लहान मुलींचे कपडे कुठे शिवून मिळतील?

Submitted by कबूतर on 27 February, 2017 - 04:20

पुण्यात लहान मुलींचे कपडे कुठे शिवून मिळतील?
वस्ते (जंगली महाराज रोड वर) कडे एक frock शिवून बघितला पण त्याचं fitting आवडलं नाही.
कोणाला माहिती असल्यास प्लीज सांगा

Group content visibility: 
Use group defaults

नारायण पेठेत नील़कंठ ज्वेलर्स च्या समोर निकिता टेलर्स आहे. फार फॅशनेबल असं नाहीये...पण पारंपारिक फ्रॉक चांगले शिवतो(फुग्याच्या बाह्या, फ्रील वगैरे)...फिटिंग चांगलं आहे.

घरगुती शिवण शिवून देणारी एक नातेवाईक आहे. कोथरुडात रहाते. लहान मुलींचे फ्रॉक्स मस्त शिवते. जुन्या शालूंचे, साड्यांचे पण परकर पोलके, शरारा वगैरे मस्त शिवते. नंबर विपुतून कळवते.