लागिरं झालं जी... - झी मराठीवरील नवीन मालिका

Submitted by योकु on 11 April, 2017 - 12:28

लागिरं झालं जी... ही नवी मालिका झी मराठीवर १ मे २०१७ पासून सोम - शनि पाहायला मिळेल. चर्चेकरता हा धागा. काय चांगलंय काय गंडलंय, काथ्याकूट इ... चला चालू व्हा Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नायक/ नायिका नविन असतिल म्हणुन म्हणा पण दोघेहि अगदिच सामान्य वाटतात. नायक तर अजिबात फौजी वाटत नाहि.

नायिका प्रोमोमध्ये एकदम धडाडीची दिसतेय. सिरीयल मध्ये हिरोशी लग्न झाले की मग एकदम सोशिक, कनवाळू न होवो म्हणजे मिळवलं.

ओ ssss फौजी........ स्वडा की त्याला....... तुमी बॉर्डर संबाळा ... ह्ये गावातलं ला अँड आर्डर आमी बगून घितोया...>>>>> हे सुरुवातीच ओ फोजी मला भावजी एकु आल.आणी नंतर चे ला अँण्ड आर्डर आता इथे वाचल्यावर कळाल.

सिरीयल मध्ये हिरोशी लग्न झाले की मग एकदम सोशिक, कनवाळू न होवो म्हणजे मिळवलं.>>> Lol बरोबर.
अजुन एक म्हण्जे ,,अंजलीबाईंचा कामाचा उरक पाहुन मी थक्क झालीये.
झी च्या सगळ्याच मेन लीड दणादण काम करतात घरातली. Wink

नायिका प्रोमोमध्ये एकदम धडाडीची दिसतेय. सिरीयल मध्ये हिरोशी लग्न झाले की मग एकदम सोशिक, कनवाळू न होवो म्हणजे मिळवलं.>>> प्रोमो मध्ये ती मला आर्ची टाईप वाटली.

मी नाही बघणारे ही मालिका... उगीच आहे ती भाषा पण अशुद्ध होईल माझी.>>> ग्रामीण भाषा अशुद्ध?

अहो म्हणजे मला टोन च्या बाबतीत म्हणायचं आहे... जस फौजी च्या ऐवजी भावोजी ऐकू येतंय .. तसं नको व्हायला माझं.... राणा ची ग्रामीण भाषा आवडते मला....

ओ ssss फौजी........ स्वडा की त्याला....... तुमी बॉर्डर संबाळा ... ह्ये गावातलं ला अँड आर्डर आमी बगून घितोया...>>>>> "तुमी बाॅर्डरचं बगा" असं आहे ते. मला प्रोमोचं इन्टरेस्टिंग नाही वाटत. त्यामुळे बहुतेक नाहीच बघणार.

भरत. Lol खरोखर..

मी नाही बघणारे ही मालिका... उगीच आहे ती भाषा पण अशुद्ध होईल माझी...
Submitted by नटुकाकी >>>>>>>>>>>>

भाषे मध्ये शुद्ध, अशुद्ध ता हा प्रकार नसतो हे केव्हा कळणार !!!
ति ग्रामीण बोली आहे. ग्रामीण बोलिला अशुद्ध म्हणुन हिणवन्याची विचार पध्दती केव्हा संपणार आहे कोणास ठाऊक?

टोन च्या बाबतीत म्हणाल तर ग्रामीण लोकांना शहरी टोन नाही कळात जो खर्‍या अर्थाने अशुध्द असतो ( कारण ज्या मध्ये अर्धे आधीक इंग्रजी वा हिंदी ची मीसळ असते) मग त्याला पण असच म्हणायच का? पहा विचार करुन!!!

>>>टोन च्या बाबतीत म्हणाल तर ग्रामीण लोकांना शहरी टोन नाही कळात जो खर्‍या अर्थाने अशुध्द असतो ( कारण ज्या मध्ये अर्धे आधीक इंग्रजी वा हिंदी ची मीसळ असते) मग त्याला पण असच म्हणायच का? पहा विचार करुन!!!>>>हम्म... पटलं मला तुम्ही म्हणताय ते... आता शहरी भाषा तरी कुठे शुद्ध राहिली आहे... अशुद्ध शब्द काढते प्रतिसादामधून.... पण मला खरंच अवघड जातिये याची भाषा... म्हणजे अगदी नावापासूनच... लाजिर या शब्दाचा अर्थ पण इथे वाचल्यावरच समजला... आणि बाकीचे शब्द पण कळाले न्हवते... म्हणून म्हटलं होतं तसं मी... सैराट सारखे सब टाइल्स असते तर कळलं असत...

स्मिता श्रीपाद , धन्यवाद Happy

या मालिकेच्या नायक नायिकेची नाव काय आहेत ? नायिकेला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतेय .

आता माळ लावतील असल्या मालिकांची! >>>>

हो .. हे मात्र अगदी खर आहे... एक फॉरम्युला हिट झाला की मग, पुढे त्याची माळच लागते...

हाहाहा खरं आहे. तुझ्यात जीव रंगला हिट झाली मग लगेच अजून एक ग्रामीण मालिका लावली.
मला आवडेल असं वाटत नाही.

सैराट हिट झाल्यापसून आता अजून एक दूसरी ग्रामीण कथा.. पहिली तुझ्यात जीव रंगला... जरा शहरी-ग्रामीण प्रेम कथा सोडून नवीन विषय नाहीत का...}}}}}+101

उगाच वैताग आणणार. तुझ्यात जीव बरी चालली होती तिचे मातेरे केले. इथे प्रोमोच बेक्कार आहेत

>>मला आवडेल असं वाटत नाही. >>>> + १ मझ्या ओळखिचे जवळपास सगळे हेच म्हणतायेत>> +22222
माझ्या बाबांचं तर डोकचं फिरत ह्याचा प्रोमो आला की... लगेच न्युज लावतात ते... एरवी ते फक्त तुझ्यात जीव रंगला बघतात...

खरतर ग्रामिण भागात असलं वातावरणं नसतचं जसं सिरिअल मधे दाखवतात.. तुझ्यात जीव रंगला बर्यापैकी जवळ जाते.. बरचं नॉर्मल वातावरणं दाखवतात त्यात..
याच्या प्रोमोवरुन टिपिकल गावाकडचं म्हणुन काहिही दाखवणारी टाईप वाटते ..
हिरो लय्च जिगर्बाज.. हिरोइन हर्हुन्नरी उगाच झाडावर चढनारी.. पाणी भरणारी.. अशे टिपिकल स्टिरिओटाईप्स आसायचे आधीच्या पिक्चर मधे.......तसच वाटतय याकडे बघुन
आताशा गावकडे लोक बरेच पुढारले आहेत
थोडं सुरुवातिला बघुन ठरवता येईल..

मला वाटत हिरो बाॅर्डर वर जाणार आणि बेपत्ता होणार मग हिरोइन फोजी होणार . मग काय दे दणादण . मग आपला हिरो परत येणार ......... अस काहितरी असेल

खरतर ग्रामिण भागात असलं वातावरणं नसतचं जसं सिरिअल मधे दाखवतात.. तुझ्यात जीव रंगला बर्यापैकी जवळ जाते.. बरचं नॉर्मल वातावरणं दाखवतात त्यात..
>> बरीचशी जवळ जाते पण धाकल्या सुनबाईंच्या साड्या, त्यांची खोली, त्यांचा मेकप इ. मला ग्रामीण वातावरणाजवळ जाणारं नाही वाटलं. उलट अंजली बाई इतक्या शिकलेल्या असून त्या गावात रहात होत्या (लग्ना आधी तेव्हा) त्यांचे ड्रेस गाव खेड्यात खपतील असेच होते.

लोकसत्ताची बातमी>>>>काहि विशेष नाहि
फक्त सातारकडचि स्टोरि आहे हे वाचुन विशेष वाटलं. खुप उशिरा दखल घेतलि झि वाल्यांनि

Pages