स्वस्तात पँरिसवारी?

Submitted by यक्ष on 16 February, 2017 - 06:56

मला माझ्या कार्यक्षेत्रातील एका इव्हेंट्च्या संदर्भात माझ्या बजेटमधे शक्य असल्यास (पूर्ण खर्च माझा - फक्त मीच) पँरिस दौरा करायचा विचार आहे.
पॅरिसमधील कार्यक्रम २९ व ३० मार्च ला PARIS LA DÉFENSE येथे आहे.
मी साधारण अंदाज काढला (५ दिवस) असता ३५ ते ५५ ह. विमान प्रवास ( मुंबै-पार्री-मुंबै) , ४ ते ५ ह. रोज प्रमाणे राहणे - खाणे (AVML) खर्च (हॉस्टेल चालेल). ५ह. चे आसपास व्हिसा असे दिसते. पण हे गुगलून काढले अस्ल्याने जाणकार व अनुभवींचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तद्वत विनंती!
मला फक्त इव्हेंट् ला उपस्थित रहायचे आहे इतर काहीही नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेट वर आजुन कोणी पार्ट्नर मिळेल का ते बघा . दोघ-तिघ जण मिळुन राहिल्यास खर्च कमी येतो.

www.theparisapartment.com किंवा अश्याच प्रकारच्या साईट वर घर भाड्याने मिळेल. ह्या साईट वरुन माझा अनुभव चांगला आहे. मात्र बुक करायचा आधी फाईन प्रिंट वाचुन काढा. उदा जर फ्लाईट च्या वेळीमुळे जर चावी रात्री घेणार असेल तर जास्त पैसे द्यावे लागतात. कधी कधी घर साफ करायचे पैसे द्यावे लागतात. काही वेळा सिक्युरिटी डिपॉसिट द्यावे लागते.
ह्या घरात पुर्ण किचन असते आणि घरी जेवण बनवता येते. बाहेर जेवायचा खर्च भरपुर आहे. सर्वाना भवन मध्ये थाळी १४ युरोला आहे. सुपर मार्केट मध्ये फ्रोझन पिझ्झा , पास्ता सारखे पदार्थ खुप स्वस्त असतात.
लोकल बस्/ट्रेन साठी १० तिकिटाचे बुकलेट मिळते (२०११ साली १२ युरो होते). ते घेतल्यास फिरण्याचा खर्च कमी येईल. शहरात भरपुर पाकिटमार आहेत तर बस /ट्रेन मध्ये जाताना पाकिट सांभाळणे.

all the best!

Try to by food from local supermarket it really helps and use buses. Public transport. I was staying in simple hotel behind eiffel tower. No ac free breakfast. Try salads bread and French butter. Good Indian meal for two cost me 45 euro. But worth it. Have a great stay. Stay away from vendors near tower and girl groups of refugees who will ask you if you know English. Absolutely do not engage. Especially near gardens.

https://www.airbnb.com/ वर पण बघा काही मिळते का ते. ३०/४० डॉलरच्या आत एक बेड मिळू शकेल. रिव्यु, रेटिंग पाहूनच मग बूक करा. फाइन प्रिंट वाचा. माझा airbnb अनुभव अतिशय उत्तम आहे (पॅरिसमध्ये नाही, अमेरिकेत)

दहा वर्षांपुर्वी आम्ही बसने तीन चार दिवस फिरलो होतो. पॅरिस, अ‍ॅमस्टर्डॅम, ब्रसेल्स, अजुन एक दोन शहरे होती. ३/४ दिवसांची टुर असते. ती स्वस्तात होईल.

प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
अभ्यास करतो. 'सर्वणा भवन' शोधून काढायला आवडेल!
' girl groups of refugees...' सुचनेबद्दल धन्यवाद! असा अनुभव मला टर्की मध्ये आला होता. ती ललना युक्रेनची आहे असे सांगून अधिक्रमण करण्याच्या प्रयत्नात होती. मी इंग्रजी कळत नाही असे भासवले व चक्क मराटीत बोलुन कटवले.

सर्वणा भवन गार दु नॉर्द स्टेशना तून बाहेर पडल्यावर जी खूप सारी खाउच रेस्टॉरेंट आहेत तिथेच गर्दीत आहे.

मला परदेश प्रवासाचा फार अनुभव नाही.
तुम्ही हे पाहिलेय का?
http://www.hostelbookers.com/hostels/
वाजवी दरातील रहाण्याच्या जागांविषयी माहिती आहे. (hostels / hotels)
बघा काही उपयोग होइल का.