…
सुजय – समीर…, हे बघ या प्रोजेक्टला आपण राधाचच नाव देणार आहोत. ती नेहमी आपल्याच बरोबर असेल. बर तु काही खाल्ल आहेस का?
समीर – ईच्छाच नाहिरे काही खायची. अॅना पण आज आली नाही.
सुजय – अरे म्हणून तु असा उपाशी राहू नकोस. मी मागवतो काहीतरी आपण दोघ जेवूयात.

स्थळ पोलीस स्टेशन
ई.अमित – जाधव त्या सुजयला ताबडतोब बोलावून घ्या आणी मला त्या इंटरननॅशनल कंपनीत फोन लावुन द्या. थोड बोलायचय त्यांच्याशी.
ह्.जाधव – शिंदे, त्या सुजय साहेबांना बोलवा ताबडतोब, म्हनाव साहेबांनी बोलवलय; साहेब त्या कंपनीत फोन लागलाय.
ई.अमित – हॅलो; मी ई.अमित फ्रॉम ईंडीया…….. ओके, थॅक्यू फॉर युवर कोऑपरेशन.
ह. शिंदे – ‘ओ जाधव’; साहेबांना सांगा मि.सुजय आलेत.
ई.अमित –. शिंदे पाठवा त्यांना आत.
सुजय – मला अत्ता ताबडतोब का बोलावल, काय झाल?
ई.अमित – काय आहे ना मि.सुजय तुमची ती अर्धवट राहीलेली माहिती आम्हाला आत्ता ऐकायची आहे. खुन्याच्या अजुन जवळ पोहोचण्यासाठी त्या माहीतीचा फार उपयोग होणार आहे. शिंदे, पुढचा काही वेळ कुणी डिस्टब करु नका.
सुजय – सर मी तुम्हाला सांगीतल की राधा मला आवडयला लागली होती. शेवटच्या वर्षी मी तिला प्रपोज करणार होतो, पण त्या आधीच….. राधा अशी निघेल अस वाटल न्हवत सर मला. तिच्या या प्रकरणामुळे मी तिला माझ्यापासुन दूर केल, फक्त मीच न्हवे तर आम्ही सर्वानी तिला एकट पाडल.
ई.अमित – मि.सुजय आता मी विचारेन त्या प्रश्नाची फक्त हो किंवा नाही अशी उत्तर द्या.

स्थळ लॅब
ई.अमित – अय्यर, माझा संशय खरा ठरला. तुम्ही दिलेल्या रिपोर्ट्वरून हे सिद्ध होऊ शकतय कि खुन कोणी केलाय.
अय्यर – खर तर यात मला तुमचीच मदत झाली. माझ फक्त थोडच काम बाकी आहे, ते झाल की लगेच सगळे पुरावे स्टेशनला पाठवून देतो.
ई.अमित – ओके अय्यर मी पुढच्या कामाला लगतो.

स्थळ पोलीस स्टेशन

ई.अमित – जाधव-शिंदे आपाला तपास अगदी योग्य दिशेने झाला, बस्स आता फक्त दोन दिवस वाट बघावी लागणार आणि खुनी आपल्या जाळ्यात अडकणार.
हवलदार जाधव – होय सर, सर एक विचारू का? हे फिंगरप्रिंटस तुम्हाला मिळाले कसे?
ई.अमित – अगदी योग्य प्रश्न केलात जाधव. सांगतो, सगळ सांगतो. अय्यरने मला सांगितल की तपासात घेतलेले एक फिंगरप्रिंटस कुणाशीच जुळत न्हवते. अॅंना, सुजय, राधाचे आई- वडील, समीर अजुन काही संशयित व्यक्ती हे सगळे यातुन बाद झाले. मला चैन पडत न्हवती जो पर्यन्त ते फिंगरप्रिंटस कुणाचे आहेत हे कळत न्हवत. तुम्हाला आठवतय जाधव; तुम्ही रुबी हॉटेल मधे जाऊन आलात पण फार काही माहीती तुम्हाला मिळाली नाही. मग मी अय्यरला घेऊन स्वता तिथे गेलो. त्या वेळी चौकशीत कळाले की पाच जणांपैकी दोन जणांची रुम अजुनही कूणाला दिलेली नाही; मग काय वेळ न घालवता आम्ही तिथे काही पुरवे मिळतायेत का ते बघितले आणि….. आणि जाधव तिथे जे पुरावे मिळाले ते आणि समीरच्या घरी दुस-यांदा आपल्याला मिळालेले पुरावे हे अय्यरनी तपासले.
हवलदार शिंदे – साहेब बाहेर अॅ्ना मॅडम आल्यात. तुम्हाला भेटायच म्हणतायत.
ई.अमित – वाटलच होत मला, अॅना काहीतरी लपवतीये आपल्या पासून. पाठवा आत तिला. ये अॅसना , बस , बोल काय सांगायचय.
अॅना – साहेब… मला अटक तर होणार नाहीना?
ई.अमित – का? अस का विचारतेस? तू ….. तू तर खुन केला नाहीसना?
अॅना – नाही नाही साहेब मी ; मी खुन नाही केला मॅडमचा. फक्त त्या दिवशी चौकशीत मी बरच काही लपवल तुमच्या पासन. त्या दिवसापासून मला चैन पडत न्हवती. नुसता राधा मॅडमचा चेहरा समोर यायचा आणि मला विनंती करायचा. खर बोल म्हणुन. मी खुप घाबरले होते. हिम्मत होत न्हवती. आज कशीबशी हिम्मत जुळवली.
ई.अमित – हे बघ अॅना रडू, नको तुला जे काही माहीती आहे ते अम्हाला सांग, तुला काहीही होणार नाही याची मी तुला खात्री देतो.
अॅना – साहेब काही सांगण्याआधी माझ्या फोन मधला हा व्हिडीओ बघा.
ई.अमित – अॅना हे सगळ तु आधीच सांगायला हव होतस. ठिक आहे , अजुनही वेळ गेली नाहिये. आता तू जाऊ शकतेस, फक्त आम्ही सांगे पर्यन्त तू आत्ता जे काही सांगीतलस हे अजुन कुणाला सांगू नकोस.
हवलदार जाधव – साहेब, आपल्याला वाटल की खुनी मिळाला पण आता या अॅनाचा फोन बघून अस वाटतय की अजूनही कूठतरी पाणी मुरतय.
ई.अमित – हम्म, जाधव , आपल्याला परत एकदा या केसचा तपास करावा लागणार आहे. माझा संशय खोटा ठरला. ही अॅना अजूनही आपल्यापासून बरच कही लपवतीये. शोधून काढायला हव. चला, शिंदेना बरोबर घ्या पुढच्या तपासाला.

स्थळ – समीरच घर
समीर - या ई.अमित आम्ही सगळे तुमचीच वाट बघतोय. हे काय तुम्ही एकटेच दिसताय, खुनी कुठे आहे.
ई.अमित – समीर, खुनी आमच्या सापळ्यात अडकलाय. थोड्याच वेळात तुमच्या समोर खुनी हजर होईल. त्या आधी मला तुम्हाला काही सांगायचय.
समीर - बोला काय सांगायचय.
ई.अमित – मी जे सांगणार आहे त्याने कदाचीत तुम्ही फार दुखावला जाणार आहत. पण तुम्हाला हे सगळ सांगावच लागणार आहे.
समीर – सांगा, माझी ऐकायची तयारी आहे.
सुजय – ई. साहेब आम्ही ईथ थांबल तर चालेल की…
ई.अमित – तुमच सगळ्यांच ईथ थांबण म्हत्वाचच आहे मि.सुजय.
राधाचे आई वडील – म्हणजे आम्ही समजलो नाही.
ई.अमित – मी तुमच्या सगळ्यांची चौकशी केली; त्या वेळी तुम्ही बरीच माहीती माझ्या पासुन लपवुन ठेवली. पण आमचा तपास चालूच होता आम्हाला हवी ती माहीती आम्ही मिळवलीच.
समीर – ई. अमित जरा सविस्तर सांगाल का? मला तर काय घडतय ते काहीच कळत नाहीये.
ई.अमित – ऐका समीर, चौकशी दरम्यान आम्हाला मि.सुजय कडुन राधा बद्दल ब-याच गोष्टी कळाल्या. ज्या तुम्हाला पण माहीत नाहीत, आणी राधाच्या आई-वडीलांनी पण त्या तुम्हाला कधीच कळू दिल्या नाहीत. तुमच्या पासुन त्या लपवण्यात आल्या होत्या. खर तर तुम्ही सुद्धा थोडी माहीती लपवलीत आमच्या पासन.
समीर – मी? नाही ई.अमित मी सगळ सांगीतल तुम्हाला.
ई.अमित – समीर मी तुम्हाला तुमच्या वैवाहीक जीवनाबद्दल विचारला होत. त्यात तुम्ही मला तुमच्या सुरुवातीच्या आयुष्याबद्दल सांगितल नाहीत.
समीर – तुम्ही कशाबद्दल बोलताय, मी काय लपवल तुमच्या पासन
ई.अमित – तुमचे आणि राधा मॅडमचे लग्ना नंतर लगेच नवरा बायकोचे संबध न्हवते. ही गोष्ट जरा खटकण्या सारखी आहे नाही का ?
समीर – ईनस्पेक्टर साहेब मला सांगा, या सगळ्याचा राधाच्या खुनाशी काय संबंध आहे ? आणि हा निर्णय आमचा दोघांचा होता. राधानी स्वता माझ्याकडे वेळ मागितला होता. त्यात नवल अस काहीच नाही. प्रत्येक मुलीला लग्नानंतर नवर्याशी जुळवून घ्यायला वेळ लागतोच. मी तो वेळ तिला दिला यात खटकण्यासारख काय आहे ?
ई.अमित – ते पुढे कळेलच.
ह्.जाधव – साहेब, मी मॅडमना घेऊन आलोय. त्या गाडीतुन ऊतरायला तयार नाहीत,
ई.अमित – ह्म्म्म, वाटलच होत मला. चला मीच येतो.
( ई.अमित एलीशाला घेउन येतात ; सुजय आणी राधाचे आई- वडील एकत्र तिला बघुन ओरडतात)
एलीशा……..
समीर – सुजय तुम्ही सगळे हीला ओळखता? कोण आहे ही, आणी राधाच्या खुनाशी हिचा काय संबंध? हीने मारल माझ्या राधाला?
ई.अमित – समीर शांत व्हा. सगळ कळेल तुम्हाला. बोला एलीशा मॅडम तुम्ही स्वताहुन सांगताय की आम्ही…
एलीशा – राधाचा खुन ? कधी झाला? मला तर यातल कहीच माहीत नाही. हे बघा तुम्ही मला ईथे का आणल आहे ?, हा सगळा काय प्रकार आहे? ईनस्पेक्टर तुम्ही कशा बद्दल विचारताय? आणि मला ईथे एका क्लायंटला भेटायला पाठवलय माझ्या कंपनीनी. माझी आत्ता मिटींग आहे. बाहेर त्यांची गाडी उभी आहे.
ई.अमित – एलीशा मॅडम, तो क्लायंट मीच आहे. मीच तुमच्या कंपनीत फोन करून तुम्हाला ईथे पाठवायला सांगितल, आणी बाहेरची गाडी ही पोलिसांचीच आहे. तुम्हाला ईथे आणे पर्यन्त कूठलाही संशय येउ नये म्हणून आम्हाला हे नाटक कराव लागल. आता सांगा राधाचा खुन तुम्ही का केलात ?
एलीशा – काय ? मी , नाही-नाही मला तर यातल काहीच माहीत नाही.
ई.अमित – हे बघा आता खोट बोलू नका आमच्या कडे तसे पुरावे आहेत.
एलीशा – पण मी तर गेले दोन वर्ष राधाला भेटलेच नाहीये.
ई.अमित – मग राधाचा खुन झाला त्या वेळी तुम्ही या बंगल्यात कशा होत्या, आम्हाला तसे पुरावे मिळालेत
एलीशा – शक्यच नाही. मी तर ईथे कधीच आले नाही.
ई.अमित – बरोब्बर; तुम्हीतर खरच आमची दिशाभुल केली होती. पण शेवटी आम्ही तुमच्या पर्यन्त पोहोचलोच. तुमच्या कंपनीतुन तुम्हाला मिळालेला हा मोमेन्टो आम्हाला राधाच्या बेडरूम मधे मिळाला. तुमचा गुन्हा आता सिध्द झालाय. सांगा का मारलत तुमच्या मैत्रीणीला ?
समीर – ई.अमित, सुजय अरे हे काय चाललय नक्की? हिच्या बद्दल राधा कधीच काही बोलली नाही मला. कुठली मैत्रीण आहे ही राधाची.
ई.अमित – मॅडम बोला आता. सांगा यांना तुमच आणि राधा मॅडमच नातं काय ते,
एलीशा – सांगते सगळ सांगते राधाच नी माझ नात काय ते पण सांगते; पण तरीही मी राधाचा खुन केला नाही. मला ही गोष्ट ईथे आल्यावरच कळतीये.
मी आणी राधा शाळेमधे असल्यापासून आमची मैत्री होती. माझे वडिल न्हवते. त्या मुळे आई नोकरी साठी बराच वेळ बाहेर असायची. मग मी राधाला अभ्यासाठी आणि खेळण्यासाठी माझ्या घरी बोलवायची. तेव्हापासूनच आमची घट्ट मैत्री झाली. कुठलीही गोष्ट करायची झाली की राधा माझ्या सोबत असायचीच. कॉलेजला पण आम्ही एकत्रच अॅपडमीशन घेतल. खर तर राधाला मी जे फिल्ड निवडल होत त्या फिल्ड् मधे यायच न्हवत. तिला ईंजिनिअरिंग करायच होत. पण माझ्यासाठी तिने तिच फिल्ड बदलल.
मी कॉलेजला गेल्यावर तर आईच घराकडे अजुनच लक्ष कमी झाल. माझ आता बर्याच गोष्टी कळायच वय झाल होत. त्यामूळे आईच्या काही गोष्टवर मला संशय यायला लागला. एक दिवस हा संशय खरा ठरला. आई तिच्या एका मित्राला त्या दिवशी घरी घेऊन आली, माझी ओळख करून द्यायला. ईतके दिवस माझी काळजी घेणारी आई, माझी आई एका क्षणात मला परकी झाली अस वाटल. राधाला मी याबद्दल सांगीतल. तिने माझी समजूत घातली. आईच्या बाजूनेही विचार करायला सांगीतल. मला पण ते पटल, पण कुठेतरी माझी आई माझ्यापासून दूर झालिये हे मनातून जात न्हवत. मला त्या वेळी राधाचा खुप आधार मिळाला.
खर तर राधाचा स्वभाव नेहमीच मला आवडायचा, बिनधास्त, मनमोकळा. मी आधीपासूनच तिच्या स्वभावच्या प्रेमात पडले होते. पण या घटने नंतर मी तिच्या प्रेमात पडले. नकळत मला राधा आवडू लागली ही गोष्ट मी तिला सांगीतली. राधाला पहिल्यांदी या बद्दल जरा विचित्रच वाटल, तिने यावर विचार करायला खुप वेळ घेतला. पण मग मी तिला समजावल सतत तिच्या मागे लागले. हळू हळू तिलाही मी आवडू लागले. आमच मैत्रीच नातं प्रेमात बदलल. सुजय पण आमच्याच कॉलेज मधे होता. त्याच राधावर प्रेम होत हे आम्हाला ठाऊक होत. त्यामुळे राधा त्याला नेहमी टाळायची. एक दिवस सुजयला आमच्या नात्याबद्दल कळाल आणि ही गोष्ट आमच्या मित्र-मैत्रीणींना कळाली तेव्हा त्यांनी आमच्याशी संब्ंध तोडुन टाकला. कारण आपल्याकडे अजुन अशा नात्याला मान्यता नाही. अशा वेळी मग आम्ही अजुनच एक-मेकींच्यात गुंतून राहिला लागलो.
सुजय अनेक वेळा राधाला माझ्यापसुन दुर करू पाहायचा, मग त्याने पण काही ऊपयोग होत नाही म्हणल्यावर राधाशी संपर्क तोडला. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी मला पुढच्या शिक्षणासाठी परदेशी जाण्याची स्ंधी आली. राधा त्यावेळी खुप दुखी झाली. मलाही तिला सोडुन जायच न्हवत. पण दुसरा पर्याय न्हवता. मी तिची समजुत घातली.
माझा जायचा दिवस जवळ आला, जायच्या आधी तिने मला तिच्या घरी जेवायला बोलावले. मी तिथे पोहचले तेव्हा घरात काका-काकु न्हवते. राधाने सांगितल की त्यांना अचानक एका कामासाठी जाव लगल. त्या दिवशी मी आणि राधा एकमेकींच्या बाहूपाशात होतो. पहिल्यांदाच आम्ही एक- मेकींच्या ईतक्या जवळ आलो होतो. वाटल आता आम्हाला कुणीच दूर करू शकत नाही. तेवढ्यात काकू अचानक दार उघडून आत आल्या. आम्हाला अशा अवस्थेत बघुन त्यांच्या सगळा प्रकार लक्षात आला. आम्हाला त्या खुप ओरडल्या.
त्याच वेळी त्यांना हार्ट अटॅक आला. राधा डॉक्टरांशी फोनवर बोलत असताना काकुंनी मला तिथून निघुन जायला सांगीतल; एक मेकींना कधीच भेटायच नाही अस त्यांनी सांगीतल. त्यांची अवस्था बघता मी तिथुन त्या वेळी निघुन गेले. दुस्-या दिवशी माझ फ्लाईट होत. मी माझ्या कामच्या ठिकाणी पोहचले. त्या नंतर अनेक वेळा राधाशी फोनवर बोलायचा प्रयत्न केला, पण काका बोलू द्यायचे नाहीत. आठ दिवसांन्ंतर मी पुन्हा एकदा राधाला फोन केला. त्या दिवशी काका-काकू घरी न्हवते, त्या मुळे मी राधाशी बोलु शकले. मी गेल्या नंतर तिला खुप मारल होत. तिच लग्न पण ठरवुन टाकल होत. तिने मला सांगीतल की ती नाही म्हणत असताना देखील तिला बळनी लग्नाला तयार केल. आई साठी तिला अस कराव लागत होत.
हे सगळ ऐकल्यावर मला तिची खुप काळजी वाटू लगली, पण मला परत येण शक्य न्हवत. तोपर्यन्त काहीतरी उपाय शोधण जरुरी होत. मी एक प्लान केला, तिला लग्न करायाला सांगीतल, सहा महिने कसे बसे काढ अस सांगितल मी सहा महिन्यांनी परत येणार होते. त्या वेळी बघु काय करायच ते अस सांगीतल. राधा पण या साठी तयार झाली.
नव-याला कुठलाही संशय येउ नये म्हणुन ती त्याची बायको प्रमाणे सर्व काळजी घ्यायची. तिने समीर कडून हे वचनही घेतल होत की जो पर्यन्त ती सांगत नाही तो पर्यन्त त्यांच्यात नवरा-बायकोचे संब्ंध राहणार नाहीत. तोही लगेच या साठी तयार झाला. आमचा प्लान ईतक्या पटकन सक्सेस होईल अस वाटल न्हवत. समीरनी तो फारच सोपा केला. अधुन मधुन मी तिला फोन कारायचे. मी सहा महिन्यांन ऐवजी चार महिन्यातच परत आले. वेळे आधीच माझा कोर्स पुर्ण झाला होता. समीर घरात नसताना मी राधाला भेटायचे. त्याला यातल काही कळू नये त्या साठी तिने घरातील सगळे नोकरही कढुन टाकले. आम्हाला आमचा एकांत मिळायला लागला होता. तरी राधाला सतत समीरची एक अनामिक अशी भिती वाटायची. कारण तो कुठल्याही वेळी घरी यायचा राधाला सर्प्राईज करण्यासाठी, किंवा सुजयला राधाच्या काही सह्या घ्यायला पाठवायचा. त्यामुळे मनात असुन सुद्धा अम्हाला एक मेकींच्या जवळ येता यायच नाही. मी याला क्ंटाळले होते. समीरला सोडुन दे म्हणुन मी राधाला सांगितल. तिने त्या साठी थोडा वेळ माझ्याकडे मागितला. तिला त्याला न दुखवता हे सगळ करायच होत.
या सगळ्यात दोन महिने कसे गेले ते कळलच नाही. एक दिवस मला त्या ईंटरनॅशनल कंपनीतून फोन आला, त्यांनी मला जॉब ऑफर केला होता. माझा परर्फॉर्मन्स त्यांना आवडला होता. लगेच जॉईन व्हा म्हणून सांगीतले. मलाही हा जॉब हवा होता, परत एकदा राधाचा विचार डोक्यात आला; या वेळी तिला पण बरोबर घेऊन जायच अस ठरवल. राधाला याची कल्पना दिली. मी पुढे जाऊन मग दोन महिन्याने राधाला तिकडे बोलावुन घेणार होते. तिला पण मी तिथे जॉबला लावुन घेणार होते. आमच सगळ पक्क ठरल होत. अजुन दोनच महीने राधाला समीर सोबत काढायचे होते.
मी तिकडे पोहोचल्यावर राधाला फोन करायचे. पण का कुणास ठाऊक, काही दिवसांनी राधा माझ्याशी नीट बोलत नाही अस मला वाटल. मला जाऊन दोन महीने झाले होते, ठरल्या प्रमाणे मी राधाला माझ्याच क्ंपनीत जॉबची ऑफर मिळवली. तिलाही लगेच एका महिन्यात जॉईन व्हायला सांगीतल. मी खुप खुष झाले होते. एकदा तिच्याशी फोनवर बोलताना तिने मला सांगीतल की ही ऑफर ती घेऊ शकत नाही. त्या वेळी मी तिच्यावर खुप चिडले. त्यानंतर अनेक वेळा मी तिला समजवायचा प्रयत्न केला. हळू हळू ती माझ्याशी फोनवर बोलण टाळू लागली.
मग एक दिवस तिने मला धक्कादायक बातमी दिली, ती समीरच्या प्रेमात पडायला लागली होती, त्याचा स्वभाव, त्याचा समजुतदार पणा, तिला त्याला अजुन फसवायच न्हवत. तिने स्वताला त्याच्या स्वाधीन करायच ठरवल होत. लग्नाला केवळ सहाच महिने झाले आणी समीर नी अशी काय जादू केली की राधा मला सोडून त्याचा विचार करू लागली, मला टाळू लागली? मला आता समीरचा खुप राग आला होता. मी त्याला आमच्या मार्गातून दूर करायच ठरवल. जॉबच्या अॅगग्रीमेंट प्रमाणे मी वर्षभर भारतात येऊ शकत न्हवते, त्या मूळे वाट बघण्याशिवाय माझ्याकडे काहीच ऊरल न्हवत. बघता –बघता एक वर्ष होत आल. कामाच्या नादात मलाही राधाला फोन करायला वेळ मिळायचा नाही. अचानक मला कळाल की भारतातल्या एका क्लाय्ंटला भेटायला मला आणि ऑफिसमधल्या काही जणांना पाठवणार आहेत. चार दिवसांसाठी आम्ही ईथे येणार होतो. हे ऐकून मी खुष झाले आणि हीच बातमी सांगायला मी राधाला फोन केला.
पण राधा माझ्यावरच चिडली, मला येऊ नको म्हणाली. मी तिला समजवण्याचा खुप प्रयत्न केला, पण ती काहीच ऐकून घ्यायला तयार न्हवती. कसही करून राधाला भेटण म्हत्वाच होत, म्ह्णून मग मी तिला खोट सांगीतल की मला आमच्यातल सगळ संपवायचय त्या साठी एकदाच तिला भेटायचय, तेव्हा कुठे ती मला भेटायला तयार झाली. त्या दिवशी आम्ही अर्धा तास फोनवर बोलत होतो. तेव्हाच मनाशी ठरवून टाकल, समीरला सगळ सांगायचा आणी राधाला कायमच आपल्या बरोबर घेऊन जायच. त्या आधी राधाला विश्वासात घेण गरजेच होत.
समीर – तुझा माझ्यावर राग होता, तिच्यावर तर तुझ प्रेम होतना? तर मग तु राधाला का मारलस?

एलीशा – हो; माझ प्रेम अजूनही आहे तिच्यावर, मी खरच राधाला नाही मारल. खर तर मी खुप स्ंतापले होते तिच्यावर. त्या दिवशी क्लायंटबरोबर मिटींग संपवून सगळे जण पार्टीसाठी बाहेर गेले. मी मात्र राधाला भेटायला आले. मला वाटल होत की मला बघितल्यावर राधा पुन्हा जुन्या आठवणीत जाईल. कस बस तिला समजावून मी परत तिला माझ्या प्रेमात पाडेल. माझा हा समज तिने खोटा पाडला. मी तिला जुन्या आठवणी सांगून तिच मन माझ्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत होते; ती मात्र सारख समीर बद्दलच बोलत होती. तिच घर कौतूकान दाखवत होती. त्यांचा बिझनेस, समीरच तिच्यावर असलेल प्रेम, तो तिची घेणारी काळजी. मला कळून चुकल की राधा आत्ता माझ काहीही ऐकणार नाही.
आम्ही गप्पा मारत मारत त्यांच्या बेडरूम मधे गेलो. बेडवर लोळता-लोळता मी माझ्या जॉबच कौतूक करत होते. मी माझी तिकडची प्रोग्रेस तिला सांगत होते. आमच्यासाठी खरेदी केलल्या घराबद्द्ल मी तिला सांगत होते. माझ्या चांगल्या परफॉरमन्स साठी मला नुकताच मिळालेल मोमेन्टो पण तिला दाखवल, पण त्याला साध हातात घेऊन पण तिने बघितल नाही. ते तसच बेडच्या बाजुला पडुन राहील. मला याच खुप वाईट वाटल. मग मी गप्पांचा विषय बदलला. माझ्या ऐवजी समीर बद्दल तिच्याशी बोलू लागले. गप्पा मारता मारता तिच्या नकळत मी माझा हात तिच्या अंगावर टकला, समीरच्या कौतुकात तिला हे लक्षातही नाही आल, मी या संधीचा फायदा घ्यायचा ठरवल. मी तिच्या अजुन जवळ गेले आणी तोच तिने मला एकदम दूर ढकलले.
ती माझ काही ऐकायलाच तयार न्हवती. आमच नातं तिन एकदम तोडुन टाकल. अस कस करू शकते ती ? मी परत एकदा तिला खुप समजावल, ती काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत न्हवती. तो येईल तो येईल एवढच ती बोलत होती. बोलता बोलता अचानक ती रडायला लागली. माझी माफी मागायला लागली.
त्या वेळी मला तिची खुप दया आली. मी तिला समजवल. शांत केल. ती अस का करतेय हे पण विचारल. त्यावर तिने फक्त एवढच उत्तर दिल की काकूंच्या तब्येतीसाठी म्हणजे तिच्या आईच्या साठी तिला अस कराव लागतय. आणि आता तिला माझ्या बरोबर मनात असून सुद्धा येता येणार नाही कारण………; तिला दिवस गेले होते. तिनी मला तिच्या प्रेगन्सी बद्दल सांगितल; तेव्हा तर…. मला काहीच सुचत न्हवत, सगळ एका क्षणात संपल होत; आता राधा परत मला मिळु शकत नाही याची मला खात्री झाली आणी मी तिला विसरून जायच ठरवल. कारण मला तिला खुष बघायच होत. तिच्या सुखातच माझ सुख होत. शेवटी मी तिला आता या पुढे कधीच भेटणार नाही म्हणुन सांगीतल आणि तिथुन निघुन गेले. त्याच गडबडीत माझा मोमेन्टो तिथेच राहीला. स्ंध्याकाळी पाच वाजेपर्यन्त मला परत हॉटेलवर पोहोचायच होत. कारण रात्रीच माझ फ्लाईट होत. मी दुखी मनानेच परत माघारी फिरले. मी तिचा खुन नाही केला.
समीर – ई.अमित, जर एलीशाने राधाचा खून केला नाही तर मग…; आता लवकर सांगाल का खुन कोणी केला ते?
ई.अमित – जाधव, ते पुरावे घेऊन या ईकडे.
सुजय – समीर शांत हो. राधाचा खुनी सगळ्यांसमोर येणारच आहे.
ई.अमित – मि.समीर हे पुरावे बघून सांगा खुनी ओळखता येतोय का?
समीर – पण हे तुम्ही मला का विचारताय?,हे तर तुमच काम आहे. अणि या सगळ्या वस्तूतर माझ्याच आहेत, म्हणजे तुम्ही मला…. मला राधाचा खुनी समजताय? केवळ या वस्तू माझ्या आहेत म्हणुन? या वरून मी राधाचा खुन केला हे कस सिद्ध होईल. या तर माझ्या घरातल्याच वस्तू आहेत आणि यावर माझे फिंगरप्रिंटस तर असणारच. केवळ या वरून तुम्ही माझ्यावर संशय घेताय?
ई.अमित – हो, तुमच्या वर आमचा संशय आहे. केवळ या वस्तुंमुळे न्ह्वे. अजुन काही कारण आहेत तुम्ही तुमच्या बायकोचा खुन करण्याची; तुम्हीच मारलत तुमच्या बायकोला.
समीर – मी का मारेन तिला? माझ तर खुप प्रेम होत तिच्यावर. मी कसा तिचा खुन करेन; आणि तसही तिचा खुन झाला तेव्हा मी मिटींग मधे होतो.
ई.अमित – पण काही वेळासाठी तुम्ही ऑफिसच्या बाहेर पडला होतात. साधारण ६-३० वाजण्याच्या सुमारास. आम्ही ऑफिस मधुन तसे सगळे रेकॉर्ड्स मिळवलेत.
समीर – हो मी बाहेर गेलो होतो. पण मी खुन करायला घरी आलो न्हवतो. मी आमच्या मिटींगसंदर्भात काही महत्वाच्या कामासाठी बाहेर पडलो होतो. तुम्हाला हव तर मी तसा पुरावा देऊ शकतो.
राधाची आई – ईनस्पेक्टर साहेब अहो काय चालु आहे हे? एकदा एलीशा आता समीर, तुम्ही नक्की सांगणार आहत का खुनी कोण आहे ते?
ई.अमित – माफ करा मिसेस पाटिल….. तुम्हाला कळालेच असेल कि राधा दोन महिन्यांची प्रेगनन्ट होती.
राधाची आई – हो, तुमच्या पोस्टमार्टम रिपोर्टमुळे ते आम्हाला कळाल.
ई.अमित – याच कारणामुळे समीरनी तिला मारल?

(http://www.maayboli.com/node/62731 त्या रत्री भाग १)
(http://www.maayboli.com/node/62745 त्या रात्री भाग २)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

mast!

मला वाटत समीरमध्ये पण काहितरी प्रॉब्लेम असेल अन राधा सुजयपासुन प्रेग्नंट असणार अन हे समीरला कळले म्हणुन त्यानेच राधाला मारले

मी मानिनी >> +१
माझेही तेच मत आहे. समीर इम्पोटेंट असेल म्हणून त्याला खात्री पटलीय की हे मूल त्याचे नाही अन् त्याच रागात प्लॅन करून स्वताच्या बायकोचा खून घडवलाय.