कुणास ठावूक कशी पण जेलात गेली शशी

Posted
4 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
4 वर्ष ago

(टीपः हे गाणे आणि हाच विषय घेउन एक विड्म्बन मला व्हॉट्स अप वर आले होते (कवी अज्ञात) . त्याचे मी माझ्या पद्धतीने सोपस्कार करून गाणे आणिक विषय तोच ठेवून, मूळ विडम्बन काराच्या प्रतिभेला अभिवादन करून हे विडम्बन लिहीत आहे )

कोणास ठाऊक कशी पण जेलात गेली शशी
शशीने हलविली मान, घेतले सुंदर ध्यान
अदालत म्हणाली, व्वा व्वा !
शशी म्हणाली, सोडा मला

कोणास ठाऊक कशी, पण जेलात गेली शशी
पनीरने मारली उडी, भरभर चढला शिडी
शशी म्हणाली, थान्ब थान्ब !
पनीर म्हणाला, नानाची टान्ग

कोणास ठाऊक कशी, पण जेलात गेली शशी
शशीने म्हटले पाढे आणि पलानी स्वामी आले पुढे
न्यायाधीश म्हणाले, शाबास !
शशी म्हणाली, करा बास

(कोणास ठाऊक कशी, पण जेलात गेली शशी
शशीने वेचले खडे, बान्धले उदबत्तीचे पुडे
जेलर म्हणाले, छान छान !
शशी म्हणाली, कस्ला त्रास )

मूळ गाणे:

कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला ससा
सशाने हलविले कान, घेतली सुंदर तान
दिग्दशर्क म्हणाला, व्वा व्वा !
ससा म्हणाला, चहा हवा

कोणास ठाऊक कसा, पण सर्कशीत गेला ससा
सशाने मारली उडी, भरभर चढला शिडी
विदुषक म्हणाला, छान छान !
ससा म्हणाला, काढ पान

कोणास ठाऊक कसा, पण शाळेत गेला ससा
सशाने म्हटले पाढे आणि घडघड वाचले धडे
गुरुजी म्हणाले, शाबास !
ससा म्हणाला, करा पास

विषय: 
प्रकार: 

मस्त्च...
नाव काय भन्नाट आहे...

छान.

_/\_