शरीराचे तालबद्ध काल -चक्र

Submitted by दीपा जोशी on 24 March, 2017 - 13:07

circadian-rythms.jpg

परवा एका प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञाचा कार्यक्रम टी. व्ही. वर लागला होता. त्यातले त्यांचे एक वाक्य मला फार महत्वाचे वाटले. त्यांनी सांगितले, ‘दिनचर्या सुधारली की, अहोराञ आरोग्याच्या समस्या काढता पाय घेऊ लागतात.’ म्हणजे, दिनचर्या वेळेवर पाळू लागलो की शरीर पण शहाण्यासारखं वागू लागतं!

दिनचर्या म्हणजे काय ? तर रोज सकाळी उठण्यापासून झोपेपर्यंत कोणत्या वेळी काय करायचं याचे नियम. हे नियम आपले पूर्वज बऱ्याच काटेकोरपणे पाळत असत. त्यामागे अनुभवाअंती आलेले शहाणपण आणि आयुर्वेदाचे ज्ञान होते.
अमुक वेळेला अमुक का करावं- याचं कारण आहे- आपल्या शरीराची असणारी ‘जैविक तालबद्धता’; अथवा शरीरामध्ये असणारे नैसर्गिक घड्याळ. फक्त आपल्याच शरीरात नाही, तर प्राणी, पक्षी, वनस्पती यांच्यामध्येही हा जैविक ताल असतोच. दिवसाच्या २४ तासात मुख्यत्वे सूर्यप्रकाश आणि अंधार यांना प्रतिसादात्मक म्हणून शारीरिक आणि मानसिक बदल घडतात. दर २४ तासांनी पुनरावृत्ती होणाऱ्या या घटना शरीरातल्या नलिकाविरहित ग्रंथींमार्फत स्त्र्वणाऱ्या हॉर्मोन्स मुळे नियंत्रित होतात, आणि त्यामुळे आपले शरीरयंत्र कसं रोजच्यारोज आपसूकच सुरळीत चालतं ! म्हणजे- सकाळी आपोआप जाग येते, भुकेच्या वेळेला भूक लागते, रात्री दमलेल्या शरीराला विश्रांती मिळावी म्हणून आपोआप झोप लागते.

शरीरात दिवसाच्या २४ तासात ठराविक वेळेला नियमितपणे घडणाऱ्या अशा घटनांच्या कालचक्राला ‘सरकॅडीअन सायकल’ असे म्हणतात. या जैविक तालाचा अभ्यास करणारे एक शास्त्र आहे. ‘क्रोनोबायोलॉजि ’ असे त्याचे नाव.
रोज, साप्ताहिक, मासिक, वार्षिक, आणि ऋतूप्रमाणे शरीरात घडणाऱ्या नैसर्गिक घटनांचे एक चक्र असते. दिवसातल्या, आठवड्यातल्या, महिन्यातल्या, वर्षातल्या किंवा एखाद्या ऋतूमधल्या ठराविक काळात शरीरात ठराविकच घडामोडी होतात; त्याप्रमाणे शरीरात ठराविक बदल घडतात- असे हे शास्त्र सांगते.

सूर्याप्रकाशा वर आधारलेले एक अदृश्य घड्याळ खरोखरीच आपल्या शरीरात असते. मेंदूच्या तळाशी असणाऱ्या ‘हायपोथॅलॅमस’ भागात ‘सुप्रा- कायसमॅटिक- केंद्र’ नामक, जवळपास 20,000 चेता पेशींचा एक समूह असतो. हेच आपल्या शरीरातले अदृश्य घड्याळ! सूर्य उगवल्यावर निर्माण होणार प्रकाश, आणि मावळल्यावर होणारा अंधार यांची नोंद डोळ्यांमधल्या प्रकाश- संवेदक असणाऱ्या खास ’गॅन्गलिओन’ पेशी घेतात. ही माहिती थेट प्रक्षेपित होते ती या ‘सुपरा - कायसमॅटिक‘ केंद्राकडे. मग या केंद्रातल्या पेशी आलेल्या सगळ्या माहितीचं विश्लेषण करतात, चेतातंतूंमार्फत योग्य तो संदेश ‘पिनिअल’ ग्रंथींकडे पोहोचवतात. या ग्रंथींच काम असतं मेलॅटोनीन हॉर्मोन निर्माण करणे. हे मेलॅटोनीन म्हणजे झोपेचं हॉर्मोन.

मेंदूच्या मध्यभागी, असणारी वाटाण्याच्या आकाराची ही ग्रंथी दिवसभर सुप्तावस्थेत असते.
दिवस मावळून अंधार पडू लागतो,रात्र होत जाते, तसतशी ‘सुपरा - कायसमॅटिक‘ केंद्राकडून आलेल्या संदेशामुळे ही ग्रंथी सक्रिय होऊ लागते. तिच्याकडून मेलॅटोनीनची निर्मिती सुरु होते. साधारणतः रात्री नऊच्या सुमारास मेलॅटोनीन ची निर्मिती होऊ लागते. मध्यरात्री ती सर्वोच्च बिंदूपर्यंत जाते, आणि दिवस उजाडेपर्यंत हळूहळू कमी होत जाते. मेंदू मधील मेलॅटोनीन ची पातळी तिव्रतेने वाढू लागते तस - तसं आपली कार्यक्षमता कमी होते. त्याची पातळी वाढत जाईल, तस तसा मेंदू कडून संदेश येतो, ‘आता काम थांबव आणि झोपी जा’. मग आपल्याला सुस्तावल्यासारखं, झोपाळल्यासारखं होऊ लागतं, शरीराचं तापमान कमी होऊ लागतं.आपल्याला झोप येऊ लागते. अशा वेळीच अंथरुणावर पडलं, तर रात्री कशी गाढ झोप लागते. दिवसभर झालेली शरीराची झीज भरून येऊ लागते. उजाडू लागतं, तसे मेलॅटोनिनची पातळी कमी होते. त्याच वेळी परत ’कॉर्टिसॉल’ या दुसऱ्या हॉर्मोनची रक्तातली पातळी वाढू लागते. डोळ्यावरची झोप उतरवून दिवसभरातल्या हालचालीसाठी जागृत अवस्था आणण्याचे काम या ‘कॉर्टिसॉल’चे. आता मेंदूचा संदेश येतो,‘ चला, उठा आणि कामाला लागा!’ आणि मग हळू हळू जाग येते, भरपूर विश्रांती घेऊन ताजातवाना झालेला मेंदू आणि सगळी गात्रं उत्साहाने नवीन दिवसाचं स्वागत करतात!

संध्याकाळनंतर अंधार पडू लागला की परत कॉर्टिसॉलची पातळी कमी होऊ लागते आणि मेलॅटोनीनची पातळी वाढू लागते. रात्री कॉर्टिसॉलची पातळी एकदम कमी झालेली आणि मेलॅटोनीन ची वाढलेली असते. दिवसामागून राञ आणि रात्रीमागून दिवस येताना झोप आणि जागृतीसाठी असे हे घड्याळ प्राणी-मात्रांना बहाल करून निसर्गाने मोठीच कृपा केली आहे! या घड्याळाचं खरं महत्व कुणी जाणलं असेल तर, ज्यांना झोपेच्या गोळ्यांशिवाय सुखाची झोप लागत नाही त्यांनी!

बाहेरचे तापमान, प्रकाश यांच्या प्रमाणे हे घड्याळ शरीरातल्या घडामोडींचे योग्य नियंत्रणदेखील साधते. ‘जेट -लॅग’ मुळे तात्पुरतं झोपेचं खोबरं वगैरे होतं, मरगळल्यासारखं होतं, दिवस अनावर झोप येते, पचन बिघडतं…. कारण शरीराचं घड्याळ बिघडतं, जैवीक ताल थोडा ’बेताल’ होतो. पण नंतर, त्या ठिकाणच्या दिवस-रात्रीच्या चकराप्रमाणे शरीराचा जैविक ताल परत पूर्ववत होतो.
राञ होते तसं आणखी एका हॉर्मोनचं काम सुरु होतं. ‘ग्रोथ हॉर्मोन’ अथवा वाढीसाठी लागणारं हे हॉर्मोन . आपण गाढ झोपेत असताना- प्रथिनांची निर्मिती, स्निग्ध पदार्थांचं ज्वलन, मुलांमध्ये हाडांचा आणि स्नायूंचा विकास -अशी महत्वाची कामे हे हॉर्मोन गुपचूप करून टाकतं. रात्री अवेळी झोपणार्यांमध्ये लठ्ठपणाचे एक कारण, बिघडलेलं ( कि बिघडवलेलं?) जैविक घड्याळ हेही असू शकतं. कारण उशिरा झोपल्याने शरीरातलं मेटॅबॉलिझम -म्हणजे चयापचय बिघडून जातं, शरीरातल्या स्निग्ध पदार्थांचं ज्वलन पूर्ण होत नाही.

पूर्वी माणसं संध्याकाळीच जेवून घेत असत, आणि गडद अंधार पडताना झोपी जात असत. तसच सकाळी उजाडायच्या वेळी उठून दिनक्रम सुरु करत असत. ही जीवनशैली शरीराच्या जैविक तालाशी आणि हॉर्मोन निर्मितीच्या कालचक्राशी अगदी सुसंगत होती!
शरीराच्या नैसर्गिक घटनाचक्राची जाणीव ठेऊन त्याप्रमाणे वागणे हे आपल्याला वाटतं त्यापेक्षा खूप जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे फक्त झोप चांगली झाल्यानं एकंदरीत आरोग्य चांगलं राहतं एवढंच त्याचं महत्व नाही, तर शरीराच्या खूप साऱ्या महत्वाच्या कामकाजाशी जैविक तालाचा संबंध असतो. नैसर्गिक कालचक्र बिघडलं, की हृदयाचे आरोग्य, मनाचे आरोग्य, कमकुवत प्रतिकारशक्ती, पचनाच्या समस्या अश्या अनेक समस्या डोकं वर काढू लागतात.
पचन संस्थेच्या आरोग्यावर जैविक घड्याळाचा मोठा प्रभाव असतो. रात्री निर्माण होणारे मेलॅटोनीन हे भूक लागणे, पोट भरल्याची भावना, आतड्यांची हालचाल वगैरेंशी संबधीत असते. तसेच, गॅस्ट्रीन, घ्रेलिन, सेरोटोनिन या हॉर्मोन्सची आणि पाचक रस तयार करणारे एंझाईम्स यांची निर्मिती जैविक घड्याळाने नियंत्रित होते. म्हणूनच रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांमध्ये जैविक ताल बिघडल्याने, ऍसिडिटी, अल्सर, ‘इरीटिबल -बॉवेल -सिंड्रोम‘ असे पचनसंस्थेचे विकार आढळतात.

झोपेचं नैसर्गिक जैविक चक्र बिघडल्यास, स्त्रियांमध्ये प्रजनन संस्थेचं काम देखील बिघडतं . रात्रीच्या गडद अंधारात झोप घेताना तयार होणारं मेलॅटोनीन हे हॉर्मोन, मुली वयात येण्याच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवतं, ओव्हरीजचे कार्य नियंत्रणात ठेवतं, आणि प्रजननासंबंधीचे हॉर्मोन्स वेळेवर निर्माण करतं असं आता सिद्ध झालं आहे.
संध्याकाळच्या आणि रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या मुली आणि बायकांना रात्रीच्या वेळी दिव्याच्या प्रखर प्रकाशामध्ये काम करावं लागतं. त्यामुळे, नैसर्गिक अंधारा अभावी मेलॅटोनीन निर्मिती दबली जाते. अशा स्त्रियांना बऱ्याचदा पाळी अनियमितपणे येते. कधी लवकर येते तर कधी बऱ्याच उशिरा. शिवाय पाळीच्या वेदना, खूप जास्त रक्तस्त्राव, किंवा अत्यल्प रक्तस्त्राव, अशा तक्रारी निर्माण होतात. जनन संस्थेच्या हॉर्मोन्स च्या निर्मिती मध्ये बदल होतो. अशा शिफ्टमध्ये काम करणाऱ्या बायकांना गर्भ-धारणा झाल्यास, पूर्ण दिवस भरण्या-आधी प्रसूती होण्याचा, आणि कमी वजनाची मुलं होण्याचाही धोका असतो. अजून एक महत्वाची बाब गेल्या दशकात समोर आली आहे. ती म्हणजे शिफ्टमध्ये काम करणाऱ्या स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचं वाढतं प्रमाण. मेलॅटोनीनची कमतरता हेच कारण पुन्हा इथंही पुढे येतंय.

दिवसाच्या २४ तासांचं या नैसर्गिक कालचक्राशी इतरही अवयवांचं, संस्थांचं कार्य संबंधित असतं. त्यामुळे त्या संस्थांशी संबंधित व्याधीदेखील दिवसाच्या ठराविक वेळेल उफ़ाळतात असं दिसतं. ‘ऍलर्जिक ऱ्हायनायटिस’ मध्ये शिंका येणे, नाक गळणे अथवा चोंदलेले असणे अशी लक्षणे नेमकी सकाळीच जास्त करून दिसतात. तर कित्येक पेशंटना दम्याचा अटॅक पहाटे येण्याचे प्रसंग दिवसातल्या उत्तर वेळांपेक्षा १०० पट जास्त असतात. सकाळी जाग आल्यानंतर पहिल्या काही तासातला रक्तदाब हा दिवसातल्या इतर कोणत्याही वेळी असणाऱ्या दाबापेक्षा सगळ्यात जास्त असतो. छातीत दुखणे, अंजायना, इ सी जी मध्ये आढळणाऱ्या विकृती, हृदयविकाराचे झटके या घटना सामान्यतः सकाळी जाग आल्यानंतरच्या पहिल्या काही तासातच होतात असं आढळलं आहे.

आयुर्वेदात सुद्धा नैसर्गिक कालचक्राची कल्पना महत्वाची मानली आहे. पहाटे २ ते ६ आणि दुपारी २ ते ६ ही वेळ ‘वात- दोष‘ अधिक्याची मानली आहे. ‘वात’ हालचाल, उत्सर्जन, उत्साह , मनाचे आणि मेंदूचे कार्य यांच्याशी निगडित असतो. म्हणून या कालावधीत उठल्यास मल -मुञ विसर्जन चांगले होते. पहाटे चार च्या दरम्यानची वेळ (ब्रम्ह-मुहूर्त) ध्यान, जप, अध्यात्मिक साधना यांच्यासाठी उत्तम मानली आहे. यावेळी निसर्ग तरलं, शांत असतो, मनाची एकाग्रताही चांगली होते, शरीर हलके असते. यावेळी शरीर- मनाला मिळणाऱ्या ऊर्जेचा फायदा पुढे दिवसभर मिळतो. म्हणून सकाळी सहाच्या आधी उठले पाहिजे. नंतरची सकाळी ६ ते १० ची वेळ ‘कफ’ अधिक्याची असल्याने जितके उशीरा उठू तितके जड सुस्त आणि आळसावलेले वाटत राहते. या सकाळच्या कफाच्या वेळेत घ्यायचा सकाळचा नाश्ता हलका असावा. संध्याकाळी ६ ते रात्री १० ची वेळ परत ‘कफा’ची मानली आहे. संध्याकाळी किंवा रात्री लवकर आणि हलके जेवण घेणे हितकारक मानले आहे. कारण शरीर यंत्रणा, चयापचय मंद होऊ लागलेले असते. सकाळी १० ते दुपारी २ ची वेळ ‘पित्त’ अधिक्याची असते. पित्ताचे कार्य पचन, चयापचय. म्हणून ही वेळ ‘जठराग्नी’ची. दुपारी भर १२ वाजता कशी कडकडून भूक लागलेली असते. सगळे पाचक रस उत्पन्न झालेले असतात. यावेळी पचनशक्ती उत्तम असल्याने जड जेवणही चांगले पचते. रात्री १० ते २ ही वेळ देखील पित्ताची असते. पण या वेळेत पचनाचं कार्य होत नाही, शरीराअंतर्गत ‘सफाई’चं काम चालू असतं. आधुनिक संशोधनाप्रमाणे, यकृतात सगळ्यात जास्त पित्त निर्मिती सकाळी ९ वाजता आणि सगळ्यात कमी पित्त निर्मिती रात्री ९ वाजता होते, कारण, अन्नावर पित्ताची प्रक्रिया करण्याची गरज दिवसाचं असते. रात्री ९ नंतर पित्त निर्मिती बंद होऊन चयापचयाला आवश्यक अशा इत्तर रसायनांची निर्मिती, तसेच विषारी घटकांची सफाई, सुरु होते. पहाटे ३ वाजता यकृत हे काम बंद करते, आणि परत पित्त निर्मितीचं कार्य सुरु करते. दुपारी ३ पर्यंत व्यवस्थित पित्त निर्मिती झाल्यावर, हे काम बंद होऊन, परत रसायन निर्मितीची दुसरी शिफ्ट चालू होते. अगदी, एखाद्या रसायनांच्या कारखान्याचं ‘शिफ्ट- वर्क‘ असतं तसं, अहोरात्र यकृताच्या कारखान्याचे काम चालू असतं. किती आश्चर्य कारक आहे ना हे!

तर असं हे शरीराचं तालबद्ध कालचक्र! आता वैज्ञनिकच म्हणत आहेत की, आरोग्य चांगलं राहावं असं वाटत असेल तर, हे जैविक घड्याळ बिघडू द्यायचं नाही. त्यासाठी एकच करायचं. ते म्हणजे, संध्याकाळीच - किंवा रात्री लवकर-जेवायचं, रात्री अंधार झालेला असेल तेव्हा सरळ अंथरुणात शिरायचं, आणि गुडूप झोपी जायचं. बाहेर उजाडतं, तेव्हा मस्तपैकी उठायचं (आळोखे-पिळोखे देत म्हणा हवं तर!) आणि दिवसभरातल्या जेवणा -खाण्याच्या वेळा चुकवायच्या नाहीत. झोपायच्या कमीतकमी एक तास आधी प्रखर प्रकाश म्हणजे टी. व्हि, संगणक, मोबाईल इत्यादी गोष्टी पूर्णपणे टाळायच्या. हल्लीच्या ‘आधुनिक युगात’ हे जरी अवघड वाटलं, तरी अशक्य नाही. सुरवातीला अगदी काटेकोरपणे जमलं नाही, तरी आपली दिनचर्या प्रयत्नपूर्वक तशी बनवायची. आणि शक्य तेवढी पाळायची. कारण आरोग्य बिघडल्यानंतर जे भोगावं लागतं, ते शरीराच्या नैसर्गिक तालाशी सुसंगत अशी आपली दिनचर्या ठेवण्याच्या कष्टांपेक्षा कितीतरी पटींनी अधिक असतं !

सन्दर्भ
http://natural-fertility-info.com/melatonin-circadian-rhythm.html
https://www.nigms.nih.gov/education/pages/Factsheet_CircadianRhythms.aspx
http://journal.frontiersin.org/article/10.3389/fendo.2013.00195/full
https://www.hindawi.com/journals/ije/2010/813764/
http://www.hepatitiscentral.com/news/working_with_yo/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Aa.raa.raa. , why mammals sleep the way they do ? Or why do they sleep at all ( a different perspective than refreshing the body etc)?
Carl Sagan speculates/answers/hypothesize this in his book "dragons of Eden".

Deepa Joshi, lekh khup avadala.
That answers many of the things wrt my personal health, I feel. Thank u!

पण, मानवी जैविक चक्र सूर्य- प्रकाशाला संवेदक पेशींमुळे निर्माण होत असल्याने , वर म्हटल्याप्रमाणे होणे असंभव आहे
<<
बरं. Happy
तुम्ही दिलेल्या लिंकांतले सगळे इस्ट्रस सायकल रिलेटेड चक्र प्रकाशसंवेदक पेशींमुळे उत्पन्न होतात ही नवी माहिती मिळाली. धन्यवाद.

उत्क्रांती होण्यासाठी प्रत्येक वेळा पिढ्यान्पिढ्या एकच एक गोष्ट करावी लागते, ही देखिल नवी माहिती मिळाली.
(यासंदर्भात कोरा वर एक रोचक चर्चा वाचलेली आठवते. "जर माणसाला/उंदराला/टेस्ट अ‍ॅनिमल ला अनेक पिढ्या बंदूकीच्या गोळ्या घालून मारले, तर त्यात त्या गोळीस प्रतिकार करायची शक्ती निर्माण होईल का?" असा प्रश्न होता. त्यात पुढच्या पिढीत जीन्स जाण्यासाठी गोळी घालून मारलेल्या प्राण्यापासून पुनरुत्पादन झाले पाहिजे, असे एक आर्ग्युमेंट वाचले. डीडीटीने मरणार्‍या डासांत प्रतिकारशक्ती कशी काय उत्पन्न होत असेल, हा प्रश्न त्या निमित्ताने डोक्यात आला.)

जेनेटिक म्यूटेशन नामक प्रकाराने उत्क्रांती घडू शकत नाही हेही समजले.

Aa.ra.ra.----prakash sanvedak peshinche kam suryaprakashachya pattyat chalte.
Blue light, principally around 460 to 480 nm, suppresses melatonin.
Ratricha prakhar Prakash, hyach Prakash tarangacha (blue wavelength --- neel tarangacha ) aslyne sahajeekach zopeche hormone ...melatonin , pinial gland Kadun tayar hot nahi.

जेनेटिक म्यूटेशन नामक प्रकाराने उत्क्रांती घडू शकत नाही हेही समजले. >>हे कुठे समजले? In fact, random genetic mutations is "the" driving force for evolution.
बंदुकीच्या गोळीने मरणे is a broad mechanical injury. No living being can develop genetic resistance to broad mechanical stresses.

डीडीटीने मरणार्‍या डासांत प्रतिकारशक्ती कशी काय उत्पन्न होत असेल, हा प्रश्न त्या निमित्ताने डोक्यात आला.>>DDT हे रासायनिक संयुग आहे. आपल्या/डासांच्या (eukaryotic cells) पेशींमध्ये काही ठराविक रसायने प्रवेश करू शकतात. काही पेशींमध्ये random किंवा directed mutations मुळे DDT पेशीत शिरण्यास अटकाव होऊ शकतो. अशा पेशी असलेले डास हे DDT च्या सहवासात जगण्यास अधिक सक्षम ठरतात पर्यायाने त्यांची संख्या वाढत जाते व शेवटी बहुसंख्य डास हे DDT ला प्रतिकारक्षम होतात. This is a simplified explanation. The actual process of resistant mutants may follow a different kinetics depending on several other factors. साधारणतः अशाच प्रक्रियेतून प्रतिजैविकांना प्रतिकारक्षम असलेले रोगांचे जंतू (antibiotic resistant bacteria) तयार होतात. म्हणून नेहमी डॉक्टरांनी दिलेला डोस पूर्ण करावा आणि आपल्या मनाने कधीही antibiotics घेऊ नयेत.

Jidnyasa, thanks for information.

But I don't understand why this random or directed Mutation is taking place so speedily in mosquitos?

Is it because of natural desire to survive?

कसला सरकर्डीयन रिदम हो?
आमचा राखणदार रात्री नऊला उसाला पाणी सोडून झोपी जातो,पहाटे चारला उठुन मोटर बंद करुन येतो.त्याचा कसला सरकर्डीयन रिदम बिघडलेला पाहीला नाही.चांगला दणकट आणि कधीही आजारी पडत नाही.
आणि ते सुर्यप्रकाशाचे लॉजिक गंडलेलं आहे,असं असतं तर अंध व्यक्तींना झोपच लागली नसती.

@synthetikji_____""आमचा राखणदार रात्री नऊला उसाला पाणी सोडून झोपी जातो,पहाटे चारला उठुन मोटर बंद करुन येतो."" He sleeps at 9 . PM upto 4am . Right? ...... This is what circadian cycle is! So, he is following circadian cycle perfectly!!

But I don't understand why this random or directed Mutation is taking place so speedily in mosquitos? >> it is not speedy. The generation time (due to short life cycle) of mosquitoes is smaller than humans. So it's relative. There is no desire. It is survival of the fittest.

आणि ते सुर्यप्रकाशाचे लॉजिक गंडलेलं आहे,असं असतं तर अंध व्यक्तींना झोपच लागली नसती.>> डोळ्यांत तीन प्रकारचे photoreceptors असतात rods, cones, and photosensitive retinal ganglion cells पैकी rods and cones मुळे दृष्टी प्राप्त होते आणि तिसर्‍या पेशींमुळे hypothalamus ह्या मेंदूच्या भागाला दिवस/रात्रीचे ज्ञान देणारे संदेश पाठवले जातात. त्यामुळे अंध व्यक्तींना जरी दृष्टी नसली तरी शरीराला दिवस रात्रीचे भान असते.

प्रकाशाचा वापर आपल्या शरीरातले आंतरिक घड्याळ सेट करण्यासाठी करणे हे प्रत्येक जीव करतो (सूक्ष्मजीव देखिल). Circadian rhythm and intrinsic clocks is a very interesting and complex research topic.

Plz suggest some good Ayurveda doctor near SB road/Model colony Pune for neck /back pain aani for loss weight. Panchkarm karun kahi phark padel ka vajan aani neck sathi?? Plz it urgent

डोळ्यांत तीन प्रकारचे photoreceptors असतात rods, cones, and photosensitive retinal ganglion cells पैकी rods and cones मुळे दृष्टी प्राप्त होते आणि तिसर्‍या पेशींमुळे hypothalamus ह्या मेंदूच्या भागाला दिवस/रात्रीचे ज्ञान देणारे संदेश पाठवले जातात. त्यामुळे अंध व्यक्तींना जरी दृष्टी नसली तरी शरीराला दिवस रात्रीचे भान असते.
पूर्णपणे अंध असलेल्या व्यक्तीच्या photosensitive retinal ganglion cells वर प्रकाश पडत नसल्यास तो दिवस राट्रीचे संदेश कसे पाठवतो? अंध व्यक्तींना आजुबाजुच्या हालचाली व आवाजामुळे कदाचीत दिवस रात्रीचे भान येत असावे .

1. The majority of totally blind individuals, who retain their eyes but cannot consciously perceive light also exhibit circadian rhythms that are not entrained to the 24-hour light-dark cycle, but have cir cadin cycle slightly longer than 24 hours. They sometimes have insomnia or lack of sleep at night , and daytime sleepiness.

2. Disorders of the visual system do not always cut the circadian effects of light.

3. small proportion of blind people without light perception retain normal circadian phase-shifting and melatonin suppression responses to light, even In the absence of any functional rods or cones.

Pages