शब्द-शृंखला - ३ मार्च

Submitted by संयोजक on 2 March, 2017 - 23:52

आपण मायबोलीवर आहोत कारण आपले मराठीवर प्रेम आहे, आपल्याला मराठी भाषा येते ह्याचा अभिमान आहे. मग चला तर त्या अभिमानाला आव्हान देऊया. आपले मराठीचे, मराठी व्याकरणाचे ज्ञान तपासून बघूया.

आम्ही एक शब्द देऊ.
पहिला खेळाडू त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू होणारा दुसरा शब्द देईल.
दुसरा खेळाडू दुसर्‍या शब्दाच्या (पहिल्या खेळाडूने दिलेल्या शब्दाच्या) शेवटच्या अक्षरावरून सुरू होणारा पुढील शब्द देईल.
या प्रकाराने एकापुढे एक शब्द देत देत एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहे.

१. वाक्य पूर्ण करायला कमीतकमी पाच शब्द हवेत.
२. वाक्याचा शेवट क्रियापदाने व्हायला हवा.
३. एक अक्षरी शब्द वापरता येणार नाहीत. (जसे व, तो, रे इत्यादी)
४. सगळे शब्द मराठीच हवेत.
५. प्रश्नार्थक वाक्य चालणार नाही.
६. प्रत्येक खेळाडू एका वेळी एकच शब्द देऊ शकतो.
७. शेवटचे अक्षर जोडाक्षर असेल तर त्यातले कुठलेही अक्षर वपरता येईल.
८. एका वेळेस दोन खेळाडूंनी शब्द दिल्यास पहिल्या खेळाडूचा शब्द ग्राह्य धरावा.
९. वाक्य अर्थपूर्ण व्हावे म्हणून एका वाक्यात जास्तीत जास्त १२ शब्द असावेत.

उदाहरणः
उदाहरण नको कारण नियम माहितीपूर्ण रचलेत.

शब्द - घनदाट
वाक्य - घनदाट टपरीवरील लाजवाब बटाटावड्याने नाश्त्याची चमचमीत तल्लफ फारच चविष्टपणे निभावली.

शब्द - पॄथ्वीवरील
वाक्य - पॄथ्वीवरील लबाड डोमकावळे लोकांच्या चापलुशीने नाहक कष्टप्रद दिवस सोसायला लागले .

शब्द - तथाकथित
वाक्य - तथाकथीत ताम्रयुगात तांब्याच्या चमच्याने नवनीत तव्यावर रांधलेल्या लसणाच्या चटनीबरोबर रात्री रिचवत.

शब्द - क्रोधागरात
क्रोधागरात तळमळत तुषारने निखिलला लाखोकरोडो डॉलर रमणिकला लगोलग गारंभीत तोलण्यास सांगितले.

शब्द - परंपरागत
वाक्य - परंपरागत तालीम मल्लांकरिता ताकासह हिरव्या वाटाण्यातील लसुणयुक्त कोप्ताकरी रसरशीत तब्येतीसाठी ठिकठाक कढवतात.

शब्द - सासूबाईंनी
सासूबाईंनी नारळाचा चव वाटणात तासून नवलकोलाची चटकदार रस्साभाजी जिभेला लावली.

शब्द - उंची
वाक्य - उंची चिरेबन्दी द्णकट टकमकावर रुबाबदार रत्नजडित तलवारीसह हत्तींना नमवण्यासाठी ठराविक काळ लागतो

शब्द - झगमगत्या
वाक्य - झगमगत्या तारेतारकांना नाविन्यपूर्ण नक्षत्रांचे चमचमते तेज जरासुद्धा दिसल्यास सवयीप्रमाणे नेहमी मनात तेवतात.
अजून एक वाक्य - झगमगत्या तारेतारकांना नाविन्यपूर्ण नक्षत्रांचे चमचमते तेज जरासुद्धा दिसल्यास सवयीप्रमाणे नेहमी मोहविते

शब्द - पावसाळ्यात
वाक्य - पावसाळ्यात तरारून नवलतिका कोवळ्या लटकणार्‍या रेशमासारख्या खरच चमकत तजेलदार रुळतात.

शब्द - चांद्रयानात
वाक्य - चांद्रयानात तरंगणार्‍या रजनीप्रकाशात तेजस्वी वाटणार्‍या रहस्यमय युगाचा चांगदेवाने नकाशा शाकारला.

शब्द - शेतकऱ्याने
वाक्य - शेतकऱ्याने नानूभाऊला लामणदिवा वापरण्याचे चातुर्य येण्याकरीता तासभर रस्सीने निरनिराळ्या युक्त्या कश्याबश्या योजल्या.

शब्द - पिटुकल्या
वाक्य - पिटुकल्या लिलूने निनाला लांबलचक काचेचा चकचकीत तासलेला लंबगोलाकृती तुळतुळीत तरणतलाव विकायला लावले / विकण्यास सांगितले.

शब्द - समुद्रकिनारी
वाक्य - समुद्रकिनारी रात्री रजनीकांत तडकाफडकी कपडे डागाळण्यास सुरुवात तसेच चालवणार.

शब्द - सुवासिक
वाक्य- सुवासिक कंदमुळे लटकणार्‍या रानवेलीस सुशर्माने नकळत तरुवर रुजवले.

शब्द- नीरव
वाक्य- नीरव वाटेवर रमतगमत ताडगोळे लुसलुशीत तासुन नजरेआड डबक्यात तरंगणाऱ्या रातकिड्यास सालं लावावीत.

शब्द- यज्ञ

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झगमगत्या तारेतारकांना नाविन्यपूर्ण नक्षत्रांचे चमचमते तेज जरासुद्धा दिसल्यास सवयीप्रमाणे नेहमी मनात

झगमगत्या तारेतारकांना नाविन्यपूर्ण नक्षत्रांचे चमचमते तेज जरासुद्धा दिसल्यास सवयीप्रमाणे नेहमी मनात तडफडतात.

झगमगत्या तारेतारकांना नाविन्यपूर्ण नक्षत्रांचे चमचमते तेज जरासुद्धा दिसल्यास सवयीप्रमाणे नेहमी मनात तडफडतात
तडफडतात ( तडफडाट होती या अर्थी ) असं वाटलेलं Wink

झगमगत्या तारेतारकांना नाविन्यपूर्ण नक्षत्रांचे चमचमते तेज जरासुद्धा दिसल्यास सवयीप्रमाणे नेहमी मोहविते

मला असे पुर्ण करावे वाटलेले!

Pages