भटकंतीचं नियोजन-भाग १ (खास तुमच्यासाठी)

Submitted by उदे on 4 May, 2017 - 02:35

नियमित क्रीडालेखन करीत असताना नव्वदीच्या दशकात मी दिल्लीहून प्रकाशित होणारा 'पायोनियर' हा पेपर घेत असे. त्याकाळी मुंबईत दिल्लीचा 'पायोनियर' अक्षरशः मिळवावा लागत असे. 'पायोनियर' मधे माझ्या आवडीच्या खूपच गोष्टी येत. त्यांच्या साप्ताहिक पुरवणीत 'छोटा ब्रेक' नावाचं छोटुकलं सदर प्रसिद्ध होत असे. दिल्लीहून दर शनिवारी-रविवारी कुठे भटकंती करायची याची माहिती त्यात असायची. मला त्या अप्रसिद्ध परंतु नितांतसुंदरम्हणून वर्णिलेल्या स्थळांबद्दल आकर्षण वाटू लागलं. त्यातलीच काही पर्यटनस्थळं साद घालू लागली.भेट देण्यासाठी खुणावू लागली.
IMG_6542.JPG
साहजिकच 'त्या' पर्यटनस्थळांच्या मार्गावरून जाणारा बेत मनात आखला जाऊ लागला. सहज विचारता विचारता एकमेकांना सुपरिचित अशा ६ जणांनी (एका सुमो त बसतील एवढी माणसं ) ट्रेक करायचा ठरला. रोज सुमो तला प्रवास आणि रोजचाच ट्रेक असा १६ दिवसांचा कार्यक्रम ठरला.
IMG_6543.JPG
नेहेमीप्रमाणे आमचं आम्हीच आयोजन करणार असल्याने सर्वात प्रथम मी 'पायोनियर' मधल्या 'त्या' निवडक पर्यटन स्थळांच्या कात्रणांची झेरॉक्स काढून सर्वांना वाटली. आपला रूट आपणच आखायचा हा निर्णय पक्का असल्याने मग छोट्या छोट्या गावांच्या अंतरादरम्यानचे तपशील काढणं सुरु झालं. हळूहळू कागदपत्रं वाढू लागली. आम्ही अगदी आलटून पालटून प्रत्येकाच्या घरी मिटिंगा -बिटिंगा घेऊन आमच्या रूट वर खल करू लागलो. मग नवीन गावं ,नवीन नावं,नवीन अंतर या सर्वांची भर पडून,अनेक सुधारणा मान्य करून (बोलतोय तेवढं हे सोप्प् नव्हतं!) त्यावर एकमत झालं.
FullSizeRender (2).jpg
त्यानंतर राहायचं कुठे?गाईड कुठला?आणि मुख्य जायचं कसं? हे प्रश्न होते. आमचे आम्ही जाणार असल्याने आम्ही त्यावेळी वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये 'गढवाल निगम' गाठलं. त्यांना आमचा कार्यक्रम दाखवला. तिकडचा मुख्य अधिकारी म्हणाला,'हा उलटा कार्यक्रम आहे.' म्हटलं असाच करायचाय. म्हणाला हरकत नाही.आमच्या गढवाल निगम च्या रमणीय संकुलात तुम्हाला रोज राहता येईल. खाता पिता येईल. गाईड देखील मिळेल. गाडी? तर म्हणाला सुमो तुम्हा सर्वांना बरी पडेल. रोजचे २३५० होतील (१९९९ साली!) !तुम्ही प्रवासात असा अथवा नसा. राजधानी तून तुम्ही उतरलात कि तुम्हाला तो पिकअप करेल. दौरा संपल्यावर वेळेत दिल्लीला सोडेल.
FullSizeRender (3).jpg
आम्ही खुश झालो. सर्व खर्चिक झालं असलं तरी निदान आयोजन तरी मनासारखं झालं असं आम्हाला वाटलं.
IMG_6546.JPG
आता पुढचं काम म्हंजेआमच्या कामाचं 'ब्रॅण्डिंग!'
कार्यक्रम एका कागदावर घेऊन आम्हा सर्वांच्या अद्याक्षरांनी म्हणजे, स्वाती-उदय,राजन-स्मिता, आराधना-विनय,यांच्या 'सुरसाव' ट्रेकर्सनी आमच्या या 'पत्री'मोहिमेचा शुभारंभ झाला. आमचा हा कार्यक्रम अचूक असा ठरवल्याने आणि अनेक प्रश्नोत्तरांच्या कसोट्या पार केल्याने आजही कुणाला वेगळ्या रीतीने 'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स'ला जायचं असलं तर अगदी डोळे मिटून आडवाटेने जात येईल इतकंच या ठिकाणी म्हणू शकतो!
IMG_6550.JPG
आमच्या नियोजनामध्ये ८ दिवसांचे ८ ट्रेक्स तर खाली दिलेललेच आहेत. परंतु त्याशिवाय,चीलाचा जंगल ट्रेक, फुरकुंडा चा छोटा ट्रेक, उल्कागढी चा छोटा ट्रेक,असे आणखीही छोटे छोटे ट्रेक्स आम्ही केले. ते या माहितीपत्रकात नाहीत.
IMG_6547.JPG
चिलाचं जंगल, परदेशात आल्याची जाणीव करून देणारी खिरसु येथील देखणी घरं ,इंग्लिश पावरी असं स्पेल्लिंग होणारं पण उच्चार मात्र 'पौडी' असा होणारं देखणं गाव,खांडुसीन मधील टेरेस फार्मिंग,ती अविस्मरणीय फुलोंकी घाटी,धाप लागूनही १५००० फुटांवर चढल्याचा आनंद देणारं हेमकुंडसाहिब, औली-गोपेश्वर-चोपता मार्गावरील धबधबे, लांबवर उद्या मारणारी हरणे,नाचणारे मोर आणि हे स्वर्गीय दृश्य पाहतोय ते खरं कि खोटं असं वाटायला लावणारी भोवतालची परिस्थिती आणि केवळ आणि केवळ नक्षत्रांचं देणं असलेलं उखीमठ यांची आठवण मनातून निघणं केवळ अशक्य आहे.
IMG_6551.JPG
'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स'ला बरेच जण जातात.
एकदा जरा असं जाऊन बघा.
IMG_6545.JPG

-----------------उदय ठाकूरदेसाई
uthadesai.com

IMG_6551.JPG

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त प्लान. वर्ल्ड ट्रेड सेंटर मधल्या ' गढ्वाल निगम' मधे एवढी माहिती आणि मदत मिळाली हे मस्तच.

एखाद्या भारतवारीत यातल्या पैकी अर्धा तरी प्रवास करुन पाह्यचं मनात आहे

मेधा, गढवाल निगम मधील माहिती नेहमीची ठराविक असते. गढवाल निगमवाले म्हटलेलं,कबुल केलेलं देत नाहीत. ऐनवेळी घासाघीस करावी लागते. गाड्याही ऐनवेळी हरिद्वार किंवा ह्रिषीकेशला फारच स्वस्त मिळू शकतात.तरीही गढवाल निगमकडूनच जाणं चांगलं. कारण त्यांच्या निवासाची व्यवस्था खूपच चांगल्या ठिकाणी आहे. पहिला अर्धा प्रवास फारच मोहक आहे. तो तुम्ही जरूर करा. चिला,खिरसु,खांडुसीन,पौडी,हे विशेष करून पहा.

मेधा, प्रतिक्रियेच्या निमित्ताने तुम्हाला कळीचा मुद्दा सांगून झाला कि गढवालवाले बोलल्याप्रमाणे करतातच असे नाही.
दिनेश, माझ्या माहितीत आतल्या मार्गाने छोट्या गावांचा आस्वाद घेत पुढे जाणारे अजूनही फारसे दिसत नाहीत. या अर्थाने इंटरनेट च्या जमान्यातही तुम्ही थोडं वेगळं आखून गेलात तर फारच बहार येते. एवढंच म्हणायचं होतं. आज त्याच मुद्याबद्दल थोडंसं लिहिलं आहे!
एस आर डी विचारतात पुढे काय झालं?
कश्याच्या? दौऱ्यात म्हणाल तर काही नाही विशेष घडलं! दरवेळी सांगून चांगली रूम (जी बुक केलेली होती आणि ते देत नव्हते ती ) मिळवावी लागली.
सर्व आनंदापुढे ती बाब किरकोळ होती. असो.

उदे, काही फोटो देता आले तर उत्तम.

असचं प्लॅनिंग करून आम्ही गुवाहाटी-शिलाँग-गंगटोक पाहीलं होतं. शिलाँग-गंगटोक रस्ता फार सुंदर आहे.

छान कल्पना.

मी ऑगस्ट मध्ये युथ हॉस्टेलचा फुलोनकी घाटी ट्रेक करतेय. त्यात ऋषीकेश-जोशींमठ-गोविंद घाट बस आनि तिथून गोविंद घाट-घागरिया-फुलोनकी घाटी-हेमकुंड साहिब दररोज पायी. तो ट्रेक झाला की बस ने बद्रीनाथ. तिथे परत बद्रीनाथ -वसुधारा ट्रेक आणि मग बद्रीनाथ वरून ऋषिकेश परत बसने असा प्लॅन आहे. आशा आहे की तुम्ही जो आनंद घेतला तसा थोडाफार आनंद माझ्याही वाट्याला येईल.

साधना, थोडं अगोदर म्हंजे ४-५ दिवस अगोदर तुम्ही चिला मध्ये पोहोचलात तर छोटे छोटे ट्रेक्स करून चांगलं वातावरणाशी जुळवूनही घेता येईल आणि फिरताही येईल.(मी त्या एकूण ४-५ गावांचं म्हणतोय!) असो. तुम्हाला मजा येईलच येईल.
प्राजक्ता,फेसबुक आणि माझ्या वेबसाइट (उठादेसाई.कॉम) वर फोटो टाकले आहेत. इथे ते टाकले जात नाहीयेत. का? ते एकदा बघायला हवं. बघतो.

उदे, या ट्रेकसाठी 2 आठवडे सुट्टी घेणारेय तीच खूप आहे। अजून 2 आठवडे तिथे घालवायला मिळालेत तर कोणाला नकोयत? पण सध्या एवढी सुट्टी शक्य नाहीय. Sad