शब्द-शृंखला - २ मार्च

Submitted by संयोजक on 1 March, 2017 - 23:49

आपण मायबोलीवर आहोत कारण आपले मराठीवर प्रेम आहे, आपल्याला मराठी भाषा येते ह्याचा अभिमान आहे. मग चला तर त्या अभिमानाला आव्हान देऊया. आपले मराठीचे, मराठी व्याकरणाचे ज्ञान तपासून बघूया.

आम्ही एक शब्द देऊ.
पहिला खेळाडू त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू होणारा दुसरा शब्द देईल.
दुसरा खेळाडू दुसर्‍या शब्दाच्या (पहिल्या खेळाडूने दिलेल्या शब्दाच्या) शेवटच्या अक्षरावरून सुरू होणारा पुढील शब्द देईल.
या प्रकाराने एकापुढे एक शब्द देत देत एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहे.

१. वाक्य पूर्ण करायला कमीतकमी पाच शब्द हवेत.
२. वाक्याचा शेवट क्रियापदाने व्हायला हवा.
३. एक अक्षरी शब्द वापरता येणार नाहीत. (जसे व, तो, रे इत्यादी)
४. सगळे शब्द मराठीच हवेत.
५. प्रश्नार्थक वाक्य चालणार नाही.
६. प्रत्येक खेळाडू एका वेळी एकच शब्द देऊ शकतो.
७. शेवटचे अक्षर जोडाक्षर असेल तर त्यातले कुठलेही अक्षर वपरता येईल.
८. एका वेळेस दोन खेळाडूंनी शब्द दिल्यास पहिल्या खेळाडूचा शब्द ग्राह्य धरावा.
९. वाक्य अर्थपूर्ण व्हावे म्हणून एका वाक्यात जास्तीत जास्त १२ शब्द असावेत.

उदाहरणः
उदाहरण नको कारण नियम माहितीपूर्ण रचलेत.

शब्द - रौद्र
वाक्य - रौद्र रुपाचे चित्रविचित्र तळपणारे रेखाचित्र तमाम मायबोलीकरांना न्याहाळण्यास सांगावे.

शब्द - निसर्गरम्य
वाक्य - निसर्गरम्य मेदिनी नुकतीच चराचरात तेजस्वी वदनाने नटली.

शब्द - मोहक
वाक्य - मोहक कृष्णाच्या चरणकमलांवर राधेने नवरत्नांचा चमचमणारा रत्नहार रोमांचित तनुने नाजुकपणे निरखला.

शब्द - सिंहाच्या
वाक्य - सिंहाच्या चालीवर, राजपुत्र, रहस्यमय यच्चयावत तोडगे गंभीरपणे निवडण्यास सांगतो.

शब्द - कार्यालयात
वाक्य - कार्यालयात तिच्या येण्याने, नकळत त्यांच्या चुगल्या लगोलग गुरुजींच्या चावडीमध्ये यायला लागल्या.

शब्द - लाचार
वाक्य - लाचार रत्नावलीच्या चाहत्यांनी निरवानिरव व्हायला लागल्यावर रस्त्यावर रंगीत तालीम मांडली.

शब्द - गानकोकिळा
वाक्य - गानकोकिळा लतादीदी दादरच्या चतुरस्त्र स्त्रीवर्गात तेव्हा हलकेच चंदेरी रजईवर रियाज जमवायला लागल्या.

शब्द - दर्‍याखोर्‍यांतून
वाक्य - दर्‍याखोर्‍यांतून नदीच्या चंचल लकबदार रस्त्याने न्हाउन नटलेल्या लतासुमनांचा चमकदार रानमेवा विखुरला.

शब्द - लग्नघटिका
वाक्य - लग्नघटिका काळानुरूप पद्धतीने नवनविन नियम, मुख्यत्वे वंशपरंपरागत तुलनेने नवरदेवाच्या चालीरीतीनुसार रुजवतात.

शब्द - नकळत
वाक्य - नकळत तिलोत्तमेने नवसागर रसशाळेत तुरटी टाकण्याचा चुकीचा चंबू बुडवला.

शब्द - अस्वस्थ
वाक्य- अस्वस्थ सकाळी लिहिलेले लेख खरेखोटे, टवाळखोरांनी नेहमीप्रमाणे निनावी वापरले.

शब्द- राष्ट्राध्यक्ष
वाक्य - राष्ट्राध्यक्ष क्षणभर रागावुन नेत्रकटाक्षाने नवयोजना निभावण्यासाठी ठमाकाकूंना नाक कापून नाचवतात.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

रौद्र रुपाचे चित्रविचित्र तळपणारे रेखाचित्र तमाम मायबोलीकरांना न्याहाळण्यास सांगावे.
निसर्गरम्य मेदिनी नुकतीच चराचरात तेजस्वी वदनाने नटली.
मोहक कृष्णाच्या चरणकमलांवर राधेने नवरत्नांचा चमचमणारा रत्नहार रोमांचित तनुने नाजुकपणे निरखला.

<<< वा! ही तिन्ही वाक्ये मस्तच साधली आहेत. मस्त!

Pages