जगाने पाहिले नाही किती त्याहून गेले

Submitted by सुप्रिया जाधव. on 3 May, 2017 - 09:49

बघत बसले उडी मारायचे राहून गेले
पुलाखालून पाणी केवढे वाहून गेले !

तडाख्याने उडाले कौल कोसळल्यात भिंती
बघे जमले उभ्याने दुर्दशा पाहून गेले

जगाने सापळा रचला खुबीने ...व्यर्थ गेला !
स्वतःच्या पिंजऱ्यामध्ये स्वतः राहून गेले

तुझ्या दुर्लक्षण्याची खोक ही भरता भरेना
हजारो घांव नियतीचे जरी साहून गेले

दुराव्याच्या निखार्यांवर धुमसले... शांत झाले
झळांनी गैरसमजांच्या खरी दाहून गेले

कवडश्यान्नी उसवलेली धुक्याची गर्द दुलई
भ्रमाला भेदुनी सत्याजवळ काहून गेले ?

जगाने पाहिले माया किती सोडून गेला
जगाने पाहिले नाही किती त्याहून गेले

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

udemy_home_300x250.png

छान गझल!
मतला फार आवडला. आणि - कवडशांनी उसवलेली धुक्याची गर्द दुलई - हा मिसरा तर अप्रतिम!!