तुझे माझे

Submitted by मीनल कुलकर्णी on 9 April, 2017 - 12:49

तुझे माझे

तुझे माझे बंध
जसा मोग-याचा गंध
किती दडपू पाहिला
दरवळे मुक्तछंद....

तुझी माझी भाषा
निशब्दाची रेषा
अबोल भासे तरी
पुर्णत्वाची परिभाषा...

तुझे माझे गाणे
ना सूर ना तराणे
गवसले मज त्यात
जगण्याचे किती बहाणे...

तुझी माझी भेट
नभ धरेचा समेट
होता नजरानजर
कळ काळजात थेट...

तुझा माझा प्रवास
मनी क्षितीजाची आस
गुंफता हात हाती
पायी नक्षत्रांचा भास...

तुझा माझा पारिजात
सडा केशरी दारात
भरली ओंजळ प्रेमाने
सुख मावेना डोळ्यात...
- मीनल

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Use group defaults

Thanx

Thanx satyajit