शब्द-शृंखला - २८ फेब्रुवारी

Submitted by संयोजक on 28 February, 2017 - 01:48

आपण मायबोलीवर आहोत कारण आपले मराठीवर प्रेम आहे, आपल्याला मराठी भाषा येते ह्याचा अभिमान आहे. मग चला तर त्या अभिमानाला आव्हान देऊया. आपले मराठीचे, मराठी व्याकरणाचे ज्ञान तपासून बघूया.

आम्ही एक शब्द देऊ.
पहिला खेळाडू त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू होणारा दुसरा शब्द देईल.
दुसरा खेळाडू दुसर्‍या शब्दाच्या (पहिल्या खेळाडूने दिलेल्या शब्दाच्या) शेवटच्या अक्षरावरून सुरू होणारा पुढील शब्द देईल.
या प्रकाराने एकापुढे एक शब्द देत देत एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहे.

१. वाक्य पूर्ण करायला कमीतकमी पाच शब्द हवेत.
२. वाक्याचा शेवट क्रियापदाने व्हायला हवा.
३. एक अक्षरी शब्द वापरता येणार नाहीत. (जसे व, तो, रे इत्यादी)
४. सगळे शब्द मराठीच हवेत.
५. प्रश्नार्थक वाक्य चालणार नाही.
६. प्रत्येक खेळाडू एका वेळी एकच शब्द देऊ शकतो.
७. शेवटचे अक्षर जोडाक्षर असेल तर त्यातले कुठलेही अक्षर वपरता येईल.
८. एका वेळेस दोन खेळाडूंनी शब्द दिल्यास पहिल्या खेळाडूचा शब्द ग्राह्य धरावा.

उदाहरणः

उदाहरण नको कारण नियम माहितीपूर्ण रचलेत. Happy

१. शब्द - "त्या दिवशी"
उभयान्वयी अव्यय - "किंवा"
पहिल्या वाक्यात "किंवा" वापरू शकता. "किंवा" एकदाचं वापरता येईल.

वाक्य - त्या दिवशी शांतारामाची चारचाकी कडेला लढण्यासाठी ठेवताच चांद्रयानामध्ये धुराचे चमत्कारीक काळेकाळे लोण नभामध्ये येऊन नाचण्यापूर्वी वार्ताहराने नागरिकांस संगणकाशी शौर्याने नीट टंकलेखनाबद्दल लक्षावधी धादांत तथ्यहीन नमुने निरीक्षण्यास सांगितले.

२. शब्द - "कोणे एके काळी"

वाक्य- कोणे एके काळी लंकेमध्ये धष्टपुष्ट टोळीतील लालबुंद दैदीप्यमान नरपुंगवाने नासधुस सुरू राखत तलवार रोखली.

३. शब्द - काळोख

वाक्य - काळोख खाणीमध्ये धावत तृणतंतूंनी नादमधुर राग गायला लागताच चातकाने नजर रोखली

४. शब्द - जमीन

वाक्य - जमीन नांगरली लठ्ठ ठोंब्याने नकळत तुरदाणे निष्काळजी जोषात तंबुआड डवरले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol हे वाक्य अशक्य झालंय. टोटल द्वयर्थी. नांगरणे, तुरदाणे, तंबुआड, ठोम्ब्या एक टोटल नवा आयाम मिळालाय. Biggrin

काहीही हा, किती निर्मळपणे आम्ही लिहिलंय ते. तंबू वगैरे लिहिल्यावर माझ्या डोळ्यासमोर ते polihouse करतात आणि त्यात रोपं लावून जोपासतात ते आलं.

Pages