गाण्याच्या रेकॉर्डिंग संदर्भात मार्गदर्शन हवे आहे

Submitted by चैतन्य दीक्षित on 5 June, 2017 - 06:16

नमस्कार मंडळी,

मी एका बोरकरांच्या कवितेला चाल लावली आहे.
त्याचं रेकॉर्डिंग मला करायचं आहे. इथल्या तज्ञ मंडळींकडून मार्गदर्शन हवे आहे.

मी स्वतः बासरी स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केली आहे (स्टुडिओ रेकॉर्डिंगचा अनुभव आहे, वेळखाऊ काम आहे, इत्यादी कल्पना आहे)
तरी पूर्णपणे एखादे गाणे फ्रॉम स्क्रॅच रेकॉर्ड करण्याचा अनुभव शून्य आहे.
कवितेच्या शब्दांना चाल लावली आहे आणि गाण्याच्या हिशेबात महत्वाचे असलेले
प्रील्यूड, इंटरल्यूड वगैरेही बसवले आहेत. कोणती वाद्ये वापरावीत याबाबतही थोडी कल्पना आहे.

एका ओळखीच्या स्टुडिओ रेकॉर्डिस्टला भेटलो असता, म्युझिक अरेन्जरशी संपर्क साधून
पायलट ट्यून तयार करून घेण्याचा सल्ला मिळाला. हा सल्ला कितपत मानावा? अशी शंका आहे.
म्युझिक अरेन्जर वेगळे पैसे आकारेल हा मुद्दा बाजूला ठेवला तरी
म्युझिक अरेन्जरची खरंच गरज कितपत आहे? असा प्रश्न आहे.
म्युझिक अरेन्जर नक्की काय काय करतो?

वेगळा म्युझिक अरेन्जर नेमावा का?
आणि गाणं रेकॉर्ड करण्याची प्रोसेस टप्प्या टप्प्याने कुणी समजावून देवू शकेल का?

~ चैतन्य दीक्षित

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

म्युझिक अ‍ॅरेंजर नक्की काय काय करतो हे लक्षात घेतले तर कदाचित प्रश्नांची उत्तर सुटतील -
मूळ चाल ऐकून त्या बरहुकूम, एम ०, एम १, एम २ तयार करणे, त्यात कोणती वाद्ये असावीत, ताल कसा असावा, कोणता साईड र्‍हिदम असावा, मधले पिसेस किती वेळाचे असावे. हे मेन काम. आणि मग हे सगळे वाजवणारे कोण कोण, त्यांची प्रॅक्टीस करुन घेणे, योग्य तो परिणाम साधला जातो आहे की नाही ते बघणे. ऐन वेळेस एक माणूस नसेल तर दुसरा उभा करणे,

ह्यातील काही गोष्टी तुमच्याकडे कच्च्या तरी तयार आहेत, त्यामुळे त्याच्यासाठी दुसरा कोणी असावाच असे नाही. पण दुसरा कोणी तरी असेल तर त्यांची त्या बाबतीतील वेगळी मते लक्षात येऊन अजून चांगले काही हाती लागते.

आमच्या घरी घडलेल्या रेकॉर्डिंगची प्रोसेस काहीशी अशी - मूळ चाल झाल्यावर बर्‍याच वेळेस आजोबा स्वतःच पीसेस काढतात, पण त्याच बरोबर कोण कोण वाजवणारे आहेत त्यांचे इनपूट्स खूप महत्वाचे ठरतात. कारण आजोबांचे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य असते. आणि बरीच वर्षे त्यांच्याबरोबर कुठेतरी काम केल्यामुळे कश्याप्रकारचे पीसेस हवे असतात त्याची कल्पना असल्याने बहुतेक वेळेस त्यात काही बदल करावा लागत नाही.. वादकांच्या वेळेनुसार जसे जमेल तसे बेसिक गाणे ऐकून आणि कोणाला काय वाजवायचे आहे त्याची एखादी प्रॅक्टीस होती. नंतर गायक वादक हे सगळे एकत्र येऊन त्यांची पण एक किंवा दोन वेळा प्रॅक्टीस होते. ह्यानंतर स्टुडिओत सगळे जमल्यावर तिथे एक दोन रिहर्सल्स आणि मग फायनल टेक. अर्थात इथे सगळे वादक एकत्र येऊन वाजवतात आणि गाणे तयार होते.

सध्याच्या नवीन प्रकारात ज्याला जसा वेळ मिळेल तसे येऊन रेकॉर्डिंग करतात, तिथे काय घडते किंवा घडू शकते त्याची फारशी कल्पना नाही..

धन्यवाद हिम्सकूल..
म्युझिक अरेंजरच्या कामाचे स्वरूप लक्षात आले.
सगळे एकत्र रेकॉर्ड करणे जमले तर उत्तमच होईल असे वाटते आहे. बघूया कसे होतेय ते.

रेकॅार्डींग स्टुडिओ पैसे घेऊन काम करतो आणि बय्राचदा मोठ्या लोकांसाठी त्यामुळे ते काम उत्तमच व्हावे या अपेक्षेनेच करतो. शिवाय स्टुडिओचा वेळ वाया जाऊ नये हेसुद्धा आहेच.

तुमचे कविता वाचन/ गायन एकट्याचे आहे त्यात साथवाद्ये महत्त्वाची नाहीत असे मला वाटते. हा मुद्दा पटला आणि अशी बरीच रेकॅार्डिंग करणार असाल तर घरीच एक साउंडप्रुफ काचेचा बूद बनवून मोबाइलवर करता येईल. रेकॅार्डिंग अॅप्स बरीच आहेत परंतू १) wave format .wave / full - non compressed करणारी वापरा . mp3नको. २) रेकॅार्डिंग करताना decibel level दाखवणारी सोय हवी. ७० -८० डेसिबेल उत्तम ३) फाइल अॅपमध्ये न राहता मेमरी कार्डावर आली पाहिजे.
तिन्ही सोयी एकाच अॅपमध्ये हव्यात . मी विंडोजवरचे the sound recorder वापरून पक्षांचे आवाजही रेकॅार्ड करतो. यामध्ये mono आणि stereo पर्यायसुद्धा आहे. ( फोनचा माइक्रोफोन चांगला असणेही गरजेचे आहेच. लुमिआचा आहेच.)

Srd, प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
रेकॉर्डिंग घरीच करायचे नाही. स्टुडिओमध्ये करायचे आहे, त्यात अरेंजरचा नक्की रोल ठाऊक नसल्याने साशंक होतो.
हिम्सकूलच्या प्रतिसादाने काहीशी स्पष्टता आली आहे.