Submitted by Nidhii on 8 May, 2017 - 11:01
पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट पुर्ण झाल्या. आता इथे या चर्चा करुया. 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट पुर्ण झाल्या. आता इथे या चर्चा करुया. 
काही पॅच अप वगैरे होउन गिटार
काही पॅच अप वगैरे होउन गिटार/जॅझ/सनया वगैरे वाजायला लागल्या की परत येईल मॉनिका >>>> हो. काही सांगता येत नाही. कदाचित इशा आणि मा, या दोघींचीही लग्ने एकाच मांडवात दाखवतील. यांचा काही नेम नाही ...............
>>>इशा आणि मा, या दोघींचीही
>>>इशा आणि मा, या दोघींचीही लग्ने एकाच मांडवात दाखवतील. यांचा काही नेम नाही ............... >>
हा हा... कॉस्ट कटिंग...
सगळ्यांनी हि मालिका बघणं
सगळ्यांनी हि मालिका बघणं सोडलं का ? मा ईशाला दळवींकडे का घेऊन जाते ? वि ला भेटते का मा ?
मा इशाला दळवींकडे का नेते हे
मा इशाला दळवींकडे का नेते हे एक कोडंच आहे. तसेच आजी आजोबांना काहीही सांगत नाही व ते पण काहीही विचारत नाहीत.
विक्र्या आता आतून दार बंद करुन बसलंय.
सगळे काळजीत!
मा ची हेअर स्टाईल भयाण आहे. केसांचा गुंता झाल्या सारखा वाटतो. ती जट असते ना कुणा च्या केसांत तसे काहीसे वाटते! नाकातही रिंग घालून ठेवलीये.
दळवींकडे नॉर्मली अगदी लाडाची नात आल्या सारखे इशाचे स्वागत होते!
दळवींकडे नॉर्मली अगदी लाडाची
दळवींकडे नॉर्मली अगदी लाडाची नात आल्या सारखे इशाचे स्वागत होते! >>>>> हो ना . मधू काका ठीक आहे , पण गीता काकी सुद्धा ?? ती लोक घर सोडून गेलेले इशा मुळे हे सगळे विसरले .
मा ची हेअर स्टाईल भयाण आहे. केसांचा गुंता झाल्या सारखा वाटतो. ती जट असते ना कुणा च्या केसांत तसे काहीसे वाटते! >>>>> मागे कुणी लिहिले होते ना , ती इतकी मेगळट वाटते की तिला गदागदा हलवून तिचे केस विस्कटावेसे वाटतात.
पण ईशा गोड दाखवलीये!
खरंच...ही मा इतकी मेंगळटा सारखी का चालते- बोलते? त्राणच नाही तिच्यात काही!
आणि वि तर आता मनोरुग्ण....मा त्याला सावरणार - मग मा -वि- इशा यांचा त्रिकोणी संसार सुरु!
आत्या बाई काल कधी नव्हे ते जरा बर्या मूड मधे हासत बोलत होत्या मा शी!
पर्वा सकाळी सकाळी मा, ऐशा ला
पर्वा सकाळी सकाळी मा, ऐशा ला तयार करून बाहेर घेऊन चाललेली,
आजी आजोबांनी खोदून खोदून विचारले कुठे जातेयस म्हणून, पण हिने तपास तूर लागू दिली नाही, ऐशा च काम आहे म्हणून तिला घेऊन जातेय इतकेच सांगितले,
ती गेल्यावर आजी अजिबात विचारतात, हि मो कडे तर गेली नसेल? 3 यर्स मी सांभाळली आता तू सांभाळ सांगायला,
तर आजोबा म्हणतात , अगं मोनिकाला कुठे पत्ता आहे?
म्हणजे 3 यर्स मो बेपत्ता आहे, आणि कोणाला माहाती नाहीये, फेबु वगैरेंच्या दुनियेत असे कसे शक्य आहे ते तेच जाणोत.
इकडे दळावीच्या घरी 2 मुले, काकी, आणि 2 जे ना क्रिकेट खेळत आहेत घरी,
ती दोन्ही मुले काय भयाण घेतली आहेत,
आणि मानसी बाई तिकडे दाखल होतात
ती दोन्ही मुले काय भयाण घेतली
ती दोन्ही मुले काय भयाण घेतली आहेत,>>>
अतिभयाण ...
अजिब्बातच सूट होतं नाहीत...पहिलेवाले किती छान होती...छोटूही मस्त काम करायचा...
पण का बदलली असतील त्यांना ...३ वर्षांमधे एवधा चेन्ज
मा ची हेयर स्टाईल पन तिच्यासारखी मरगळलेली ...मला तर अस वातत त्या मा चा टक्कल करून टाकावा...
आजी अजोबांच्या घरात ती नवी
आजी अजोबांच्या घरात ती नवी पेईंग गेस्ट दाखवली आहे, तीच नाव काय? खुप छान सहज अभिनय करते. बर्यापैकी माहितीतला चेहरा आहे, पण नाव आठवत नाहिये.
शर्वरी पाटणकर ना?
शर्वरी पाटणकर ना?
४०५ आनंदवन मधे होती
आजी अजोबांच्या घरात ती नवी
आजी अजोबांच्या घरात ती नवी पेईंग गेस्ट दाखवली आहे, >> शर्वरी पाटणकर
पेइंग गेस्ट्चा रोल कशासाठी पण
पेइंग गेस्ट्चा रोल कशासाठी पण?
आज कुठून न्हवे ते ही मालिका
आज कुठून न्हवे ते ही मालिका बघितली तर हॉस्पिटल म्हंजे क्रांतचा जीव का प्रान(ण??) अस कायंस म्हणाली की ही मा...काय भयंकर बोलते ही बया..
आणि 3 वर्षात बदल काय झाला तर नाकात नथ आणि चष्मा म्हणे...आणि वर काय ते नाकातलं... नाकापेक्षा नथ जड...आणि मोठ्ठे झुमके.... कुठल्याही अँगल ने डॉक दिसत नाही ही मेंगळी...हे मा वै म... चेहऱ्यावरचं तेज नाही तर बाकीच्या आभूषणांचा काय प्रभाव पडणारे...घरातला ड्रेस घालून लिपस्टिक झुमके नथ करून कुठल्या तरी फंक्शनला चाललीये अस वाटत...
घरातला ड्रेस घालून लिपस्टिक
घरातला ड्रेस घालून लिपस्टिक झुमके नथ करून कुठल्या तरी फंक्शनला चाललीये अस वाटत...>> अगग
ती शर्वरीच को-रायटर आहे
ती शर्वरीच को-रायटर आहे सिरियलची! काही काही मन्डळी ब्रेक घेउन फिरायला गेलेत वाटत, सध्या (मराठी अॅक्ट्रेस मधे)पॉप्युलर अशी "आद्या" ची नोज रिन्ग घातलिये मानसिने, हेअरकट अजुनच विचित्र अजुनच बधिर दिसतेय मानसी , आखख्या सिरियल मधे एक निराश सुर होता आधिच आतातर अवकळा आल्यासारखे सगळे फिरत असतात.
मो आणि वि चा डिव्होर्स झालाय
मो आणि वि चा डिव्होर्स झालाय की नाही तेच कळलं नाही आत्तापर्यंत
जस्ट हॉरिबल प्रकार सुरु आहेत.
जस्ट हॉरिबल प्रकार सुरु आहेत. कल्पना शक्तीचा आणि कथानकाचा पूर्ण र्हास झालाय. प्रेक्षकांच्या डोक्याचा भुगा करताहेत. कुणी अजूनही बघत असाल तर कृपया पाहणं बंद करा. ती मोलकरीण व तिचे ड्वायलॉक्स ......................................... प्रेक्षकांच्या सहनशक्तीचा अपमान आहे !
काल का परवा एक सीन बघितला. एक
काल का परवा एक सीन बघितला. एक नविनच कोणीतरी बाई होती. मला वाटली ती नविन मो आहे. पण तेवढ्यात मो पण दिसली. नक्की काय चालू आहे?
मीतरी हि मालिका चालु झाली कि
मीतरी हि मालिका चालु झाली कि लगेच चॅनेल बदलुन चंद्र-नंदिनी पाहते स्टार प्लस वर खुप छान आहे मालिका
नवीन मो.....
नवीन मो.....
सध्या काय सुरू आहे?
सध्या काय सुरू आहे?

मी तर रोज रात्री १० ते १२ सोनी वर क्राईम पॅट्रोल पाहते. आणि ते रिअलिस्टिक चित्रण पाहिल्यावर शिरेलीतला ड्रामा पहायचे जीवावर येते
>>>कुणी अजूनही बघत असाल तर
>>>कुणी अजूनही बघत असाल तर कृपया पाहणं बंद करा.>> हो... आता जर राणा अंजलीच्या मालिकेत प्रोमो दाखवला तरच प्रोमो बघावा लागेल.... पण आता तर प्रोमो पण डोक्यात जातो मा आणि वि ला बघून...
मी तर रोज रात्री १० ते १२
मी तर रोज रात्री १० ते १२ सोनी वर क्राईम पॅट्रोल पाहते >>> क्रापे मी फक्त सतर्क बघते. १०० मला नाही आवडत.
खरच ! कुठल्याशा हिन्दी
खरच ! कुठल्याशा हिन्दी सिरियलस सारखे डॉयलॉग काय दाखवतायत , काय ते लॉजिक? मोनिकाला सगळे का टॉलरेट करतायत? तिच्या एन्ट्रिला ती गिता वर का डाफरते? हिचा काय सबन्ध? कुठल्या मराठी फॅमिलित अस किवा या लेवलच अस काही घडु शकत? सवान्द , देहबोलि सगळ सगळ बेक्कार !
टाइम लीप नंतर आजी नि दर्शन
टाइम लीप नंतर आजी नि दर्शन दिलेय का?
1) मो ला 3 वर्ष पूर्वी घराबाहेर काढलेली ती आता मोलकरणी सकट घरात का राहत आहे?
2) ३ वर्षा पूर्वी दाखल केलेल्या घटस्फोटाच्या केस चा काहीच प्रोग्रेस झाला नाही का?
3) वि ला डिप्रेशन येऊन नक्की किती काळ लोटलाय?
4) 3 वर्ष नंतर पण हॉस्पिटल मधल्या फाईल्स , रेकॉर्ड नीटनेटक्या ठेवायला आत्याना सिस्टम डेव्हलप करता आली नाही का?
5) मो ने वि ला क्रेडिट कार्ड चे 28k बिल दिले, म्हणजे 3 वर्ष याचे कार्ड घेऊन ती फिरत होती का? याने ते ब्लॉक का केले नाही?
This is an indicative and not complete list of questions
२. मोनिकाने उभय सहमतीने
२. मोनिकाने उभय सहमतीने घटस्फोटाला नकार दिला. विक्रान्त पुन्हा नवी केस करायला तयार नाही १. त्यामुळे मोनिका दळवींच्या नाकावर टिच्चून घरी परत. ३. दीड वर्ष. ४. नाही. मानसी was a pioneer. ती येण्यापूर्वीही त्यांच्याकडे सिस्टम नव्हती. ५. ती अजूनही त्याची बायको आहे, त्यामुळे असेल.
मोनिका नोकरी करतेय तरी नवऱ्याला क्रेडिट कार्ड म्हणून वापरतेय.
आजींचे उल्लेख येतात. हुतेक मोनिकाने तिला गावला पळवून लावले.
मोहनचं प्रोफेशन बदललंय की त्या अभिनेत्याच्या रिप्लेसमेंटचं ठरत नाहीए?
भरत....इतक्या वैतागाने
भरत....इतक्या वैतागाने विचारलेल्या रागातल्या प्रश्नांना इतक्या प्रामाणिक पणे उत्तरं दिली नाहीत तरी चालतंय...... !
ती उत्तरं अंडरस्टूड आहेत!
मोहन च्या अभिनेत्याच्या रिप्लेसमेंटचंच ठरत नाहीए बहुतेक. गीताकाकी पण महा बोअर आहे आताची!
काल हा भाग चूकून पाहिला.
काल हा भाग चूकून पाहिला.
मग फक्त फायली नीट लावायची म्हणून इतकं कवतिक? 
मो च्या नाकात भली मोठी नोजरिंग होती आणि उचक्या लागत होता, त्या प्रसंगात च १० मिनिटं गेली. विक्र्या मानसोपचार तज्ञा कडे बसला होता आणि मानसी चे कौतुक करत होता आणि म्हणत होता ती चे इतर काही महत्वाचे स्थान नाहि माझ्या आयुष्यात.
वाट्टेल ते..
अख्ख्या एपिसोडात बाकी कुणी दिसलं नाही मला हा विक्र्याचे वडील दिसले.
दक्षिणा.......
दक्षिणा.......

मी नाही पाहिलं हे....विक्र्या काय म्हणे...? की तिचं बाकी काही स्थान नाही त्याच्या आयुष्यात....? का ही ही.... लेखकाचे पॉईंटर्स गंडलेले आहेत... नवीन प्रोग्रामर सारखे...... अगदीच पाणी टाकणं सुरुय...त्यात मग कथानकाची पुरती वाट लागेना......................................
म्हणत होता ती चे इतर काही
म्हणत होता ती चे इतर काही महत्वाचे स्थान नाहि माझ्या आयुष्यात >>> तो डिप्रेशन मधे आहे. त्याची त्यासाठी ट्रिटमेंट चालू आहे. त्याला मा आवडते हे तो कबुल करत नाहिये किंवा त्याला ते कबुल करायचेच नाहिये म्हणून तो अस म्हणतो.
लेखकाचे पॉईंटर्स गंडलेले आहेत... नवीन प्रोग्रामर सारखे...... अगदीच पाणी टाकणं सुरुय...त्यात मग कथानकाची पुरती वाट >>> बाकी हे बरोबर आहे
Pages