नॉस्त्रादेमसच्या स्वप्नातील महानेता ! कोण असावा?

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 March, 2017 - 13:28

लहानपणी आपण सर्वांनीच नॉस्त्रादेमसच्या सुरस आणि चमत्कारीक भविष्यकथा वाचल्या ऐकल्या असतीलच. एक भारावून जायचे वय असते अश्या कथा वाचताना. ते माझेही झाले होते. नंतर मात्र अक्कल येताच ते काहीही वाटू लागते. अगदी तसेच माझेही झाले होते.

पण गेल्या काही वर्षात हळूहळू पुन्हा संदर्भ जुळू लागले आहेत. सामान्य लोकं देखील देशाच्या राजकारणापलीकडे जगाच्या राजकारणाचा विचार करू लागले आहेत. आतंकवादाचे काळे ढग आसमंत व्यापून राहिलेत. आण्विक अस्त्रांचे संकट असे काही घोंघावू लागले आहे की जग तिसर्‍या महायुद्धाच्या दिशेने वेगाने ओढले जात आहे. आणि या सर्वात नॉस्त्रादेमसने उल्लेखलेला महानेता कोण असावा याची उत्सुकता पुन्हा उफाळून आली आहे.

अब की बार मोदी सरकार !
प्रचाराच्या काळात मोदी समर्थकांतर्फे नॉस्त्रादेमसने उल्लेखलेला महानेता हे दुसरे तिसरे कोणी नसून आपले नरेंद्र मोदीच आहेत अश्या धाटणीचे मेसेज सोशलसाईटवर फिरत होते. काही संदर्भ जुळल्याने ते पटतही होते. एखादा चमत्कार घडल्याप्रमाणेच मोदींनी एक सामान्य चहावाला ते पंतप्रधान असा प्रवास केला आणि त्यानंतर जगभरात प्रवास करून आपला दबदबा निर्माण केला. त्यांचा हा थक्क करणारा प्रवास पाहता हे पटण्यासारखेही होते. पर्यायाने नॉस्त्रादेमसचे भविष्यही पटू लागले.

पण पुढील दोन अडीच वर्षात फारसे काही वेगवान थरारक घडले नाही, भाषणबाजीपलीकडे प्रत्यक्षात कृती अशी काही घडली नाही. त्यामुळे नॉस्त्रादेमसने जो महानेता वर्णन केलेला ते मोदी नाहीयेत असे जाणवले आणि नॉस्त्रादेमसच्या भविष्याबाबत पुन्हा एकदा ‘असे भविष्य वगैरे काही नसतेच’ असे वाटू लागले.
(ईथे हे मी फक्त आंतरराष्ट्रीय व्यासपीठ नजरेसमोर ठेवून बोलत आहे. भारताच्या विकासावर किंवा अच्छे दिन वर केलेले हे भाष्य नाही. तर याला कृपया मोदी बॅशिंग समजू नये)

असो,

पण आता पुन्हा एकदा जगातल्या सर्वात बलाढ्य राष्ट्राचा नेता डोनाल्ड ट्रंप यांचा अकस्मात उदय झाला आणि आल्याआल्याच त्यांनी आतंकवादाविरुद्ध आणि एकूणच आतंकवादाला आसरा देणार्‍या इस्लामिक राष्ट्रांविरुद्ध जे दंड थोपटले आहेत ते पाहता नॉस्त्रादेमसने उल्लेख केलेला महानेता हे डोनाल्ड ट्रंप असण्याची शक्यता वाटू लागलीय. तसेच मला जेवढे आठवतेय त्यानुसार त्या महानेत्याचा एका मित्राचा, म्हणजे एका मित्रराष्ट्रप्रमुखाचा उल्लेखही मी वाचलेल्या पुस्तकात होता. तो मित्र कदाचित आपल्या आशिया खंडातील असण्याची दाट शक्यता आहे. कोण ते नेमके मला आताच सांगता येणार नाही.

असो,
तर आपला नॉस्त्रादेमसच्या भविष्यवाणीवर विश्वास आहे का?
असल्यास नॉस्त्रादेमसने उल्लेख केलेला महानेता कोण असावा? की आजघडीला कोणीही तसा वाटत नसून अजून त्याचा उदय होणे बाकी आहे?

तळटीप कम सूचनावजा विनंती - आपला एकूणच भविष्यशास्त्रावर विश्वास नसेल तर धाग्यावर कमीतकमी अवांतर पोस्ट लिहा.

क्रमांक दोन - भाजपा विरुद्ध कॉंग्रेस किंवा मोदी विरुद्ध गांधी हा नेहमीचा वाद आणि चिखलफेक ईथे नको. स्थानिक राजकारणापलीकडे जाऊन विचार करा. शाळेत कधी नॉस्त्रादेमस वगैरे वाचले असेल तर त्यावर वर्तमानाच्या अनुषंगाने लिहा.

धन्यवाद,
ऋन्मेऽऽष

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पचात्तीस हजार या शब्दाचा शोध लावणारे माननीय राहुल शेठ उर्फ पप्पू यांच्या शिवाय दुसरे कोणी मला तरी दिसत नाही .
त्यांनी लोकसभेत भाजपला खतरनाक खूपवेळा प्रश्न विचारून आणि भाजप ला अडचणीत आणून बुध्दीची चुणूक दाखवली आहे प्रत्येक विषयावर अभ्यास करून बोलणे आणि कॉम्प्युटर ला लाजविन अशी सेकंदात आकडेमोड करने हे त्यांचे गुण इतर कुठल्याही नेत्यात दिसणार नाहीत .
त्यामुळे फक्त राहुल शेठ !!!!!

स्ट्रेंग्थ या शब्दाचे नवे स्पेलिंग देणारे, साक्षात ट्रंपचे नाव बदलून डोलांड करणारे , श्रीलंकेच्या राष्ट्रप्रमुखांच्या पत्नीला नवे नाव देणारे असताना?

@प्रणवंत -
ही माहीती नेटवरुन मिळवलेली आहे -

मध्यंतरी एक संध्याकाळ 'शाबर मंत्र' वाचण्यात सार्थकी घालविली. शाबर म्हणजे ग्राम्य, गावंढळ. तंत्र मार्गातील ही एक ग्राम्य शाखा आहे. भगवान शंकरांना आदिगुरु मानले जाते म्हणजे सर्व सिद्धांचे गुरु मागे बघत गेल्यास , उगम थेट शंभूशंकरापर्यंत जाउन थांबतो. तर पार्वतीस उदयगुरु म्हणतात. गुरु मच्छींद्रनाथ व गोरखनाथांना शाबर मंत्राचे जनक समजले जाते. सिद्ध आणि नाथ संप्रदायामध्ये संस्कृत् वगैरेला काट मारुन सरळ ग्रामीण भाषेतील श्लोकांना, मंत्रांचा दर्जा दिला गेलेला आहे. तर शाबर मंत्रांमध्ये शपथ आणि शाप दोन्हींचा उपयोग केला जातो, म्हणजे श्रद्धेला हात घातला जातो तर कधी धाकदपटशेने काम साध्य करुन घेतले जाते. होय मंत्रदेवतेला शिव्या, शापाची धमकी घालून वगैरे. म्हणजे इथे साधक जरी याचक असला तरी देवतेला धमकी देतो, अपशब्द बोलतो हे म्हणजे साधक जणू बालक आहे, व मंत्रदेवता जणू आई-वडील आहेत. बालकाने जर आईवडीलांना उद्देशुन अपशब्द बोलले तरी आईवडील रागावणार थोडेच आहेत? तर असे हे सरळ साधे नाते आहे. अनेक क्षेत्रिय भाषांच्या सरमिसळीने हे मंत्र बनलेत. सहसा मंत्रांचा शेवट - '‘शब्द साँचा पिण्ड काचा, फुरो मन्त्र ईश्वरी वाचा’ ' या ओळीनेही होतो. याचा अर्थ शब्द अक्षय आहे, तर देह नाशवंत आहे.
शब्द अक्षय आहे या उक्तीवरुन सहजच गुरबाणीमधील 'एक ओंकर, सत नाम, ...' कोणाला आठवेल. आणि ते तसे आठवले तर वावगे नाही.

ॐ इक ओंकार, सत नाम करता पुरुष निर्मै निर्वैर अकाल मूर्ति अजूनि सैभं गुर प्रसादि जप आदि सच, जुगादि सच है भी सच, नानक होसी भी सच –मन की जै जहाँ लागे अख, तहाँ-तहाँ सत नाम की रख ।
चिन्तामणि कल्पतरु आए कामधेनु को संग ले आए, आए आप कुबेर भण्डारी साथ लक्ष्मी आज्ञाकारी, बारां ऋद्धां और नौ निधि वरुण देव ले आए ।
प्रसिद्ध सत-गुरु पूर्ण कियो स्वार्थ, आए बैठे बिच पञ्ज पदार्थ ।
ढाकन गगन, पृथ्वी का बासन, रहे अडोल न डोले आसन, राखे ब्रह्मा-विष्णु-महेश, काली-भैरों-हनु-गणेश ।
सूर्य-चन्द्र भए प्रवेश, तेंतीस करोड़ देव इन्द्रेश ।
सिद्ध चौरासी और नौ नाथ, बावन वीर यति छह साथ ।
राखा हुआ आप निरंकार, थुड़ो गई भाग समुन्द्रों पार ।
अटुट भण्डार, अखुट अपार । खात-खरचत, कछु होत नहीं पार ।
किसी प्रकार नहीं होवत ऊना । देव दवावत दून चहूना ।
गुर की झोली, मेरे हाथ । गुरु-बचनी पञ्ज तत, बेअन्त-बेअन्त-बेअन्त भण्डार ।
जिनकी पैज रखी करतार, नानक गुरु पूरे नमस्कार ।
अन्नपूर्णा भई दयाल, नानक कुदरत नदर निहाल ।
ऐ जप करने पुरुष का सच, नानक किया बखान,
जगत उद्धारण कारने धुरों होआ फरमान ।
अमृत-वेला सच नाम जप करिए ।
कर स्नान जो हित चित्त कर जप को पढ़े, सो दरगह पावे मान ।
जन्म-मरण-भौ काटिए, जो प्रभ संग लावे ध्यान ।
जो मनसा मन में करे, दास नानक दीजे दान ।।”.

.हाच मंत्र घ्याना. यार गुरबाणीतील कितीतरी शब्दांच्या लडी समाविष्ट आहेत.
.
या मंत्राचा उगम असा आहे - द्वापारयुगात अर्जुनाने पाशुपत अस्त्र मिळवण्यासाठी शिवाची आराधना केली. शंकर प्रसन्न तर झाले पण त्यांनी अर्जुनाची परीक्षा घ्यायची ठरवली. अर्जुनाने एक डुक्कर बाणाने मारले तेच डुक्कर त्याच वेळी एका पारध्याने मारले. आणि मग अर्जुनात व त्या पारध्यात झाले युद्ध सुरु. शेवटी कृष्णानेच अर्जुनास सावध केले की अरे जे तुझे आराध्य दैवत त्यावरच बाण चालवतोस? अर्जुनाने शंकरांना साष्टांग दंडवत घालुन माफी मागीतली व शंकरांनी त्याला पाशुपत अस्त्राचा वर दिला. आता झाले काय याच वेळी हे युद्ध पहात होती पार्वती. तिने भिल्लीणीचा वेश धारण केलेला होता. युध पहात असतेवेळी तिने अन्य भिल्ल जमातीबरोबरच मांसही ग्रहण केलेले होते. युद्धोपरांत ती आपल्या मूळ रुपात आली तेव्हा तिने त्या भिल्ल-पारध्यांना वर मागण्यास सांगीतले. तेव्हा ते ग्राम्य, अडाणी पारधी म्हणाले की माते ना आम्हाला व्याकरण येतं ना आमची भाषा शुद्ध आहे. संस्कृत तर दूरच. पण तेव्हा तू असे मंत्र दे की जे सोपे, आमच्या भाषेत असतील तसेच त्यांना सिद्ध करणे अत्यंत सोपे असेल. पार्वती प्रसन्न झाल्याने शंकर म्हणजे आदिनाथांनी हेच मंत्र भिल्लांना दिले. जे की नंतर मत्स्येंद्रनाथांनी विस्तारीले. कानिफनाथ, चर्पटीनाथांनीही विस्तार केला. या मंत्रांचे मुख्य ५ प्रकार आहेत - प्रबल, बर्भर, बराटी,डार आणि अढैय्या आणि प्रत्येका प्रकाराची काही विशेषता आहे.
खरंतर हे गुप्त/सुप्त मंत्र आहेत कारण सभेत बोलले तर ते प्रभावहीन होतात. पण मला नेटवर काही सापडले ब्वॉ.

|| मन्त्र ||

सत नमो आदेश! गुरूजी को आदेश ॐ गुरूजी ,ड़ार शाबर बर्भर जागे जागे अढैया और बराट
मेरा जगाया न जागेतो तेरा नरक कुंड में वास ,दुहाई शाबरी माई की,दुहाई शाबरनाथ की ,आदेश गुरु गोरख को,

आणि मग पुढे त्या मंत्राची सिद्ध करण्याची सोपी पद्धत वगैरे नेटवर आहे. आणि मग त्या मंत्रांच्या पुनरुच्चारणाच्या काळात घोंगडिवर झोपायचे, ब्रह्मचर्य पाळायचे वगैरे नियम आहेत. सिद्ध करण्याआधी गुरु व गणेशाची पूजा करण्याची पद्धत आहे. आठवा - गणपती ही मुख्यत्वे तांत्रिक देवता आहे.

लक्ष्मी-पूजन मन्त्र
~~~~~~~~~~~~

“आवो लक्ष्मी बैठो आँगन, रोरी तिलक चढ़ाऊँ। गले में हार पहनाऊँ।। बचनों की बाँधी, आवो हमारे पास। पहला वचन श्रीराम का, दूजा वचन ब्रह्मा का, तीजा वचन महादेव का। वचन चूके, तो नर्क पड़े। सकल पञ्च में पाठ करुँ। वरदान नहीं देवे, तो महादेव शक्ति की आन।।”
.
.
.
महा-लक्ष्मी मन्त्र
~~~~~~~~~~

“राम-राम रटा करे, चीनी मेरा नाम। सर्व-नगरी बस में करुँ, मोहूँ सारा गाँव।
राजा की बकरी करुँ, नगरी करुँ बिलाई। नीचा में ऊँचा करुँ, सिद्ध गोरखनाथ की दुहाई।।”

वगैरे अनेक मंत्र आहेत.
मुख्यत्वे मी वाचल्यानुसार वशीकरण, जादू-टोणा नाश करण्याकरता, शारीरीक व्याधी नाहीशा व्हाव्या म्हणुन, किंवा इष्टदेवतेचे संरक्षण आपल्याला, आपल्या घरदाराला लाभावे म्हणुन असे हे मंत्र आहेत.
म्हणजे विद्न्यान प्रगत नसतेवेळी, मनुष्याला जे काही भय आधि (मानसिक), व्याधी (शारीरीक) होत्या त्या दूर करणासाठी तसेच धन-सौख्यप्राप्ती हेतू हे मंत्र आहेत असे दिसते.

नानक जी अन्नपूर्णा मन्त्र
ॐ सत्त नाम का सभी पसारा, धन गगन में जो वर तारा।
मन की जाय जहाँ लग आखा, तहँ तहँ सत्त नाम की राखा।
अन्नपूरना पास गई बैठाली, थुड़ो गई खुसाली।
… चिनत मनी कलप तराये। कामधेनु को साथ लियाये।
आया आप कुबेर भण्डारी, साथ लक्ष्मी आज्ञाकारी।
सत गुरू पूरन किया सवारथ, विच आ बइठे पाँच पदारथ।
राखा ब्रह्मा विशनु महेश काली भैरव हनु गनेस,
सिध चैरासी अरू नवनाथ बावन वीर जती चैसाठ।
धाकन गमन पिरथवी का वासन, रहे अम्बोल न डोले आसन।
राखा हुआ आप निरंकार, थुड़ी भाग गई समुन्दरो पार।
अतुत भण्डार, अखुत अपार, खात खरचत कुछ होय न ऊना, देव देवाये दूना चैना।
गुरू की झोली मेरे हाथ, गुरू वचनी बँधे पँच तात।
वेअण्ट बेअण्ट भण्डार, जिनकी पैज रखी करतार।
मन्तर पूरना जी का संपूरन भया।
बाबा नानकजी का गुरू के चरन कमल को नमस्ते नमस्ते नमस्ते।

एकंदर भाषा वेगळीच वाटते.

Pages