होतकरू नगर सेवकान्ची भरली होती सभा

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

होतकरू नगरसेवकानची भरली होती सभा,
व्होटर होता सभापती मधोमध उभा.
व्होटर म्हणाला, व्होटर म्हणाला, "मित्रांनो,
देवाघरची लूट.. देवाघरची लूट !
तुम्हां अम्हां सर्वांना एक एक व्होट
या व्होटाचे कराल काय ?"

वाघ म्हणाला, "अश्शा अश्शा, व्होटाने मी काढीन नीवीदा."

ईन्जीन म्हणाले, "ध्यानात धरीन, ध्यानात धरीन
मीही माझ्या व्होटाने, असेच करीन, असेच करीन,"

चक्र म्हणाले, "सत्तेत येण्यासाठी, शेपूट हलवीत राहीन."

कमळ म्हणाले, "नाही ग बाई, वाघासारखे माझे मुळीच नाही,
खूप खूप व्होट मिळतील तेन्व्हा परीवर्तन करेन परीवर्तन करेन."

झाडू म्हणाली, "पडेल थंडी तेव्हा माझ्या मफलराची मलाच बंडी."

अपक्ष म्हणाले, "कधी इथे, कधी तीथे, कुन्पणावरून मी मारीन उड्या."

पन्जा म्हणाला, "व्होटर म्हणजे दोन हात, दोन हात.
बुडत राहीन प्रवाहात, बुडत राहीन प्रवाहात."

एम आय एम म्हणाले, "माझे काय ?"
"तुझे काय ? हा हा हा !
तू येथून घे काढता पाय."

घड्याळ म्हणाले, "टीक टीक करून वेळ मी धरीन, वेळ मी धरीन
पावसाळ्यात धरण मी भरीन."

व्होटर म्हणाला, "छान छान !
मतदाराच्या देणगीचा ठेवा मान.
आपुल्या व्होटाचा उपयोग करा."

"नाही तर काय होईल ?"

"बिन कण्याच्या "शेजार्‍यागत", आपुली लोकशाही खुडून जाईल."

मूळ गाणे
शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा,
पोपट होता सभापती मधोमध उभा.
पोपट म्हणाला, पोपट म्हणाला, "मित्रांनो,
देवाघरची लूट.. देवाघरची लूट !
तुम्हां अम्हां सर्वांना एक एक शेपूट
या शेपटाचे कराल काय ?"

गाय म्हणाली, "अश्शा अश्शा, शेपटीने मी वारीन माशा."

घोडा म्हणाला, "ध्यानात धरीन, ध्यानात धरीन
मीही माझ्या शेपटीने, असेच करीन, असेच करीन,"

कुत्रा म्हणाला, "खुशीत येईन तेव्हा, शेपूट हलवीत राहीन."

मांजरी म्हणाली, "नाही ग बाई, कुत्र्यासारखे माझे मुळीच नाही,
खूप खूप रागवीन तेव्हा शेपूट फुगवीन.. शेपूट फुगवीन."

खार म्हणाली, "पडेल थंडी तेव्हा माझ्या शेपटीची मलाच बंडी."

माकड म्हणाले, "कधी वर, कधी बुडी, शेपटीवर मी मारीन उडी."

मासा म्हणाला, "शेपूट म्हणजे दोन हात, दोन हात.
पोहत राहीन प्रवाहात, पोहत राहीन प्रवाहात."

कांगारू म्हणाले, "माझे काय ?"
"तुझे काय ? हा हा हा !
शेपूट म्हणजे पाचवा पाय."

मोर म्हणाला, "पीस पीस फुलवुन धरीन, मी धरीन
पावसाळ्यात नाच मी करीन."

पोपट म्हणाला, "छान छान !
देवाच्या देणगीचा ठेवा मान.
आपुल्या शेपटाचा उपयोग करा."

"नाही तर काय होईल ?"

"दोन पायाच्या माणसागत, आपुले शेपूट झडून जाईल."

विषय: 
प्रकार: 

चांगलंय Happy नगरसेवकांच्या ऐवजी 'राजकारण्यांची' असं पण चालेल (थोडी जीभ अडखळेल एवढंच) Proud

भारी जमलंय .. मूळ गाणेही ऐकायला बोलायला फार आवडते, शीर्षकही त्याच चालीत वाचून मी आत शिरलो Happy

Dhanyawad

केदार, हे व्हॉट्सॅपवर फॉर्वर्ड केल्यास चालेल का, तुमच्या नावासकट अन इथल्या लिंक सकट?

धन्स!

Pages