मिनिमलिस्ट जीवनशैली
मिनिमलिस्ट जीवनशैली म्हणजे काय ? थबकायला होत ना शब्दाशी. मलाही असेच झाले . मिनिमलिस्ट म्हणजे काय असेल..जरा शोध घेतला..लोकमतला येणारे शर्मिला फडक्यांचे लेख वाचले जरा जरा उलगडत गेले.मिनीमलिस्ट म्हणजे कमीत कमी. कमीत कमी कशांत? तर सगळ्याच बाबतीत कमीत कमी. आपल्या गरजांच्या बाबतीत ही कमीत कमी. आता अन्न, वस्त्र , निवारा या आपल्या प्राथमिक गरजा आहे. हे तर आपण अगदी लहानपणा पासून शिकलो . कलायला लागले तसे अनुभवलेही. कमीत कमी वापरात गरजेपुरते जमवत जगणे म्हणजे मिनिमिलिस्ट . पण गंमत म्हणजे या गरजा आपण खुप वाढवलेल्या आहेत. त्यापाठी मानसिक स्वास्थ तर घालवलेच आहे आणि मानसिक स्वास्थ हा शारीरिक स्वास्थ्याचा पाया. हेच आपण विसरलो आहोत. जन्मभर धावत धावत आपल्याला अधिक काही मिळवायचा हव्यास असतो. आणि त्या हव्यासापायी आपण खरंच सुख आणि आनंद मिळवतो का. चार घटका थांबून यावर चिंतन केलं तर मला वाटत नव्व्दटक्के उत्तर नकारार्थी ये ईल. मला स्वतः: कितीसा आनंद मिळाला आणि किती त्रास झाला याचे उत्तर स्वतःला त्रास जास्ती झाला असेच ये ईल. इथे त्रास हा शब्द मी दोहो बाबत वापरते. प्रत्येक गोष्ट करताना फक्त एक प्रश्न मनाला विचारला “खरंच गरज आहे का? अगदी मनापासून दिलेले उत्तरे होकार्थी पेक्षा नकारार्थी जास्त येतील.
मिनिमिलझम ची व्याख्या ही काही एकमेव किंवा एकच असणार नाही फक्त मिनिमिझम चौकटीचे सूत्र मात्र एक असेल गरजेपुरते आणि कमीत कमीहेच सूत्र आपण आता आपल्या अन्न वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांवर लावून पाहू, अन्न हे किती साधेसे उदाहरण..अन्नासाठी दाही दिशा फिरवीशी जगदिशा म्हणतो आपण खरच. पण इतकी गरज आहे का दाही दिशा फिरायची. उत्तम अन्न ताजे सकस आणि आपल्या आरोग्यासाठी सभोतालासाठी कुठले अन्न हवे ? कुठले नको? त्याचे आरोग्यावर होणारे चांगले किंवा वाईट परिणाम याचा विचार आपण केलाय का ?
मिनेमिलिस्ट जीवनशैली- अन्न
आता मिनेमिलिस्ट जीवनशैलीमध्ये अन्न कमी खा , डाएट करा असा अर्थ होतच नाही.आपल्या शरीरारोग्याला आवश्यक अन्न कुठले . याचा विचार व्हायला हवा. जिभेचे चोचले म्हणून खाल्लेले अन्न वेगळे आणि जगण्यासाठी खाल्ल्लेले अन्न वेगळे . हा निश्चित फरक आहेच दोहोतही. आपली पारंपरिक जीवनशैली , अन्न विषयक अतिशय सुंदर आणि आरोग्यपुर्ण होती असेच म्हणावे लागेल.
आज एकविसाव्या शतकात आपण सगळेच खाद्य पदार्थ खातो इटालियन मेक्सिकन थाई ..खातो म्हणजे तो आपल्या प्रतिष्ठेचा भाग केलाय आपण. पण खरंच आपल्या हवामानाला , जीवनशैलीला ते पोषक आणि अवश्य आहे का याचा जरा थबकून विचार करायला हवा आपण राहतो महाराष्ट्रात. आपले हवामान कसे आहे. आपल्या इथे आपल्या हवामानाला योग्य अशीच पिके येतात. आणि तीच आपल्या आरोग्यासाठीही उपयुक्त असतात. हा साधा सरळ विचार जरी केला आणि अमलात आणला तर आरोग्याची चतु:सुत्री आपल्याला सापडेल
.काय पिकते आपल्या हवामानात तर तांदूळ, आंबेमोहर , इंद्रायणी, जिरे साळ काळभात वैगरे अनेक जाती महाराष्ट्रात आहेत.
ज्वारी, बाजरी, आणि अजून एक पीक आता काळाच्या पडद्याआड झाले मी वाचले होते त्या बद्दल मिलेट. ही धान्ये
पालेभाज्या आंबा, जांभूळ, बोरे, सीताफळ, चिक्कू, अंजीर, करवंदे, फणस इ नेक फळे जी आपल्या मातीत सहज येतात आपल्या हवामानात टिकतात.
या सगळ्या अन्नधान्याचा समावेश आपल्या आहारात केला तर ते उपयुक्तच ठरेल ना? बरेच रोग आपण आपल्या आहारा विहाराच्या चुकीच्या सवयीने मागे लागून घेतले आहेत. ते कमी होतील हे निश्चित .
शुद्ध गायीचे तूप, करडई, शेंगदाणा अशी तेल बियांपासुन मिळणारी तेले. जी आपल्या भूमीत पिकतात. त्याचा शोध घ्यायला हवा. तेल पण मशीन मध्ये न करता घाणीवर केले असेल तर उत्तमच.
धान्ये पण पॉलिश न करता, हातसडीची वापरायला हवीत.
डाळी, कडधान्ये जी महाराष्ट्रातून अता नामशेष होते चालली आहे, कडधान्याला बाजारपेठ नाही म्हणुन शेतकरीही कडधान्याचे उत्पादन घेत नाही.
असे रासायनिक प्रक्रिये विरहित. साधे आपल्या जवळपास पिकणारे अन्न्धान्य आपण खाल्ले तर कित्येक आरोग्याचा तक्रारी दूर होतील
हा भाग झाला अन्न्धान्ये निवडीबद्दल. दुसरा आपल्या मिलिमनिस्ट जीवनशैली बाबत करायचा झाला तर हे अन्न सेव किती करायचे तर आपल्या गरजेपुरते. अगदी मूठभर अन्नाची खरे तर आपल्याला गरज असते. आपण आवडीपोटी गरजेपेक्षा जास्त अन्न सेवन करतो हे निश्चित. ते ही केवळ आवड म्हणून फास्ट फूड, आणि हौस म्हणून रेडी टू इट अन्न पदार्थ. मोठेपणा मिरवायला म्हणुन परदेशी पदार्थ हे त्यात ओघाने आलेच. लोकसत्ता मध्ये आले होते तीन शुभ्र शत्रू मीठ, साखर आणि मैदा. ह्याचे अतिरिक्त सेवन हे आपल्या आरोग्यासाठी शत्रू सारखे ठरत असेल तर निश्चित आपण ते शक्य असेल तिथे टाळायला हवे. मीठ चवी साठी गरजेचे असतेच ते पण चवीपुरतेच असावे. मैदा तर पुर्णपणे वर्ज्य करू शकतोच आपण. साखरेला गूळ हा पर्याय होऊ शकतो. ह्या अगदी वर वर सहज दिसणाऱ्या गोष्टी. यातील जाणकार, तज्ज्ञ यात भर घालूच शकतील आणि त्यांचे ज्ञान आपल्याला निश्चितच फायदेशीर आणि मार्गदर्शक ठरेल.
ही झाली अन्न विषयक गरजेवर अगदी वरवर चर्चा. आपण अजून वस्त्र आणि निवार या बाबीबद्दल ही बघू.
मिनिमलिस्म ही बहुतेक जपानी
मिनिमलिस्म ही बहुतेक जपानी झेन बुद्धीस्ट तत्वज्ञानातून आलेली जीवनशैली आहे. "लेस इज मोअर" हे जाणवण्यसाठी आधी "मोअर" चा अनुभव घेणे जरुरी आहे, असं मला वाटतं. कदाचित त्यामुळेच ज्यांनी सतत "लेस" चा अनुभव घेतलाय, त्यांना हे थोतांड वाटु शकते. पण म्हणून त्या जीवनशैलीला पुर्णपणे निकालात काढणे बरोबर वाटत नाही. कारण एक वर्ग नक्कीच असा आहे, ज्यांना ही जीवनशैली खरंच फायदेशीर आहे.
मी स्वतः हे आत्ता, आयुष्याच्या ह्या स्टेजला करु शकत नाही. वर सिम्बा ह्यांनी म्हटल्याप्रमाणे काही कन्सट्रेंट आहेत. शिवाय अनेक गोष्टींचा हव्यासही आहे. पण वस्तु जितक्या कमी, तितकी डिस्ट्रॅक्शनस कमी हा स्वानुभव आहे. एखादे महत्वाचे काम, ज्याला भरपूर फोकस लागणार आहे, ते मी लहान-एन्क्लोज्ड-अजिबात वस्तु नसलेल्या जागेत जास्त चांगले करु शकते. पण... मी सतत अशा जागेत राहू शकत नाही. ह्यावर माझा मध्यममार्ग असा आहे की सतत "डिक्लटर" करणे आणि फार खरेदी न करणे. ह्याचा कमी पैसे खर्च करण्याशी फारसा संबंध नाही. एकच/कमी पण उत्तम वस्तु घेण्याच्या नादात भरपूर महाग वस्तु घेण्यात येतात. उपयोगी किंवा सुंदर अशा दोनच प्रकारच्या वस्तु मी ठेवते. उपयोगी नसलेल्या सुंदर वस्तु देखील अजिबात सोडवत नाहीत. पण तरी माझ्या इतर मित्र-मैत्रिणींपेक्षा माझं घर बर्यापैकी सुटसुटीत आहे.
मिनिमलिस्म किंवा कुठल्याही जीवनशैलीतल्या बदलासाठी पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणेजे "हे का करायचे", ते स्पष्ट असायला हवे. बरेचदा लोक "ऑटोपायलट" वर जगत असतात. त्यात सगळे करतात म्हणून, आपोआप होत गेले म्हणून, लोकांची अपेक्षा आहे म्हणून जे आपण आप्ल्याला जरुरी नसतानाही करतो, ते स्वतःला जाणवणं महत्वाचं आहे. तेवढे केले तर मग तुम्ही मिनिमलीस्ट आहात, का "मोअर इज बेटर" प्रकारे रहात आहात, त्याने काय फरक पडतो?
धन्यवाद सगळ्यांचे...:)
धन्यवाद सगळ्यांचे...:)
,
अतिशय चांगले विचार मंथन घडले ..काही प्रतिक्रिया खूप शिकवून गेल्या आणि मार्गदर्शकही आहेत कुणाचे मत परिवर्तन करण्यासाठी नाही काढलेला धागा तर समजून घेण्यासाठी काढला. प्रत्येक बाबीत काही फायदे तोटे असतात ते समजण्यासाठी... इथे आलेले काही प्रतिसाद खूप काही शिकवणारे आहेत मुख्यत: rar , विद्या भुतकर यांचे प्रतिसाद अगदी मार्गदर्शन करणारे आहेत. rar मी तुम्ही सुचवल्या प्रमाणे खरंच आता कप्पे करते..लिहून ठेवायला सुरुवात करते..खूप फायदेशीर ठरेल ते.
मी ही असेच खूप पसारा आणि अडगळ काढताना कशाला आपण हे जमवले असे विचार आले आणि तिच विचारांची सुरुवात असेल या मिनिमलिझम ची ..मग त्या विचारांचा पाठपुरावा केला..काही वाचन ही केले आणि मला त्यांतून हे गवसत गेले..
आज ह्या धाग्याच्या निमित्ताने बरेच मंथन घडून आले आणि वाट दाखवणारे मार्गदर्शनपर विचार ही मिळाले..:)
अमित आपले विचार ही पटले योग्य काय आणि अयोग्य काय या पडताळणीसाठी अतिशय उपयुक्त आहेत ..धन्यवाद
नताशा खूप सुंदर आटोपशीर विचार मांडले..धन्यवाद . सपना, प्रकाश आपले विचार ही मार्गदर्शक आहेत. धन्यवाद
माझ्या आधीच्या प्रतिसादाने
माझ्या आधीच्या प्रतिसादाने बरिच राळ उडालेली दिसली.. असो.
मिनीमलिस्ट जीवनशैलीचा मी सध्या चांगलाच अनुभव घेतोय... चार वर्षांआधीपर्यंत जबरदस्त खरेदी, चंगळवाद केल्यानंतर अचानक काही गोष्टींची आपल्याला खरंच गरज नसते ह्याची जाणीव झाली. पंचवीस-तीस हजार रुपयांचा हाय-एन्ड कॅमेरा घेऊन वर्षातून आठ दहा दिवस हौशी फोटोग्राफी करणे, पन्नास हजाराची इम्पोर्टेड सायकल घेऊन ती तशीच पडून राहणे.. नुसत्या वस्तू गोळा केल्या म्हणजे त्यापासून जो खरोखर मिळणारा आनंद, फायदा होईल असे नसते. पण ८०-९० च्या दशकात अभावग्रस्त मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये जगलेल्या वाढलेल्या माझ्यासारख्या लोकांना हातात प्रचंड पैसा (आईवडीलांच्या तुलनेत) आला की ते जुने अभावाचे दिवस, मन मारुन खरेदी टाळणे, वस्तू घेऊ न शकणे हे सर्व गाडून टाकायचे असते. मनात आलं, वाटलं की वस्तू हजर झाली पाहिजे, कारण वस्तूसंपन्न असणे हे समृद्धीचे, श्रीमंतीचे, उच्च-अभिरुचीचे, सन्मानाचे लक्षण आहे असे आमच्या पिढीच्या मनावर लहानपणी कोरले गेले होते. हे सर्व आपणही मिळवायचे ह्या इर्ष्येतून चंगळवाद सुरु झाला.... मॉल मध्ये गेले की एरवी पाच हजारात होणारी आवश्यक सामान खरेदी कधी १० हजार ओलांडून जायची... घरात मेयॉनिज, चीज, सॅन्डविच स्प्रेड, प्रिन्गल्स, ने फ्रीज भरलेला असायचा, रेडिमेड रेडिटुकूक पाकिटांनी किचन भरलेले असायचे.. कित्येकदा तर मॉलमध्ये फिरुन भूक लागली म्हणून समोर दिसेल ते पाकिट उचलले जायचे, पण बिल झाल्याशिवाय फोडून खाने शक्य नसायचे, नंतर घरी येइस्तोवर भूक मरुन जायची, किंवा बाहेर दुसरेच काहीतरी खाल्ले जायचे. टीवी घ्यायचा तो हाय-एन्ड चाळीस इंची सर्वोत्तम कंपनीचा.. शूजपासून कपड्यांपर्यंत सर्व ब्रॅण्डेड आणी खूप... वापर अतिशय कमी.. रनींग शूज नायकेचे दोन घेतले ,साडेतीन हजार मोजून घेतलेत, साडेतीन दिवस घातले नाहीत... अजून नवेकोरे तसेच आहेच.
असं आणि असं खूप सारं...
मग सगळं बदललं... अचानक...
आज पाच हजाराचा किराणा तीन हजारात उत्तम बसतो, त्यात उरलेल्या दोन हजारात उत्तम दर्जाचा काजू, बदाम्,सुकामेवा खाता येतो, वरचे इम्प्लसवीव शॉपिंग थांबल्याने पैसे वाचतात... कमी पण चांगल्या दर्जाचे चार कपडे उत्तम असतात, दिखावूगीरी, किंवा फॅड, किंवा मार्केटींगला बळी पडून घेतलेल्या सर्व वस्तू विकून टाकल्या, अगदी टीवी,सायकल, कॅमेरा... सबकुछ... ज्याची गरज नाही ते अजिबात आता घरात नाही. कम सामान सफर आसान, पन्नास साठ हजार खर्चाचे लाइफ तीस हजारात पूर्वीपेक्षा उत्तम आणि आनंदात जाते. घरच्या घरी सगळे पदार्थ बनवायचे, हॉटेलींग शून्य, होम-डिलीवरी शुन्य... फालतूचे सर्व खर्च बंद करुन, अडगळ भंगारात काढून कमीत कमी, फक्त गरजेच्या वस्तूंमध्ये संसार सुरु आहे. अगदी किचन मधल्या भांड्याकुंड्यांनाही राम राम ठोकला आहे... अजून बरेच बदल करत जाणार आहोत...
-------------------- आता ही सिच्युएशन मजेदार आहे. भोगून झाल्यावरच त्यात शाश्वत आनंद नाही असे कळते. ह्यामुळेच मिमी चा इटोबा, भोगाचा पोटोबा भरल्याशिवाय नाही याला माझे अनुमोदन आहे, कुणाला ते खिल्ली उडवल्याचे वाटले.. असो.
नानाकळा..फारच छान..:)
नानाकळा..फारच छान..:) >>>कम सामान सफर आसान, पन्नास साठ हजार खर्चाचे लाइफ तीस हजारात पूर्वीपेक्षा उत्तम आणि आनंदात जाते>>> हे वाचून फारच बरे वाटले
तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आणि अनुभवाचा भाग उचलुन मला आता मिनिमलिस्ट चा अजुन एक विचार भाग २ म्हणुन करावासा वाटतोय.
भाग २
मिनिमलिस्ट जीवनशैली : खरेदी , पसारा आणि वस्तू
मिनिमलिस्ट जीवनशैलीचे सूत्र काय तर कमीत कमी आणि गरजेपुरते. आता मला त्याला अजून एक शेपूट जोडावेसे वाटतेय म्हणजे अन्नपदार्था बाबतीत ..कमीत कमी. गरजेपुरते पण सकस ..कारण सकस आहार हा उत्तम जगण्याचा पाया. कमीत कमी वापरायचे म्हणजे अगदी कमी पोषक द्रव्य असलेले नाही असे माझे मत. कारण सकस आहार हा उत्तम आरोग्याचा पाया आणि आरोग्य उत्तम तर औषधीही कमीत कमी ना.
तर आता आपण पसारा, वस्तू जमविणे आणि खरेदी याबाबत जरा विचार करूयात. मी स्वानुभव सांगते की गरज नसतानाही मोह आणि अट्टहास यामुळे खूपच अनावश्यक गोष्टींची खरेदी केली जाते, कुठेतरी छानसे काही तरी दिसते खरे तर त्याची सध्या आवश्यकता नसते..आणि नंतरही कधी गरज पडत नाही. अशा अनेक वस्तू उगाच जमवून ठेवतो आपण. घर आवरायला गेले, पसारा काढायला गेले की मग स्वतः:चा स्वतः: चा राग येतो. का हे मी घेतले? जरा वेळ थांबून विचार केला तर जाणवते . अरे जरा विचार केला असता तर बरे झाले असते नाही.
आता तपशीला ने वस्तू बघितल्या, त्यांचा उपयोग किती होतो ते बघितले तर जवळपास निम्म्याहून अधिक वस्तू केवळ असाव्यात घरात म्हणून ठेवलेल्या ... एकदाही वापर केला नाही.
जी गत वस्तूची तीच कपड्यांची ही. तसं पाहिले तर पूर्वी पाच सहा ड्रेस असणे पुरेसे व्हायचे. आता महिनाभर ड्रेस रिपीट व्हायला नको..त्या पुढे अजून नवा प्रकार दिसला की घ्यायचा मोह झालाच. कपडे , चपला, पर्सेस इतर ऍक्सेसरीज ..आठवायला गेले की आठवतही नाही. आणि आवरायला गेले की काय हा पसारा..कशाला जमवले मी हे असे वाटणारे .
तेव्हा पसारा कमी करणे..आवश्यक आहे तेच ठेवणे..नवीन वस्तू घेताना याची खरंच का गरज आहे हा विचार आवर्जून करणे, असे मी ठरवले आहे. केवळ वस्तूंचा पसारा नाही तर अनेक विचारांचा पसाराही आपल्या डोक्यात झालेला असतो. हा पसारा झाडून आवरून कमी करायलाच हवा. विनाकारण अडथळे या पसार्याने निर्माण होतात. नुसती खरेदी नाही तर विमाकारण मोहात अडकून वस्तूची साठवण ही करायला नको. कशा कशाची साठवण केलेली असते आपण. आम्हा बायकांना तर लागेल कधीतरी म्हणून वस्तू जपुन ठेवायची खोड असते. आजोबा आजी वर चिडायचे काहीही जपून ठेवते. माझी मात्र आई नाही तर बाब असे काहीही जपून ठेवतात आणि पसारा वाढवत असतात. मी ही पूर्वी अशीच होते..आता मात्र कटाक्षाने त्या वस्तू आधी आणत नाही आणि मग जमवत नाही. कोणाला हव्या असतील तर देते. उपयोगात येतात ना. टाकून न देता ते इतरांना देते, अर्थात ते मी गरजुंना देते. बाकी कोणाला विचारले तरी राग येतो.
पुस्तकाबाबत मागे बोललेच आहे. कपडे पण ना अनेक संस्था आहेत त्यांना आपण जास्तीचे कपडे देऊ शकतो आणि नंतर अधिक खरेदी करायची नाही हा कटाक्ष पाळू शकतो . अगदी रिसायकल रियुज हे तत्त्व वापरून आपण कमीत कमी वस्तूचा वापर करून आपले जगणे सहज करू शकतो. ( पुन्हा कोणी तरी येईल हे नक्की काय रियुज आणि रिसायकल आले कुठून..सगळा गोंधळ..एक गोष्ट धड नाही) पण मला आता ते या मध्ये अॅड करावेसे वाटले. काय आहे मिनिमलिस्ट जीवनशैली मी लावलेला अर्थ गरजे इतकेच आणि कमीत कमी यामध्ये या भागाचा समावेश केला जर आपण कमीत कमी अपव्यय ही आपण करू शकू.
वस्तू कमीत कमी ठेवल्यातर आवरणे ही किती सुटसुटीत होईल बरं. पण एक आहे यात सगळ्यात मोठा आहे मनाचा निग्रह. मला पाहिले ही जी ईर्ष्या आणि हव्यास असतो न त्याने हे सगळे घडते. या ने मानसिक ओढाताण होईल थोडी पण नंतर लाभेल ती शांती हे नक्कीच. कारण परवडत नाही म्हणून वापरत नाही यासारखे कुत्सित शेरे ऐकले तरी स्थिर मनोवृत्तीने ते ऐकून , स्वतःला त्रास करून न घेणे याने मानसिक व्यायाम ही घडेल. मानसिक स्वास्थ ही शारीरिक स्वास्थ्याची गुरु किल्ली आहे.
आता शांतपणे विचार केला की जाणवते अतिरिक्त किंवा गरज नसताना केलेली खरेदी
वस्तूंचा संचय विनाकारण वाढवतो
पर्यायाने पसारा वाढतो.
म्हणजे एकुणातच एकात एक गुंतलेल्या या गोष्टी आहेत. एक एक गोष्ट जाणीवपूर्वक केली तर नक्कीच ही कमीत कमी व गरजेची जीवनशैली वापराने चांगले जगू शकू हे निश्चित
चिनूक्स
चिनूक्स
हो, माझी चूक झाली. रंगास्वामी महापौर नाही, मुख्यमंत्री होते ते. सायकलवरून कार्यालयात जायचे आणि एरव्ही बाईकवरून फिरतात.
http://www.rediff.com/news/2006/may/13look2.htm
त्यांना कारने फिरणे अवघड नाही. इथे चंगळवाद, बचत या गोष्टींचा संबंध नाही. त्यांना सायकल वापरणे शक्य आहे म्हणून सीएम असूनही ते वापरतात.
तिथल्या काही लोकांचा गट पुण्यात आलेला तेव्हां ही माहिती समजली.
खर्चिक असण्याचा संबंध कळाला नाही. इथे स्वस्त आणि महाग या बाबींचा उल्लेखच नाही झालेला.
ऑरोविल हा एक स्वतंत्र विषय
ऑरोविल हा एक स्वतंत्र विषय आहे.
मातृमंदीर (उर्जा)
https://lbb.in/bangalore/living-life-in-auroville/
ऑरोविल ला जाण्यापूर्वी
http://www.auroville.org/contents/1162
हे सर्व बाहेरून येणा-यांसाठी. पण स्थानिकांनी देखील ही जीवनशैली आत्मसात केली आहे. ऑरोविल येथे पवनचक्की बनवणारा कारखाना आहे. चाचण्या घेण्याची सोय इथे आहे. भारतातल्या अनेक संस्था चाचण्या घेण्यासाठी इथे येतात. त्याद्वारे रोजगार मिळतो.
षडरिपूंच्या अडगळीचे काय? मला
षडरिपूंच्या अडगळीचे काय? मला जर खरोखर कधी मिनीमालिस्ट जगावसं वाटलं तर आधी मला मुलाला न रागावणे, कोणी मला एक बोललं म्हणून उलटून दोन न बोलणे, कानांनी टोमणे मारले तर वाईट न वाटून घेणे, मनांत कोणाबद्दल अढी न ठेवणे अशी सुरुवात करावी लागेल. तेवढा मानसिक सारासार विचार बहुधा वानप्रस्थाश्रमात पोचेपर्यंत आला तर that would be something! ( तरीही मला thing पूर्णपणे नामशेष झालेली दिसत नाही
)
किमान / न्यूनतम जीवनशैली
किमान / न्यूनतम जीवनशैली extreme / radical वगैरे आहे असं कुणाला वाटत असेल आणि त्याला माझा एखादा प्रतिसाद कारणीभूत झाला असेल तर क्षमस्व. या विषयाशी इतर विषयाशी नकळत सांगड घातली गेली. जसे गांधीवादी जीवनसरणी काही प्रमाणात एक्स्ट्रीम आहे. बंग यांनी सुचवलेली शैली ही रोजच्या दिनचर्येसाठी सोपी नाही. पण हे सर्व सध्या प्रचलित असलेल्या मिनिमलिस्ट जीवनशैलीचा अविभाज्य भाग मुळीच नाही. माझे पहिल्या कि दुस-या प्रतिसादातले म्हणणे होते कि डॉ. अभय बंग यांनी जी आरोग्यपूर्ण जीवनशैली सुचवलेली आहे ती अंगिकारण्यासाठी किमान जीवनशैली हे पहिले पाऊल ठरू शकेल.
कुणाचे काही गैरसमज असतील तर खालील लिंक कदाचित उपयुक्त ठरू शकेल.
http://www.theminimalists.com/radical/
सपना छान आहे तो ब्लॉग , आणि
सपना छान आहे तो ब्लॉग , आणि तुम्ही छानच मांडले विचार , उलट अगदी सांगड घालून व्यवस्थितच, माझा विचार उलटपक्षी अजून स्पष्टपणे कळाला सगळ्याना

अ़जून एक भाग म्हणजे एक विचार आला मनात अडगळ, खरेदी, पसारा यावर तो भाग २ म्हणून यामध्येच अॅड केले आहे. त्यावर पण आपल्या विचारांचे स्वागतच आहे. !
ह्यामुळेच मिमी चा इटोबा,
ह्यामुळेच मिमी चा इटोबा, भोगाचा पोटोबा भरल्याशिवाय नाही याला माझे अनुमोदन आहे, कुणाला ते खिल्ली उडवल्याचे वाटले.. असो. >>> नानाकळा, मी ते "हॉ हॉ हॉ" बद्दल लिहीले आहे त्याबद्दल का? मला त्या पोटोबा कॉमेण्ट खिल्लीसारख्या वाटल्या - ज्यांनी लिहील्या आहेत त्या सर्वांच्याच. आता तुमची वरची पोस्ट वाचून तुमचा उद्देश तो नव्हता हे लक्षात आले. धन्यवाद.
ओके फा!
ओके फा!
दुसरा भाग स्वतंत्र पोस्ट करा.
दुसरा भाग स्वतंत्र पोस्ट करा. भाग १ आणि भाग २ यामधे वेगळेपण आहे का काही ?
पुढच्यए एखाद्या भागात या जीवनशैलीचा भारतीय अवतार विकसित करता येईल का याबद्दल बोलता येईल. आपल्याकडे मुळातच चंगळवाद मंजूर नव्हता. बचतीची अर्थव्यवस्था आणि गरजेपुरते राहणीमान हे अस्तित्त्वात होते. चंगळवाद वेगळा आणि किमान जीवनशैली वेगळी अशाही व्याख्या इथे करण्याचा प्रयत्न झाल्याने फक्त गोंधळ उडाला आहे. अशी व्याख्या करणा-यांनी किमान जीवनशैली म्हणजे वैराग्य या समजुतीतून प्रतिसाद दिलेले दिसतात.
पहिल्या भागात सध्या प्रचलित असलेली किमान जीवनशैली डिफाईन करायला हवी होती. ती न केल्याने धागा किंचित भरकटला आहे.
काहीतरी अचानक छांदिष्ट
काहीतरी अचानक छांदिष्ट कल्पनांची किव्वा विचारसरणीची लाट येते वाटत अशी अधून मधून जशी मध्यंतरी व्हेगन जीवन शैली किव्वा व्हेगन जीवन पद्धती संबंधी वाचल तसंच हे . प्रत्येकाची गरज हि व्यक्तीनुसार/ त्या व्यक्तीच्या सानिध्यातील इतर व्यक्तींनुसार / वयोमानानुसार ( काही एका वयानंतर गोष्टींचा हव्यास किव्वा सोस कमी होतो पण तरुणपणी तो असतोच असतो ) आर्थिक परिस्थितीनुसार / मानसिक क्षमतेनुसार ( अशी जीवनशैली स्वीकारण्याची तयारी पाहिजे त्या नुसार प्रयत्न केले गेले पाहिजेत ) बदलत असते . नाहीतर ठरवायचं आणि पहिल्या काही दिवसात किंवा महिन्यात थंडगार . नाही जमतंय असं लक्षात यायच. त्यातून तुम्हाला हि जीवन शैली अंगिकारायची आहे पण घरातल्या इतर सदस्यांचा सक्त विरोध मग काय करायचं ? हा डोक्याला वेगळाच ताप .
एकुणात काय सगळं व्यवस्थित चाललंय आणि मधेच घरच्यांसमोर काहीतरी घोषणा करून ( आता आपल्याला मिनिमलिस्ट जीवनशैली अंगिकारायची आहे बर का / किव्वा मी अंगीकारणार आहे असं सांगून) घरातल्या इतर सदस्यांची झोप कशाला उडवायची ?. किव्वा वाद कशाला घालत बसायचे किव्वा त्यांना समजून सांगण्याचा आटापिटा करायचा . एकुणात कठीण आहे
आपल्याकडे मुळातच चंगळवाद
आपल्याकडे मुळातच चंगळवाद मंजूर नव्हता. >> आपल्याकडे साधेपणाचे स्तोम बरेचसे "कोल्ह्याला द्राक्षे आंबट" स्वरूपाचे आहे. पोथ्यापुराणात आसक्ती सोडण्याची गोष्ट कानीकपाळी ओरडून सांगतलीय , पण ते ना पोथी सांगणारे मनावर घेतात, ना पोथी ऐकणारे.
सगळ्या सुखांचा उपभोग घेऊन मग एखादा मानसिक शांतीसाठी मिनिमलिस्ट बनत असेल, पण असा एखादाच. अनेकदा कुवत नाही, झेपत नाही म्हणून नाईलाजाने लोक आपल्या इच्छांना मुरड घालतात.
less is enough, because most of the times we can't get more than enough.
less is enough, because most
less is enough, because most of the times we can't get more than enough.>>> हा विचारही खूप चांगला नाही का?
कि सतत जे मिळत नाही म्हणून त्याच्या मागे धावायचे, स्वतःच्या नशिबाला दोष देत बसायचा. मिळेल ते जमवत बसायचे. हे चांगले का?
पोथ्यापुराणात आसक्ती सोडण्याची गोष्ट कानीकपाळी ओरडून सांगतलीय , पण ते ना पोथी सांगणारे मनावर घेतात, ना पोथी ऐकणारे.>> असे पोथ्यापुराणे वाचून सगळेच शहाणे झाले असते तर अजून काय हवे होते. पण तसे नाही ना होत. अनुभव घेणे, त्यातून शिकणे, मग मनातून सर्व सोडण्याची ईच्छा होणे किंवा न होणे हे नैसर्गिक आहे.
इथे अध्यात्माबद्दल (त्यात
इथे अध्यात्माबद्दल (त्यात कितीही चांगले असले तरी) लिहायची चोरी आणि तुम्ही पोथ्या पुराणे काढून फुलटॉस देताय. भोआकफ....
Pages