सर्वत्र गंध त्याचा मुरला हवेत आहे

Submitted by सुप्रिया जाधव. on 1 April, 2017 - 03:14

मी एवढ्याचसाठी हे श्वास घेत आहे
सर्वत्र गंध त्याचा मुरला हवेत आहे

त्याच्या नभांगणीचा झालेय ध्रूवतारा
आता क्षितीज त्याचे माझ्या कवेत आहे

का पेरणीकडे ती दुर्लक्ष साफ करते ?
पाऊस तर तिच्याही शेतात येत आहे

गावाकडील झाडे गेली वठून गेली
पक्षिण तिच्या पिलांना शहरात नेत आहे

बाहेर काढलेले माझ्यातुनी मला मी
माझ्यामधेच आता झोकून देत आहे

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान ! !

मला......."त्याच्या नभांगणीचा झालेय ध्रूवतारा
आता क्षितीज त्याचे माझ्या कवेत आहे."....हे कडवं सगळ्यात जास्त आवडलं