नावं सुचवा

Submitted by VB on 29 May, 2017 - 03:58

मला माझ्या भाचीसाठी नाव सुचवा प्लिज...
शक्यतो नाव लहान असावे, उच्चारायला एकदम सोपे आणी अर्थ सुंदर असावा.

अजुन एक "स" या अक्षरावरुन नाव नाही ठेवायचेय

राशी ( मीन ) अक्षरं - द ध च

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शक्यतो नाव लहान असावे, उच्चारायला एकदम सोपे आणी अर्थ सुंदर असावा. अस आहे सुरुवातीला Happy

गजोधर,
दिर्घिका हे नाव unique वाटतेय. दिर्घिका म्हणजे Galaxy ना?

पण एवढ्याश्या पिल्लाला उच्चारायला पण किती अवघड>>>> अजिबात नाही
२ वर्षाची वैगेरे झाल्यावर दिघीका असं ठसक्यात सांगेल Happy

दित्या , मी ही आमच्या नातेवाईकांमध्ये एकीच ऐकल आहे .
मला स्वताला ते दैत्याच्या फार जवळ उच्चार असणार असल्यामुळे आवडत नाही Happy

नावं विचारताना माबोकरांचा सल्ला घेताय , बारशानंतर पेढे नको , निदान नाव काय ठेवलं हे तरी नक्की कळवा Happy .
बर्याच जणांनी या पूर्वीही नावासाठी सल्ले विचारले , मग ते नाव हॉटेल्साठी असो , मुलांसाठी , दूकानासाठी , एखाद्या दूसर्याच प्रोजेक्ट्साठी . .पण एखाद दूसरा अपवाद वगळता कोणी नाव ठेवल्यानंतर आम्हाला कळवल्याचे आठवत नाही Happy .

@ स्वस्ति >>>

अस्मि हे नाव ठेवायचे ठरलेय आमचे, १३ तारखेला ठेवलाय बारसा

मस्तय नाव Happy आणखी एका माबोकरणीच्या मुलीचं नाव अस्मि आहे :*
मला फार आवडतं

@ स्वस्ति >>>
अस्मि हे नाव ठेवायचे ठरलेय आमचे, १३ तारखेला ठेवलाय बारसा >>> वा ! मस्तच आहे नाव . मलाही फार आवडतं.

द ध च वरुन नाही का ठेवले >> ५ नावांच्या चिठ्ठया केल्या होत्या त्यापैकी आमच्या पिल्लाने ह्याच नावाची चिठ्ठी ऊचलली
एका अर्थी तिचे नाव तिनेच ठेवलेय

Pages