कटप्पाने बाहुबलीला का बरे मारले असावे?

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 April, 2017 - 16:04

कटप्पाने बाहुबलीला का बरे मारले असावे? सैराट झाला होता का तो? का येडं लागलं होत त्याला?

गेले वर्षभर हा प्रश्न सर्वांच्या डोक्यात घोंघावत आहे. उद्याचा शुक्रवार संपता संपता सर्वांना याचे उत्तर मिळाले असेल. भले तुम्ही चित्रपट पाहिला असेल नसेल तरीही, आणि तुमची ईच्छा असो नसो तरीही, व्हॉटसपवर येणारा एखादा मेसेज याचे उत्तर तुम्हाला सांगून जाणारच. आणि वर्षभर जे तर्कवितर्कांचे उधाण आलेले त्याला पुर्णविराम मिळणार....

बस्स त्या आधी हा शेवटचा दिवस, आणि शेवटची संधी.
आपल्या डोक्यातील तर्क ईथे मांडा आणि उद्या मिळणार्‍या उत्तराशी तो जुळवून बघा Happy

अवांतर - कोणी आहे का ईथे ज्याने शेकडो खर्च करून फर्स्ट डे, फर्स्ट शो किंवा फर्स्ट वीकेंडची तिकीटे बूक केली आहेत. कारण मी असे ऐकलेय की तीनचारशेची तिकीटेही हजार दोन हजारापर्यंत विकली जात आहेत. आणि ईतर कुठून रहस्य समजायच्या आधीच आपण बघून घ्यावा या विचाराने ती महागडी तिकीटे लोकं खरेदीही करत आहेत. खरंच वेड लावलंय या चित्रपटाने लोकांना Happy

माझा अंदाज - बाहुबली मेलेलाच नाही. तो जिवंत आहे. कटप्पाने आधी कसले तरी वचन बिचन पुर्ण करायला, वा कुठल्या तरी गैरसमजातून त्याच्या तलवार घुसवली. आणि मग ईलाज करून सुमडीत कुठेतरी लपवलाय Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो तरी काय करणार न बिचारा ....
त्यावेळी बारीक सर्जिकल उपकरणे नव्हती म्हणून स्कालपेल ऐवजी डायरेक्ट तलवार वापरली

१ मे

काही व्हॉटसप मेसेज शेअर करतो..

स्पॉयलर आहेत हं.. कदाचित यातला एखादा खरा असू शकतो Happy

स्पॉयलर

स्पॉयलर

स्पॉयलर

महेंद्र बाहुबली पड़ोसी राज्य कुंतल की मदद करने जाता है। भल्लालदेव और उसका बाप मिलकर ऐसी स्थितियां पैदा करता है कि सबको लगता है बाहुबली माहिष्मती से ग़द्दारी कर रहा है, कुंतल की राजकुमारी देवसेना को पाने के लिए। राजमाता को भी ऐसा ही विश्वास हो जाता है। इन्ही परिस्थितियों में कटप्पा बाहुबली को मार देता है क्योंकि उसके लिए राज्य और शासन का आदेश सबसे बड़ा है, कोई एक व्यक्ति नहीं।
लो खोल दिया मैंने आज़ाद भारत का सबसे बड़ा राज़।

__________

Kattappa killed Bahubali because Bhallaldev gave Kattapa two choices either to save Shiva(Baahubali's Son) and Devsena(Baahubali's wife) or to save the Baahubali. So Kattapa decided to save Baahubali's son as the child will be the future of Mahishmati kingdom......
Jai Mahishmati...

Ab jao movie..

_____________________

I really hate those people who watched bahubali premier in Dubai & revealed that

Kattapaa stabbed Bahubali to protect him from the curse of goddess maheshwari to turn into a stone statue in the battlefield & he was alive.

_____________________

स्पॉयलर संपला .....

एक नंबर बकवास सिनेमा होता. जितकी पांचट स्टोरी तितकेच पांचट रहस्य असणार. शुन्य उत्सुकता आहे.
>>>>>

याला राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांवर टिका करायचे फॅड समजायचे का? Wink

काय हवं ते समजा.
बाकी सैराट एक नंबर पिच्चर होता. तोही राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त होता.

सैराट एक नंबर असला तरी त्याचा भाग दोन निघाल्यास त्याची ईतकीच क्रेझ असेल याची ग्यारंटी नाही >>>> हे बाकी भारी बोल्लास मित्रा.
रच्याकने , मी काढली तिकिटे सोमवारी सकाळची.
बघायचाच असं काही नव्हतं , पण बघायचा तर थेटरातच , हे नक्की होतं . अनायसे , सुट्टी मिळाली , म्हटलं जाउया Happy .
आणि टिकटाचे भाव जास्त नाहि आहेत .

सैराट १ नंबर आणि बाहुबली बकवास... काहीही खरतर दोन्ही बकवास. पण सैराट सेकंड हाफ बोअर होतो. बाहुबली त्यामानाने टाईमपास.

कटप्पा राजगादीचा गुलाम अाहे, भीष्मासारखा. राजसिंहासनावर बसलेल्याने दिलेल्या आदेशाचे त्याने पालन केले असावे.

रच्याकने, ऋ, ज्याचा अंदाज बरोबर येणार त्याला काही बक्षीस देणार आहेस का? Wink

ऋ, ज्याचा अंदाज बरोबर येणार त्याला काही बक्षीस देणार आहेस का? 
>>>>>>

ही स्पर्धा नसून उपक्रम आहे.
तरीही तुम्हाला हट्टाने स्पर्धा स्पर्धाच खेळायचे असेल तर मला एक छानसे सर्टिफिकेट बनवावे लागेल Happy

कट्टप्पाला समजले बाहेरून की या सिनेमाची हिंदी आवृत्ती करण जोहर काढणार आहे,
म्हणून त्याने 'ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी' या न्यायाने बाहुबलीला ठार मारले Proud

मलाही गमभन यांच्यासारखेच वाटते.
राजाच्या आदेशाचे, त्याचा गुलाम असल्यामुळे पालन करणे हा हेतु असावा कट्टअपाचा

बाहूबली ( माय ) कन्क्ल्युजन .... घमेंडी स्त्री व तिच्या मागून फरपटत जाणारे बिनडोक पुरुष ... ही एक महान संस्कृती आहे ...

बाहूबली ( माय ) कन्क्ल्युजन :- राजमाता स्वतः कटप्पा ला आदेश देते कि तू "बाहुबली ला मार " तो जेव्हा नाही म्हणतो तेव्हा ती म्हणते "एक तर तू तरी मार नाही तर मी मारेन" मग कटप्पा तयार होतो बाहुबली ला मारायला कारण त्याच्यामते त्याला बघवणार नाही राजमाताने स्वतः ज्या बाहुबलीला लहानाचा मोठा केला ज्यावर प्रेम केले त्याला मारणे तिला जमणार नाही शोभणार नाही.

काढली रे काढली ... १ तारखेची तिकीट काढली.. अर्थातच दोन तिकिटे

१ मे .. जय महाराष्ट्र !!! जय माहिष्मती Happy

बघितला . 1ल्या भागापेक्षा हा जास्त आवडला . पण पूर्वार्ध जास्त चांगला आहे. Anushkaa Shetty n Prabhas - both looks so cute together :). Especially , तिरंदाजीच्या वेळी.
बच्चेकंपनी एकदम खुश .