शेयर मार्केट मधील थोड्या कालावधीच्या गुंतवणुकीसाठी कोणता मार्ग सर्वात सुरक्षित?

Submitted by कूटस्थ on 15 May, 2017 - 11:31

माझे एक जवळचे नातेवाईक नुकतेच निवृत्त झाले आहेत. त्यांना त्यांच्या फंड मधील काही रक्कम गुंतवायची आहे. सध्या फिक्स्ड डिपॉजिट चे दर कमी झाले आहेत आणि शेयर मार्केट चांगला परतावा देत आहे त्यामुळे त्यांची रुची मार्केट मध्ये थोडी वाढली आहे. परंतु वयाचा विचार करता त्यांनी थोडीच रक्कम तीही २-३ वर्षासाठी गुंतवायचे ठरवले आहे. परंतु ती गुंतवणूक देखील त्यांना सुरक्षित (very low to low risk category) , जमेल तेवढी चांगला परतावा देणारी, आणि शक्य असल्यास कमीत कमी मिळकत कर लागणारी हवी आहे. त्याबाबत थोडेसे संशोधन करून त्यांनी म्युच्युअल फंड घेण्याचे ठरवले आहे परंतु त्यांचे काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरे ते (आणि मला विचारल्यामुळे पर्यायाने मीपण) शोधत आहेत. कोणी जाणकार यावर थोडा प्रकाश टाकू शकेल का? प्रश्न खालीलप्रमाणे:
१. परताव्यासाठी (कालावधी १-३ वर्षे) Debt Oriented Balanced Fund मधील MIP Conservative (Monthly Income Plan-Conservative with 0-15% of portfolio in equity) योग्य कि Debt Fund योग्य?
२. १-३ वर्षाच्या कालावधीसाठी प्राप्तिकराच्या दृष्टीने कोणता फंड प्रकार योग्य: Balanced Fund (Debt Oriented), Debt Fund or GILT Fund ?
३. सध्याची परिस्थिती पाहता (low interest rate, low/moderate inflation) Debt Fund or GILT Fund हे ३ वर्षाच्या कालावधीसाठी १०% च्या वर परतावा देऊ शकतील अशी शक्यता किती आहे?

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

Please go through value researchonline.com you will get good information. If your bank relationship managsrs try to sell you sone schemes dont fall for it. Value research also gives ratings to funds

धन्यवाद अमा. मी तुम्ही सांगितलेली वेबसाईट आधी पाहिलीये. परंतु वरील प्रश्नाची समाधानकारक उत्तरे नाही मिळाली.
"If your bank relationship managsrs try to sell you sone schemes dont fall for it" ----> अगदी बरोबर. म्हणूनच कोणाला काही सांगण्याआधी मी पण स्वतः थोडा research करतोय. फंड कोणता घ्यावा हे ठरवण्यासाठी चांगल्या वेबसाईट पुन्हा पाहीनच. परंतु त्याआधी फंड ची category (e.g. Debt Fund, or MIP Fund or GILT Fund) ठरवतोय.

Check out this website: TheFundoo - One of the best fund screener where you can use many parameters to filter funds accordingly.

म्युचुअल फंड चा 'लोड' शॉर्ट टर्म साठी खूप जास्तं पडेल आणि लिक्विडिटीही लिमिटेड. तुम्ही एखादा म्युफ. झीरो डाऊन केला असेल आणि सेम एक्स्पोझर देणारा ईटीएफ मार्केट मध्ये ऊपलब्ध असेल तर ईटीएफ कधीही प्रीफरेबल. हे झाले जनरल विधान.

रिटायरी (लोअर अ‍ॅबिलिटी टू टेक रिस्क) आणि शॉर्ट टर्म रिटर्न एक्स्पेक्टेशन (हायर विलिंगनेस टू टेक रिस्क) हे थोडे रिस्की गुणोत्तर आहे. माझ्या मते लाईफ एक्स्पेक्टन्सी कंसिडर करून (ऊदा. ८२ वर्षे) त्यांच्या अ‍ॅन्युअल एक्स्पेन्सेस ची प्रेझँट वॅल्यू काढून (पेंशन येत असल्यास ती मायनस करून, आजारपणाचे , लगन कार्याचे खर्च गृहीत धरून) तेवढे हाय रेटेड डेट फंड मध्ये टाकून द्यावे. भारतामध्ये ईन्फ्लेशन ही जोरदार असते तर त्यातलेच काही ईफ्लेशन अ‍ॅडजस्टींग बाँड मध्येही टाकू शकता (रिटर्न थोडा कमी असेल पण महागाईवर थोडे कवर) आणि मग वरचा सरप्लस ईक्विटी मध्ये ग्रोथ आणि डिविडंंड ईन्कम (ईथेही ईन्फ्लेशन कवर मिळेलच) साठी जो वरचेवर मार्केटची दिशा ठरवून सेमी अ‍ॅक्टिवली मॅनेज करता येईल.
त्यांचे संपूर्ण रिटायरमेंट अकाऊंट आणि ओवरऑल रिस्क/ रिटर्न ऑबजेक्टिवज साईड बाय साईड बघणे जरूरी आहे. पिरॅमिड स्ट्र्क्चर मध्ये गोल बेस्ड ईन्वेस्टिंग नेहमीच रिस्की आणि सबऑप्टिमल रिटर्नच देणार.
जर त्यांचा दुसरा काही ईन्कम सोर्स नसेल जसे शेती, दुसरे घर, मुलांची मदत किंवा ईनहेरिटन्स ई. तर प्रोफेशनलची मदत घेणे हितावह. आहे ती रक्कम सिक्युअर करणे, लायबिलिटीज बरोबरच वाढत्या महागाई ला आणि टॅक्सला लक्षात ठेवून ती रक्कम घटणार नाही ह्याची तजवीज करणे आणि मग ग्रोथ एक्स्पेक्ट करणे असे चढ्त्या प्रमाणे ऑबजेक्टिवज हवेत.

शीर्षकात शेयर मार्केट म्हटलं असलं तरी त्या गृहस्थांना शेयर आणि रोखे बाजार आणि त्याहीपेक्षा म्युच्यल फंड म्हणायचं असावं, असं दिसतंय.

आधी न विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर : तीन वर्षांची अट शिथील करता आली, तर त्यांना इक्विटी फंडमध्ये गुंतवणूक करता येईल. अर्थात त्यासाठी नित्य खर्चाची, आकस्मिक खर्चाची आणि पुढल्या ८-१० वर्षांतल्या नियोजित खर्चाची तरतूद करून झाल्यावर, थोडक्यात जे पैसे पुढली ८-१० वर्ष लागणार नाहीत, अशा उरलेल्या रकमेतले त्यांना झेपतील (धोका पत्करायची क्षमता), रुचतील (धोका पत्करण्याची वा न पत्करण्याची प्रवृत्ती) इतके पैसे ते डायव्हर्सिफाइड इक्विटी किंवा इक्विटी ओरिएंटेड बॅलन्स्ड फंडात गुंतवू शकतील.

आता विचारलेल्या प्रश्नांबद्दल - तीन वर्षांचा कालावधी आणि जोखीमक्षमता कमीतकमी गृहीत धरून

१. टॉप १० G-sec फंड्सनी गेल्या वर्षभरात १३-१७% तर ३ वर्षांत १२-१३% इतका परतावा दिलाय.
टॉप १० डायनॅमिक बाँड फंड्सनी वर्षभरात १०.५ ते १४% आणि तीन वर्षांत १०.७५ ते १२.५% इतका परतावा दिलाय.
टॉप १० कन्हर्व्हेटिव्ह मंथली इन्कम प्लान्स -एक वर्ष १३-२०% तर ३ वर्षांत १२ ते १६.७५%.
टॉप १० अ‍ॅग्रेसिव्ह मंथली इन्कम प्लान्स - एक वर्ष १६-२१% तर ३ वर्षांत १२.७५ ते १५.७५%
गेले वर्षभर तरी व्याज दरांमध्ये कपात अपेक्षित असल्याने त्याचा परिणाम या रिटर्न्समध्ये दिसत असेलच. पण गेल्या पॉलिसी रिव्ह्युत रिझर्व बँकेने इतक्यात तरी आणखी व्याज दर कपात होणार नसल्याचे सांगितले आहे.

वर वर्णन केल्यावरून त्यांची जोखीमक्षमता /कल खूपच कमी वाटतोय, त्यामुळे मी डायनॅमिक बाँड फंड सुचवेन. कोणत्या प्रकारच्या फंडांत किती परतावा होता ते लिहिलेच आहे.
शेअर बाजार (इक्विटी) सध्या उच्चांकांवर आहे. आणि भारतीय शेअर्स सध्या जगातल्या सर्वाधिक महागड्या शेअर्सपैकी आहेत. त्यामुळे कमी कालावधीसाठी इक्विटीमध्ये लावायला थोडा उशीर झाला असे वाटते. जर मन्थली इन्कम प्लान मध्ये गुंतवायचे असतील, तर सहा महिन्यांत टप्प्याटप्प्याने गुंतवावेत असे सुचवेन.

२ तुमच्या दुसर्‍या प्रश्नाचं उत्तर हे की तिन्ही प्रकारचे फंड्स प्राप्तिकराच्या दृष्टीने एकसारखेच आहेत.
बँक फिक्स्ड डिपॉझिट किंवा तत्सम प्रकारात मिळणारे व्याज करपात्र आहे. जर त्या गृहस्थांचं उत्पन्न करपात्र असून ३०% वाल्या ब्रॅकेटमध्ये बसत असेल, तर त्यांना डेब्ट फंड हे कराच्या दृष्टिने फायदेशीर होतील. ग्रोथ ऑप्शन निवडला तर ३ वर्षंवरच्या गुंतवणुकीला लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक लागेल. डिव्हिडंड पेआउट ऑप्शन घेतला, तर त्यांना मिळणारा डिव्हिंडंड टॅक्स फ्री असेल, पण फंडच्या एन ए व्हीतून २८+% इतका डिव्हिडंड डिस्ट्रिब्युशन टॅक्स कापला जाईल. त्यामुळे ग्रोथ ऑप्शनच अधिक फायदेशीर आहे. (इक्विटी फंड सध्या तरी टॅक्सच्या दृष्टीने अधिक फायदेशीर आहेत)

३. तुमच्या तिसर्‍या प्रश्नाचं उत्तर वरच्या आकडेवारीत आहे.( past performance is not an indicator of future results असलं तरी) अगदीच अनपेक्षित घडामोडी नसल्या तर किमान १०% परतावा मिळायला हवा. किंवा बँक रेट +२% परतावा अपेक्षित आहे.

डेट फंड हे एफ्डी पेक्षा जास्त परतावा देतात हे कंडीशनल सत्य आहे.

डेट फंडात गुंतवणुक करताना काळजी घ्यावी. डेट फंडाचा परतावा रेपो रेट कमी होत असताना चांगला असतो. रेपोरेट वाढायला लागले तर डेट फंडा चा परतावा बराच कमी होऊ शकतो.

तसेच डेट फंड निवडताना, त्यांचा पोर्टफोलिओ काय आहे हे बघणे गरजेचे आहे. गेल्या २-३ महिन्यात एका डेट फंडला घेतलेले कंपनीचे बाँड राइट ऑफ करायला लागल्यामुळे एनेव्ही मधे १० टक्के घट झाली होति

एनेव्ही मधे १० टक्के घट झाली होति >> अरे बापरे.
हाय यील्ड च्या नादात क्रेडिट रिस्क (रेटिंग) कडे दुर्लक्ष केले तर हे असे होउ शकते.
चांगला माहितीपूर्ण प्रतिसाद भरत.

मुद्देसूद आणि विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद भरत!
"गेल्या २-३ महिन्यात एका डेट फंडला घेतलेले कंपनीचे बाँड राइट ऑफ करायला लागल्यामुळे एनेव्ही मधे १० टक्के घट झाली होति" >>> शक्यतो बॉंड ग्रेड्स AA आणि त्याहून वर असलेल्या बॉंड च्या फंड मध्येच गुंतवणूक करावी असे वाचले होते. टोचा, कोणता डेट फंड आणि शक्य झाल्यास कोणत्या कंपनीचे बॉंड राइट ऑफ करायला लागले होते याची माहिती द्याल का?

टोचा बहुधा याबद्दल बोलत असावेत.

फंडच्या रिस्क रेटिंगप्रमाणेच कॉर्पस ही बघायला हवं. तसंच कॉन्सन्ट्रेशन - डायव्हर्सिफिकेशनच्या विरुद्ध. फंडनी एका कंपनीत, एका सेक्टरमध्येच जास्त गुंतवणूक केलेली नाही ना, हे पाहायला हवे.

व्याज दरांतल्या चढ उताराचा फंडच्या मूल्यावर परिणाम होतो हे बरोबर. पण डायनॅमिक डेब्ट फंड व्याज दराच्या चढ उताराप्रमाणे आपल्या गुंतवणुकीचं ड्युरेशन (रोख्यांच्या मुदतपूर्तीसाठीचा कालावधी) कमी अधिक करून व्याज दरातील बदलांचा परिणाम कमी होईल असा प्रयत्न करतात. पण अर्थातच रिझर्व बँकेच्या धोरणाबद्दलचा त्यांचा अंदाज किती बरोबर ठरतो, यावर त्यातले यश अवलंबून आहे.
तसेही व्याज दरांच्या चढ उतारांचे एक चक्र पूर्ण होईल तेव्हा त्याचे परिणाम इव्हन आउट होतील. पण तुमचा गुंतवणूक कालावधी तेवढा दीर्घ असायला हवा.
एफ एम पी म्हणजेच फिक्स्ड मॅच्युरिटी प्लान यांचा उद्देशही व्याजदरातील चढ उतारांचा परिणाम टाळणे हा आहे. पण यात लिक्विडिटी नाही. म्हणजे तुम्हाला हवे तेव्हा तुमची युनिट्स विकता येत नाहीत.

बरोबर आहे भरत. मी टॉरस फंड बद्दल च बोलत होतो.

सध्या रेपोरेट अजुन जास्तीत जास्त ०.५% कमी होऊ शकतो. पुढे जर चलनवाढ झाल्यामुळे रेपोरेट वाढायला लागले तर डेट फंडा चा परतावा कमी होइल.

ICICI PMS बद्दल माहिती हवी आहे, मोठी
गुंतवणूक करावी का? बॅंक वाले भरभरून बोलतात PMS बद्दल...