नॉस्त्रादेमसच्या स्वप्नातील महानेता ! कोण असावा?

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 March, 2017 - 13:28

लहानपणी आपण सर्वांनीच नॉस्त्रादेमसच्या सुरस आणि चमत्कारीक भविष्यकथा वाचल्या ऐकल्या असतीलच. एक भारावून जायचे वय असते अश्या कथा वाचताना. ते माझेही झाले होते. नंतर मात्र अक्कल येताच ते काहीही वाटू लागते. अगदी तसेच माझेही झाले होते.

पण गेल्या काही वर्षात हळूहळू पुन्हा संदर्भ जुळू लागले आहेत. सामान्य लोकं देखील देशाच्या राजकारणापलीकडे जगाच्या राजकारणाचा विचार करू लागले आहेत. आतंकवादाचे काळे ढग आसमंत व्यापून राहिलेत. आण्विक अस्त्रांचे संकट असे काही घोंघावू लागले आहे की जग तिसर्‍या महायुद्धाच्या दिशेने वेगाने ओढले जात आहे. आणि या सर्वात नॉस्त्रादेमसने उल्लेखलेला महानेता कोण असावा याची उत्सुकता पुन्हा उफाळून आली आहे.

अब की बार मोदी सरकार !
प्रचाराच्या काळात मोदी समर्थकांतर्फे नॉस्त्रादेमसने उल्लेखलेला महानेता हे दुसरे तिसरे कोणी नसून आपले नरेंद्र मोदीच आहेत अश्या धाटणीचे मेसेज सोशलसाईटवर फिरत होते. काही संदर्भ जुळल्याने ते पटतही होते. एखादा चमत्कार घडल्याप्रमाणेच मोदींनी एक सामान्य चहावाला ते पंतप्रधान असा प्रवास केला आणि त्यानंतर जगभरात प्रवास करून आपला दबदबा निर्माण केला. त्यांचा हा थक्क करणारा प्रवास पाहता हे पटण्यासारखेही होते. पर्यायाने नॉस्त्रादेमसचे भविष्यही पटू लागले.

पण पुढील दोन अडीच वर्षात फारसे काही वेगवान थरारक घडले नाही, भाषणबाजीपलीकडे प्रत्यक्षात कृती अशी काही घडली नाही. त्यामुळे नॉस्त्रादेमसने जो महानेता वर्णन केलेला ते मोदी नाहीयेत असे जाणवले आणि नॉस्त्रादेमसच्या भविष्याबाबत पुन्हा एकदा ‘असे भविष्य वगैरे काही नसतेच’ असे वाटू लागले.
(ईथे हे मी फक्त आंतरराष्ट्रीय व्यासपीठ नजरेसमोर ठेवून बोलत आहे. भारताच्या विकासावर किंवा अच्छे दिन वर केलेले हे भाष्य नाही. तर याला कृपया मोदी बॅशिंग समजू नये)

असो,

पण आता पुन्हा एकदा जगातल्या सर्वात बलाढ्य राष्ट्राचा नेता डोनाल्ड ट्रंप यांचा अकस्मात उदय झाला आणि आल्याआल्याच त्यांनी आतंकवादाविरुद्ध आणि एकूणच आतंकवादाला आसरा देणार्‍या इस्लामिक राष्ट्रांविरुद्ध जे दंड थोपटले आहेत ते पाहता नॉस्त्रादेमसने उल्लेख केलेला महानेता हे डोनाल्ड ट्रंप असण्याची शक्यता वाटू लागलीय. तसेच मला जेवढे आठवतेय त्यानुसार त्या महानेत्याचा एका मित्राचा, म्हणजे एका मित्रराष्ट्रप्रमुखाचा उल्लेखही मी वाचलेल्या पुस्तकात होता. तो मित्र कदाचित आपल्या आशिया खंडातील असण्याची दाट शक्यता आहे. कोण ते नेमके मला आताच सांगता येणार नाही.

असो,
तर आपला नॉस्त्रादेमसच्या भविष्यवाणीवर विश्वास आहे का?
असल्यास नॉस्त्रादेमसने उल्लेख केलेला महानेता कोण असावा? की आजघडीला कोणीही तसा वाटत नसून अजून त्याचा उदय होणे बाकी आहे?

तळटीप कम सूचनावजा विनंती - आपला एकूणच भविष्यशास्त्रावर विश्वास नसेल तर धाग्यावर कमीतकमी अवांतर पोस्ट लिहा.

क्रमांक दोन - भाजपा विरुद्ध कॉंग्रेस किंवा मोदी विरुद्ध गांधी हा नेहमीचा वाद आणि चिखलफेक ईथे नको. स्थानिक राजकारणापलीकडे जाऊन विचार करा. शाळेत कधी नॉस्त्रादेमस वगैरे वाचले असेल तर त्यावर वर्तमानाच्या अनुषंगाने लिहा.

धन्यवाद,
ऋन्मेऽऽष

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोदी आणि फक्त मोदी.
कोई शक?
नॉस्ट्रॅडॅमरट म्हणाला होता हा नेता आशियाई किंवा पौर्वात्य असेल.

अण्णा हजारे, विश्वास नांगरे पाटील, नाना पाटेकर, विकास आमटे, अविनाश धर्माधिकारी, सिंधूताई सपकाळ यांच्या नावाने सुभाषितांचे पेव फुटलेले आहे. ही लोकप्रियता अशीच वाढती राहिली तर यातलाच एक कुणीतरी...

तो महानेता म्हणजे मीच!

(असं मला लहानपणी ती भविष्यवाणी वाचतांना वाटायचं... अजूनही वाटतंच!)

मग राज ठाकरे काय वाईट आहेत, नाशिकचा विकास करणारा महापुरुष
आजवर एकही नेत्याला जमले नाही ते करून दाखवलंय

वा नोस्त्रदामस च्या भविष्याबद्दल वाचले होते की त्याच्या मते २०२० नंतर जगातील परिस्थिती अत्यंत गंभीर होईल, सगळीकडे अराजक मागेल, प्रचंड युद्ध होईल पण २०२९ नंतर मात्र काही शतके संपूर्ण शांतता जगात नांदेल.
ते खरे असेल तर ट्रंप सारखे लोक तिसरे महायुद्ध चालू करतील नि अण्वस्त्रे वापरून विध्वंस होईल, मग शांतताच शांतता!
तर कोण नेता येणार असेल तर तो बहुतेक २०२९ च्या आसपास येईल.
तो मी नाही, कारण मी काही २०२१ मधे जिवंत नसेन, तेंव्हा ऋ, तुमच्यावरच जबाबदारी आहे आता.

नन्द्या ईंटरेस्टींग आहे ते ..
म्हणजे अराजकता, युद्ध, आण्विक संहार आणि त्यानंतरची दिर्घ शांतता हे मी देखील वाचलेय..
जो महानेता आहे तो अराजकतेला जबाबदार ठरणार की शांततेला हे मात्र नॉस्त्रादेमसने कुठेच स्पष्ट केले नाही..
ट्रंप हे जर महानेता असतील तर ते नक्कीच शांततेला नाही तर अराजकतेला जबाबदार असतील..
की अराजकतेच्या मार्गाने शांतता हाच तर नाही ना महानेत्याचा अजेंडा आहे..
एक घाव दोन तुकडे करत, थोडे सुक्यासोबत ओले जाळत, जगातील सर्व दुष्ट प्रवृत्तींचा नायनाट करून टाकायचा हेच तर महानेत्याचे तत्व नाही ना ???

मोदी बॅशिंग समजू नये ---- काय पण !
>>>>>
राजसी, खरे तर ट्रंप आणि त्यांच्या सध्याच्या कारवाया, त्याविरुद्ध पेटलेल्या दहशतवादी संघटना, एकूणच ढवळून निघालेले आंतरराष्ट्रीय राजकारण यावरून नॉस्त्रादेमस त्याचे भविष्य आठवले आणि धागा काढला.
यात मोदी खरे तर कुठेच येत नाहीत, पण लोकसभा निवडणूकीच्यावेळी खरेच मोदी म्हणजेच तो महानेता असे मेसेज फिरायचे. माझ्याकडे आता तेवढा जुना बॅक अप नाही, अन्यथा शोधून दिले असते. असो, तर त्यामुळेच ओघानेच त्यांचा धाग्यात उल्लेख आला.
याऊपर एक गोष्ट तर आपण सर्वच मान्य कराल. आजच्या तारखेला जसा शाहरूख हा भारतातील एक ब्रांड आहे तसेच मोदी देखील आहेत. कोणतेही प्रॉडक्ट चालवायचे आहे तर या दोघांचा वापर करा. बस्स मी पण माझा धागा चालवायला त्यांना आणतो ईतकेच. अर्थात संदर्भ असेल तरच, अगदीच ओढूनताणून नाही Happy

जो महानेता आहे तो अराजकतेला जबाबदार ठरणार की शांततेला हे मात्र नॉस्त्रादेमसने कुठेच स्पष्ट केले नाही.. >>>

तुला नॉस्त्रादेमस ने काय लिहिले आहे त्याचा अर्थ लावता आला ? बापरे.. अगेन "युरेका युरेका" ऋन्म्याला साहित्यातील, पुरानतत्वातील नोबल पारितोषिक देण्यात यावे अशी मागणी मी करतो. Wink

एखादा चमत्कार घडल्याप्रमाणेच मोदींनी एक सामान्य चहावाला ते पंतप्रधान असा प्रवास केला आणि त्यानंतर जगभरात प्रवास करून आपला दबदबा निर्माण केला. त्यांचा हा थक्क करणारा प्रवास पाहता हे पटण्यासारखेही होते. पर्यायाने नॉस्त्रादेमसचे भविष्यही पटू लागले.>>>> यापेक्शा भाबडे अजूनपर्यंत काही वाचनात आले नाही. Give him medal !

>> मोदींनी एक सामान्य चहावाला ते पंतप्रधान असा प्रवास केला

मोदी चहावाला होते हे तुम्हाला कुणी सांगितले? आणि सांगितले असेल तर त्यावर तुम्ही विश्वास कशाच्या आधारे ठेवला? मी तर ऐकले होते कि एक अगदी तरुण पोरगा काहीतरी घनगंभीर गुन्हा करून थेट संघाच्या मुख्यालयात घुसला. कारण त्याला माहित होते कि मुख्यालयात पोलीस परवानगी शिवाय प्रवेश करू शकत नाहीत. म्हणून तो सुरक्षित राहील. आणि तसेच झाले. थापा मारून मुख्यालयात त्याने भलतीच कथा सांगितली. तोच पुढे नरेंद्र मोदी झाला. आता यात खरे खोटे कितपत माहिती नाही. पण मी जे ऐकले ते हेच आहे. या पार्श्वभूमीवर सहज म्हणून आपण जुन्या काळातला मोदींचा कृष्णधवल फोटो पाहायला हरकत नाही.
B_Id_419534_narendra-modi-1.jpg

असो. बाकी नॉस्त्रादेमस वगैरे सगळे थोतांड आणि खुळचटपणा आहे हे एव्हाना सिद्ध झाले आहे. राजीव गांधी यांनी पहिल्यांदा सत्तेत आल्यानंतर १९८५ साली लोंगोवाल करार करून त्याकाळातला धगधगणारा पंजाब प्रश्न सोडवला. शांततेच्या दिशेने वाटचाल सुरु केली. तेंव्हा सुद्धा लोक त्यांच्याविषयी पण हेच बोलत होते.

बाकी नॉस्त्रादेमस वगैरे सगळे थोतांड आणि खुळचटपणा आहे हे एव्हाना सिद्ध झाले आहे.
>>>

कुठे सिद्ध झाले आहे? कोणी सिद्ध केलेय?

>> कुठे सिद्ध झाले आहे? कोणी सिद्ध केलेय?

ते मी पुढे सांगितले आहेच कि. नॉस्त्रादेमसच्या स्वप्नातला नेता असे आजवर अनेक नेत्यांच्या बाबत म्हटले गेले आहे. तब्बल तीस वर्षापूर्वी राजीव गांधीना पण असे म्हटले गेले होते. पण प्रत्यक्षात कोणी नेता झालाय का तसा? जी गोष्ट अनेकवेळा सिद्ध होऊ शकली नाही थोतांडच.

ओके म्हणजे आजवर बांधलेले अंदाज चुकले म्हणून ते खोटे म्हणत आहात .. हुश्श!!! किती घाबरलो मी, मला वाटले खरेच नॉस्त्रादेमस तोतया होता हे काही सिद्ध वगैरे झाले की काय...

फोटोत काही विशेष आहे का? उजवा डोळा चमकतोय (तो लाईट पडल्यामुळे असावा.) त्यामुळे फोटो जरा विचित्र वाटतोय. उजवा डोळा बोटाने झाकुन बघितला तर तसे वाटन नाही, नॉर्मल वाटतो. याव्यतिरिक्त अजून काही खास आहे का?

पृथ्वीकर तुम्हाला समजत कसं नाही, त्यांनी सांगितलं आहे न गुन्हे करून मुख्यालयात आलेला एक युवक ही पार्श्वभूमी वापरून फोटो पाहा!!!

हरेक के फिल्टर सेट होता है भाई, जिस रंग की कांच उस रंग की दुनिया, बदकिस्मती समझो हामारी की हामारी कांच ही तिरंगी है. Happy

कदाचित फोटोमध्ये ते रोलेक्स घड्याळ असेल म्हणून फोटो बाबत विशेष उल्लेख असावा Lol तेव्हाच्या काळात dslr नीट झूम करत नव्हते बहुतेक Happy

बाकी नोस्ट्रोदेमस हे थोतांड आहे ह्याच्याशी बहुतांशी सहमत कारण
१- त्यांची किरकोळ खरी झालेली उदाहरणे फोकस केली गेली आतापर्यन्त
२- त्यांचे भविष्य कथन गूढ़ सांकेतिक भाषेत आहे त्यामुळे नरो वा कुंजरो चा फायदा मिळतो प्रत्येक प्रोबबेलिटि साठी
३- ज्योतिष हे शास्त्र आहे हेच सिद्ध नाही अजुन पर्यन्त (माझे व्यक्तिगत मत वेगळे असू शकते) त्यामुळे ही सर्व भाकिते थोतांड ह्या टाइटल खाली नक्की येवू शकतात कारण जेथे 1+1= कधी 3 कधी 5 उत्तर येईल ते सायन्स च्या चौकटी मध्ये सिद्ध करणे कठीण आहे

अंबज्ञ यांच्याशी सहमत. ते फारेनर आपल्याला हसतात पण तेही तितकेच अंधश्रद्ध आहेत. नास्त्रेदमस हे एक पॉलिटिकल टुल आहे. जनतेच्या भावना त्याच्या सो कॉल्ड प्रेडिक्शन नुसार प्रभावित करायचे... देअर इज नो सबस्टन्स अ‍ॅट ऑल. तरी विज्ञानवादी म्हणवून घेणारी राष्ट्रे आणि जनता असल्या भणंगांच्या काय मागे लागते कळत नाही. नास्त्र्यापेक्षा आपल्याकडच्या कोणत्याही गल्लीबोळातले ज्योतिषी जास्त संयुक्तिक भविष्य सांगू शकतात.

मी तर ऐकले होते कि एक अगदी तरुण पोरगा काहीतरी घनगंभीर गुन्हा करून थेट संघाच्या मुख्यालयात घुसला. कारण त्याला माहित होते कि मुख्यालयात पोलीस परवानगी शिवाय प्रवेश करू शकत नाहीत. म्हणून तो सुरक्षित राहील. आणि तसेच झाले. थापा मारून मुख्यालयात त्याने भलतीच कथा सांगितली. >>> कुठे गुजरातमध्ये गुन्हा करुन नागपुरला गेला का तो युवक ? कसा ट्रेनने गेला की विमानाने ? लोल !

हरेक के फिल्टर सेट होता है भाई, जिस रंग की कांच उस रंग की दुनिया, बदकिस्मती समझो हामारी की हामारी कांच ही तिरंगी है.>>> Kya baat hai! same here.

नास्त्र्या?
तुमचा लंगोटीयार का हो?
फारेनर वगैरे काही फक्त भारतात नसते हो. एका देशात दुसर्‍या देशातले लोक फारेनरच. जगात सगळ्या देशात सगळ्या प्रकारचे लोक असतात.
आणि थोतांड थोतांड काय नि कशाला म्हणता? अहो -जिंदगी ख्वाब है, ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या हे सगळे माहित आहे ना?
जगात आहोत तर जगात जे आहे ते काय महत्वाचे - एक गंमत.
असो.
तर हा जो महानेता येणार आहे तो आपल्या पुराणातला दहावा अवतार कलंकी तर नव्हे? तो सगळ्या जगाचा नाश करणार आहे म्हणे.
तसेहि आपल्याकडे श्री भगवान शंकर यांना जग नष्ट करण्याचेच काम दिले आहे, तेच येतील बहुतेक. एकट्या विष्णूचेच अवतार का? मा़झा पण अवतार!

बाकी तीसरे महायुध्द हां विषय जर खरोखर गंभीरतेकड़ेे चर्चा करण्यासाठी वळत असेल तर खालील गोष्टी नक्की अभ्यासाव्यात असे मला आवर्जून सांगवेसे वाटते

१)अनुनाकी
२)निम्बुरा वासीय
३)ड्रेको पंथीय आणि त्यांचे ग्रह
४)परग्रह वासियांचा वसुन्धरेवरील हस्तक्षेप
आणि अर्थात 3ऱ्या महायुद्धतील सुद्धा
५)ग्रे मानव आणि चीन

वरील सगळे संदर्भ इलुमिनिटी, १३ रॉयल फॅमिली, अनुनाकी अश्या प्रकारे गुगलुन माहिती घेतली तर 3ऱ्या महायुद्धाचा खरा पसारा लक्षात येतो आणि आंतरराष्ट्रीय समुदायास त्यातही प्रामुख्याने प्रगत राष्ट्रांस इस्रायल आणि अंटार्टिका मध्ये का एवढा इंटरेस्ट आहे ते समजते

नास्त्र्या?
तुमचा लंगोटीयार का हो?
>> काय झालं? तुमच्या श्रद्धास्थानाचा अपमान वगैरे होऊन भावना दुखावल्यात काय?

फारेनर वगैरे काही फक्त भारतात नसते हो. एका देशात दुसर्‍या देशातले लोक फारेनरच. जगात सगळ्या देशात सगळ्या प्रकारचे लोक असतात.
>> हो का? बरोबर.. मला काय माहिती, मी गरिब अशि़क्षित अज्ञानी बिचारा भारतात राहतो, माझ्यासाठी बाकीचे सगळे फारेनरच... चुकलं तर माफ करा गरिबाला.. Wink

आणि थोतांड थोतांड काय नि कशाला म्हणता? अहो -जिंदगी ख्वाब है, ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या हे सगळे माहित आहे ना?
>> काय टोटल लागंना बावा..!

जगात आहोत तर जगात जे आहे ते काय महत्वाचे - एक गंमत.
>> परत काय टोटल लागंना बावा...

असो.
>> असो तर असो.. Happy

अंबज्ञ, धन्यवाद.
नानाकळा - अहो माझी मुळीच श्रद्धा नाही जगातल्या कुणावर.
ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या हे कळल्यावर जगातले सगळेच खोटे! (ते कळत नसेल तर जिंदगी ख्वाब है, असे मराठीत लिहीले). नुसती गंमत म्हणून बघायचे. नोस्त्रडामस हि मिथ्या नि गल्लीबोळातले ज्योतिषी सगळेच मिथ्या नि सयुक्तिक तरी जगात ना? म्हणजे तेहि मिथ्याच.
तर काय उगाच गंभीरपणे वागायचे?

हा हा हा, ते कळले हो! Happy

माझा मुद्दा इतकाच की नास्त्र्याच्या (जो जे वांछिल तो ते लाहो) छाप भविष्यवाणीला किंमत द्यायची गरज नाही. त्यापेक्षा आपल्याकडे पंचागांत जास्त सुस्पष्ट भविष्य लिहिलेलं असते, बर्‍याचदा तंतोतंत बरोबरही येतं...

मी तर दहावीचे पेपर नॉस्त्रॅदेमसची भविष्यवाणी वाचूनच दिले होते. पण एक दोन ठिकाणी त्याच्या गूढ श्लोकांची उकल न झाल्याने ८ टक्के गुण गेले. नाहीतर शंभर टक्के गुण मिळवून बोर्डाचे ऑस्कर पारितोषिक मिळवले असते ....

Lol

त्या 8% गुणांसाठी नुकसान भरपाइची केस दाखल करा कदाचित त्यानिमित्ताने का होईना स्वीस अकाउंट मधले काला धन भारतात येईल Proud

नास्ट्रोदेमस् ह्यांच्या आत्म्याला सुद्धा आज वाटत असेल की माबो चे सदस्य होवून इकडे कॉमेंट करावी आणि सर्व कन्फूझन दूर करावे Wink

ते खरे, खोटे असले तरी जगाला त्याचा काहीच उपयोग नाही. त्यामुळे त्यावर त्याचे अर्थ शोधत, लावत बसण्यात वेळ घालवण्यापेक्षा दुर्लक्ष करणेच योग्य. Happy

त्या 8% गुणांसाठी नुकसान भरपाइची केस दाखल करा >>> असे कसे असे कसे ? ती चूक आपलीच ना ? आणि मिळाले ते त्याच्याच कृ पेने नाही का मिळाले ? नाहीतर उलटे गुण मिळाले असते.

आपल्याकडे पंचागांत जास्त सुस्पष्ट भविष्य लिहिलेलं असते, बर्‍याचदा तंतोतंत बरोबरही येतं...
तुम्हाला कुठल्या पंचांगात दिसले का काही महानेत्याबद्दल, २०२० नंतर काय होईल त्याबद्दल? समजा एका राशीला लिहिले असेल की जगबुडी होईल, नि दुसरीत वेगळेच लिहीले असेल तर खरे काय?

आम्ही कालनिर्णय वापरतो, त्यात काही लिहिलेले नाही नेत्याबद्दल. बाकी आमचे भविष्य बरोबर आले की नाही हे मी महिना संपल्यावर बघतो की कोणच्या राशीमधे साधारण बरोबर लिहीले आहे. ती माझी त्या महिन्यातली रास. आता या महिन्यात माझी रास कोणती हे मार्च ३१ नंतर कळेल.

साधरणपणे भविष्य बघण्यात मला मुळीच गम्य नाही - माझे भविष्य आहे की मी कधी तरी मरणार आहे. बाकीचे जे होईल ते होईल. नोस्त्र्या नको, भृगु संहिता नको नि पंचांग नको - ते नुसते मायबोलीवर चघळण्याचे विषय.

नानाकळा, थोडक्यात ज्योतिष्य थोतांड नाही, पण नॉस्त्र्या तोतया होता म्हणुन त्याने सांगितलेले भविष्य थोतांड असे आपणास म्हणायचेय का?

लेट मी क्लिअर फ्यु थिन्ग्स!!!
१. अंकज्योतिष्य हे थोतांड नाही. (ती गणिती आकडेमोड आहे)
२. फलज्योतिष्य हे सांगणार्‍याच्या क्षमतेवर अवलंबून आहे. (त्यामुळे ते थोतांड आहे की नाही हे सब्जेक्टिव आहे)
३. नॉस्त्रोभौ यांच्या कहान्या जो जसा अर्थ लावेल तशा आहेत. स्पष्ट नाहीत.
४. कोणीही केलेली भविष्यवाणी स्पष्ट, अर्थ लावत बसायची गरज न पडणारी असावी. तरच ती ग्राह्य समजली जावी.

Pages