ए ssss झब्बू! - मराठी सण

Submitted by संयोजक on 28 February, 2017 - 01:35

सण, उत्सव याचे माणसाला जात्याच खूप आकर्षण असते. मराठी माणूस सुद्धा त्याला अपवाद नाही. तर या खेळात तुम्ही तुमच्याकडची खास मराठी सणांची आणि उत्सवांची प्रकाशचित्रे सादर करायची आहेत. हा खेळ आहे स्पर्धा नाही. खेळ म्हटला की नियम हे आलेच.
१. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावं.
२. झब्बूचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबियांनी काढलेली) प्रकाशचित्रं सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रं झब्बूमध्ये देऊ नयेत.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावं व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावं. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातलं नसावं.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रं मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चं पालन करणारी असावी.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचं धोरण इथे पाहा - http://www.maayboli.com/node/47635

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

.

shardul_2.jpg

हे चालेल का? कारण हा सण वा उत्सव नाहीये Uhoh

माझा झब्बू Happy
पुण्यातला गणेशोत्सव : विसर्जन मिरवणूक

10411898_1465172527103988_7855992936945872365_n.jpg

भ्य्य्य्य्य्य्य्य्य्य्या!
पिकासा गेल्यापासून फोटो अपलोड करताच येत नाहीत. Sad
कसे अपलोड करायचे सांगा. मग करते.

Tulasi Vivah!@.jpg

तुळशी विवाह!!

Pages