धीर धरी धीर धरी

Submitted by वैशाली अ वर्तक on 17 April, 2017 - 10:21

धीर धरी धीर धरी
प्याला विषाचा देता राणाने
सहज केले प्राशन मीरेने
तारण्या असता तिचा हरी
धीर धरी धीर धरी

ग्रीष्मा नंतर बरसत येती
पर्जन्य धारा अमृत रूपी
गोमटी फळे मिळतील मोठी
धीर धरी धीर धरी

करुन पाल्यांना शिक्षीत
देशला ने प्रगती पथावरी
सरकार दत्त असता सवलती
धीर धरी धीर धीरी

रजनी अंती येते रम्य उषा
भगीरथ परिश्रमाने बळीराजा
सुगीचे दिन येतील धरेला
धीर धरी धीर धरी

असता उभा विठ्ठल पाठी
तुकयाच्या गाथा तारिल्या जळी
सदा असू दे विठू नाम मुखी
धीर धरि धीर धरी

जीवन नौका करण्या पार
प्रभू रामराया सदा तयार
कसली खंत धरीशी मनी
धीर धरी धीर धरी

वैशाली वर्तक ९/४/२०१७ .

Group content visibility: 
Use group defaults