देवाने, मुलींना अस का बनवल?

Submitted by nikhil_jv on 5 March, 2009 - 03:36

देवाने मुलींना अस का बनवल?
की बघताच मन पत्येकीवर जडायच
सगळ्याच हव्याहव्याशा वाटायच्या
मग कोणा एकीच्याच प्रेमात का पडायच?

कोणाचे डोळे, तर कोणाचे केस
प्रत्येकीत काहीतरी वेगळाच गुण
नजर एकीवरच टिकत नाही
पाहताच वाजु लागते प्रेमाची धुन

कोणी हासुन आपलस करत
कोणी लाजुन मनामध्ये शिरत
प्रत्येकीची खुबी निराळीच असते
मग आपल काळीज कुठे आपल्याजवळ उरत

कोणी नजरेतूनच गार करत
कोणी बोलण्यातूनच वार करत
किती अदा लुभवण्याच्या असतात
मन हे वेडे प्रत्येक नखर्‍यात फसत

कपड्यातही मुली कमाल दिसतात
तोकडे कपडे घालुन घायाळ करतात
कोणाकोणाला नजर द्यावी
एकसाथ सर्वच मनाला घेरतात

नटण्यातही त्यांच्या बात असते
मेणबत्तीला जशी वात असते
मन आमच उजळुन टाकतात
प्रत्येक दिवसामागे जशी रात असते

अशात एकीतच कस मन लागेल
शहण्या बाळासारख कस वागेल
प्रत्येक तर्‍हा खुणावत असताना
एकीवरच आमच कस भागेल

खरच! देवाने मुलींना अस का बनवल?
की बघताच मन पत्येकीवर जडायच
सगळ्याच हव्याहव्याशा वाटायच्या
मग कोणा एकीच्याच प्रेमात का पडायच?

गुलमोहर: 

Happy

*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

काय निखिलराव , काय विचार काय आहे तुमचा?
जरा जपुन ह !!
Happy

>>> कपड्यातूनही मुली कमाल दिसतात
धन्य !!!

    ***
    Entropy : It isn't what it used to be.

    नटण्यातही त्यांच्या बात असते
    मेणबत्तीला जशी वात असते
    Lol
    ----------------------
    एवढंच ना!

    निखिल कविता चांगली आहे पण काय च्या काय कविता मध्ये टाक.

    कपड्यातूनही मुली कमाल दिसतात >
    Lol
    गडावरचा देव उत्तर देइल काय ?? Proud
    -----------------------------------------
    सह्हीच !

    एकीच्याच प्रेमात का पडायच? >>>
    खरंच की. का पडायचं?
    एक नंबर कविता आहे.

    (स्वगत- गुलमोहर वाचणे हा माझा जन्मसिध्द हक्क आहे, पण मी स्वतःला कसा वाचवू?)

    --
    संपलाच नाही, भाकरीचा मार्ग;
    ग्रंथातले स्वर्ग, कशापायी?

    देवा पाडुरंगा !
    उचल रे !

    मेरे को नही रे बाबा ! Biggrin

    -प्रकाश
    -------------------------------------------------------
    दीवाना हुआ बादल !

    सगळ्यांच्या प्रेमात पड आणि सगळ्या मुली तुझ्यासकट सगळ्या मुलांच्या प्रेमात पडूदेत...
    सगळ्यांचं कल्याण होवो!!
    - नी
    http://saaneedhapa.googlepages.com/home

    मस्त Happy
    .
    कपड्यातूनही मुली कमाल दिसतात >>>> कुणाच्या कपड्यातून ??? Rofl
    .

    ------------------------
    देवा तुझे किती सुंदर आकाश
    सुंदर प्रकाश सूर्य देतो

    हे राम !
    ************
    परमेश्वराचा संकल्प म्हणजेच आदिमाया, शुद्धविद्या, ललिता, राधा. तर इंद्रियशक्तींच्या सहाय्याने मानव ज्या वासना उत्पन्न करतो व वाढवतो, त्या वृत्ती म्हणजेच्'मन' म्हणजेच मानवी संकल्प म्हणजेच 'माया' - 'अविद्या'.

    सगळ्यांच्या प्रेमात पड आणि सगळ्या मुली तुझ्यासकट सगळ्या मुलांच्या प्रेमात पडूदेत...
    सगळ्यांचं कल्याण होवो!! >>>> Lol

    खरच! देवाने मुलींना अस का बनवल?
    >> देवाने मुलींना असे बनवले म्हणूनच आज तुम्ही आम्ही सारे या जगात आहोत. तेच कारण असावे देवाचे बहुतेक. Uhoh
    ----------------------
    एवढंच ना!

    >>कपड्यातूनही मुली कमाल दिसतात Rofl

    >>तोकडे कपडे घालुन घायाळ करतात
    तोकडे काय घेउन बसलात, पुर्ण कपडे घालुनही तेच करतात....

    अरे देवा!! तिथे ललितवर कुणी लिहिले की या माणसाने चांगल्या कविता लिहिल्या आहेत. वाचले तर हे काय??
    अशात एकीतच कस मन लागेल
    शहण्या बाळासारख कस वागेल
    प्रत्येक तर्‍हा खुणावत असताना
    एकीवरच आमच कस भागेल

    >>
    आणी हेच महाशय तिथे मुलीच्या पालकाना सावधान वगैरे सांगत होते.!!

    चलो अच्छा है.. बहुतेक आम्ही म्हातारे झालो.. Happy

    --------------
    नंदिनी
    --------------

    आणी हेच महाशय तिथे मुलीच्या पालकाना सावधान वगैरे सांगत होते.!! > नंदु Happy

    आशु ,बहूतेक असले लोक विसरतात आपली आई,बहीण,आत्या,मावशी ह्या पण कधी काळी मुलीच होत्या
    Sad
    -----------------------------------------
    सह्हीच !

    >>>> कपड्यातही मुली कमाल दिसतात
    >>>> तोकडे कपडे घालुन घायाळ करतात

    येथे कमाल हा शब्द "जास्त" या अर्थी (किमान च्या विरुद्धार्थी) वापरला असावा असे वाटते

    तस पहाता कविता सो सो च आहे! काहिच्या काही आहे! अन हीच कविता अशीच वाढवत न्यायची झाली तर.....
    "कमाल" मुलिन्ना न्याहाळण्यासाठी
    गडद गॉगल लावुन पोरे झुरतात (झुरतात ऐवजी मरतात हा शब्द वापरायला देखिल हरकत नसावी)
    "तिकडचा" दुष्काळ सोसेना
    पुण्यामुम्बैकडे वारीला येतात Proud

    आशाळभूत हिडीस नजरा
    तहानलेल्या कटाक्षासाठी
    अनावर वासनेच्या डोम्बाला
    कसेतरी जिरविण्यासाठी

    लेकराला पाजत्या मातेला पाहून
    यान्चीही भूक चाळवते
    तोन्डी काही लागत नाही
    तर लेखणी लगेच सरसावते.......!
    ...;
    आपला, लिम्बुटिम्बु

    >>आणी हेच महाशय तिथे मुलीच्या पालकाना सावधान वगैरे सांगत होते.!!
    Rofl

    होतं असं कधी कधी....

    आणी हेच महाशय तिथे मुलीच्या पालकाना सावधान वगैरे सांगत होते.!!<<
    नंदुबाई... सावधान सांगण्याचं खरं कारण या कवितेत आहे. अश्या न्याहाळकांपासून सावधान.
    -नी
    http://saaneedhapa.googlepages.com/home

    मस्त! रसिकांना विनोदाची पण चांगली जाण आहे!

    पत्येकीवर
    तुला प्रत्येकीवर असे म्हणायचेय बहुतेक....

    छान आहे...मला आधी हास्यकविता वाटली, पण मग तोही निकष खुप उच्च वाटला.. बहुतेक काहीच्या काहीत ठिक दिसेल...

    सगळ्याच हव्याहव्याशा वाटायच्या
    मग कोणा एकीच्याच प्रेमात का पडायच?

    'प्रेम म्हणजे नक्की काय' या विषयावर गुगलुन पहा.. कदाचित काहितरी मौलिक माहिती मिळेल...:)

    बाकी चालु ठेवच... हल्ली माबोवर मनोरंजक साहित्य खुप कमी झालंय त्यामुळे कवी/लेखक म्हणुन तुझे नाव पाहताच जनता लगेच तिकडे धाव घेते.... प्रतिसाद वाचुनच कितीतरी मनोरंजन होते.
    साधना
    ----------------------------------------
    Within each of us lies the power of our consent
    to health and to sickness,
    to riches and to poverty,
    to freedon and to slavery.
    It is we, who control these and not another.

    लिंबूदादा, जाळलंत! धन्यवाद.
    ----------------------
    एवढंच ना!

    लिंबाजीराव...
    इतकं गंभीरपणे घ्यायचं कारण नाही. हे कवितेमधे असलं तरी काहीच्या काहीच आहे.. Happy
    आशु म्हणते तसं... जाळलंत...
    -नी
    http://saaneedhapa.googlepages.com/home

    बाकी चालु ठेवच... हल्ली माबोवर मनोरंजक साहित्य खुप कमी झालंय त्यामुळे कवी/लेखक म्हणुन तुझे नाव पाहताच जनता लगेच तिकडे धाव घेते.... प्रतिसाद वाचुनच कितीतरी मनोरंजन होते.

    >>>
    अच्छा म्हणजे हे प्रतिसाद मनोरंजनासाठी आहेत. कुणीही येऊन स्त्रीजातीची कशीही निंदानालस्ती करावी. आणी आम्ही त्यावर काही लिहिताच ते मनोरंजक व्हावे!!!

    बरं अशा कवितावर प्रतिसाद देऊ नये असे ठरवले की मग वाह, अप्रतिम, भरपूर छान असे प्रतिसाद वाचणे नशिबात येते.

    कित्येक चांगल्या कवीनी मायबोलीवर लिहिणे पूर्णपणे बंद केलय हे आमच्या कधी लक्षातच येत नाही.. कारण कविता विभागातला पाऊस कधी थांबतच नाही.

    --------------
    नंदिनी
    --------------

    असल्या कवितांना जर काही ठराविक लोक सपोर्ट करणार असतील तर आपण काहीच करु शकत नाही .

    बरं अशा कवितावर प्रतिसाद देऊ नये असे ठरवले की मग वाह, अप्रतिम, भरपूर छान असे प्रतिसाद वाचणे नशिबात येते. >>
    कित्येक चांगल्या कवीनी मायबोलीवर लिहिणे पूर्णपणे बंद केलय हे आमच्या कधी लक्षातच येत नाही..
    कारण कविता विभागातला पाऊस कधी थांबतच नाही. >>
    १००% अनुमोदन .

    -----------------------------------------
    सह्हीच !

    अच्छा म्हणजे हे प्रतिसाद मनोरंजनासाठी आहेत. कुणीही येऊन स्त्रीजातीची कशीही निंदानालस्ती करावी. आणी आम्ही त्यावर काही लिहिताच ते मनोरंजक व्हावे!!!
    >> नंदू, आणि याला मनोरंजक कोण म्हणतंय... तर एक स्त्रीच! व्वा!
    ----------------------
    एवढंच ना!

    मला कळत नाही. माझा प्रत्येक प्रयत्न तुम्ही सावधानशी का जोडता? ही एक कविता आहे त्यातले विचार सहज कोणालाही पडु शकतात असेच आहे. पण मग मी लिहुच नये अस ठरवल आहे का तुम्ही सर्वांनी. मी बाकिच्याही कविता रचल्या आहेत त्यांना चांगल म्हणायला कोणी आल नाही आणि एक मजेशीर घेण्यासारख्या कवितेला तुम्ही वेगळच वळण देताय.

    ................................................................................................................
    आठवणींच्या देशात मी मनाला कधी पाठवत नाही, जाताना ते खुष असत पण येताना त्याला येववत नाही

    देव तुमचं भलं करो आणि जमलं तर पोरींचं पण

    असो.
    ~~~~~~~~~

    Pages