"मराठी फ्रेजा" अर्थात इंग्रजी म्हणींचे मराठीत रूपांतर - २८ फेब्रुवारी

Submitted by संयोजक on 28 February, 2017 - 00:01

भाषा आणि त्या प्रदेशाची संस्कृती यांचे घट्ट नाते असते. ते नाते ठळकपणे दाखवतात त्या भाषेतल्या म्हणी आणि वाक्प्रचार. हे शब्दसमुह आपल्याला शहाणपणाच्या गोष्टी सांगतात आणि त्या सांगताना त्या प्रदेशातील अनेक संदर्भ त्यात येत असतात. तर आपल्याला खेळ खेळायचाय या म्हणींचा.

आम्ही तुम्हाला इंग्रजी म्हणी देऊ आणि तुम्ही त्याचे मराठी रुपांतर करायचे आहे. लक्षात ठेवा रुपांतर ! भाषांतर नव्हे ! सगळे शब्द आणि संदर्भ अस्सल मराठमोळे असायला हवेत.

एका वेळी एका संचात ५ म्हणी दिल्या जातील. तुम्हाला तुमच्या प्रतिसादात त्या म्हणींचे रूपांतर लिहायचे आहे. जमल्यास सर्व पाचही म्हणींचे रुपांतर एका प्रतिसादात सुद्धा तुम्ही लिहू शकता.

तुमचे रुपांतर चटपटीत शब्दांत असायला हवे - अगदी म्हणींसारखे.
उदा. A penny saved is a penny earned
दमडी वाचली कमाई झाली.

२८ फेब्रुवारी संच १ -

१. Absolute power corrupts absolutely.
२. A house is not a home.
३. A person is known by the company he keeps.
४. A leopard cannot change its spots.
५. A little of what you fancy does you good.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या तरी ऐवढेच Happy
A house is not a home.
>> घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती

A journey of a thousand miles begins with a single step.
>> हजारो मैलाच्या प्रवासाची सुरुवात एका पावलाने होते.

१. Absolute power corrupts absolutely. निर्विवाद सत्ता, निर्विवाद भत्ता
२. A house is not a home. चार भिंतींचं गचपण, कसं यावं घरपण
३. A person is known by the company he keeps. ज्याचा जसा गोतावळा, त्याला तसा टिळा
४. A leopard cannot change its spots. जो गुण बाळा, तो का टाळा?
५. A little of what you fancy does you good. ईप्सिताचा तुकडा, काम करी फाकडा

A house is not a home : नको नुसतं चार भिंतीत वावरणं, तर असावं घरपण.

A leopard cannot change its spots स्वभावाला ओषध नसते हेच खरं..

. A leopard cannot change its spots>>> नळीत घाला नाहीतर खळीत घाला, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच Wink

A little of what you fancy does you good. >> लहान मुले देवाघर्ची फुले

२८ फेब्रुवारी संच १ -
१. Absolute power corrupts absolutely.
निरंकुश सत्ता, अनर्थाचा मक्ता
दावं नाही वासराला, निस्तरण्यात दिवस गेला
म्यानात तलवार, मनात संस्कार, तोच राजा प्रजेचा आधार

२. A house is not a home.
वाट पाहतं दार, करी आसर्‍याचे घर
गवत, विटा, संगमरवर; असायलाच हवी ती....मायेची पाखर
हसरी नजर, मायेची ऊब, धीराचा हात, ओढ लावते घराची वाट
जगाने सोडला, दैवाने मारला, कवेत घेतो घराचा शिंपला

३. A person is known by the company he keeps.
भलत्याची संगत, नसती बिलामत
नित्याचा गोतावळा, शीलाचा धांडोळा
केशरावरून कोजागिरी, कोंबडीवरून गटारी
गुत्त्याबाहेर दिसला न गोत्यात आला

४. A leopard cannot change its spots.
हिंगाच्या डबीला हिन्याचा सुवास येत नाही
पोळलं, वितळवलं, वाकवलं तरी सोनं चमकणारच
पाण्याला ओढ उताराची

५. A little of what you fancy does you good.
अंगणभर सडा, ओंजळभर फुलं, सुवास तोच
मणभराच्या आशेला, कणभराने समाधान
रात्रभराचं जागरण, ध्यास फक्त मुखदर्शन
पायीपायी चालले, वारीमध्ये दंगले; कळसाला पाहून श्रम सारे भागले

Absolute power corrupts absolutely -
अबकी बार ... भ्रष्टाचार

A house is not a home.
परत्येक दार हे दरवाजा नसते.

A person is known by the company he keeps.
कुत्र्याची ओळख मालकावरून

A leopard cannot change its spots.
नकली मिशी लावून बाईचा बाप्या होत नसतो.

१. संपूर्ण अधिकार, मनमानी कारभार
२. दगड वीटांच्या भिंतींना, प्रेमाची लिंपण
विश्वास आणि जिव्हाळा देतो घरपण

पैसा म्हणजे सुख नव्हे
निवारा म्हणजे घरकुल नव्हे
३. साधूंच्या गर्दीतला चोर
त्याचे पाय धरतात लहान थोर
४. तुपात तळल, साखरेत घोळवलं
पण कारलं कडू ते कडूच
५. भुकेला अन्न, तहानेला पाणी
पाहिजे ते मिळता, सुचतात गाणी