मनोरा

Submitted by गवंडी ललिता on 14 February, 2017 - 02:11

मनोरा

जीवनाचा मनोरा कधी कुणी पाहिला?
बालपणात सुखाचा पाया त्याने घातला

हेव्या दाव्याचा गंधही नसे किशोर मनाला
सुख-दु;खावाचूनही तो पूर्ण आता झाला

संपताच किशोरावस्था तारुण्य बहरले
जीवन मनो-याचे लावण्य पहा कसे खुलले

स्वप्नातले फुलपाखरू तर जगन्मान्य झाले
भासा- अभासातच सारे तारुण्यही संपले

फुलला मनोरा आता प्रोढत्वाच्या दारी
जबाबदा-या साऱ्या आता फिरल्या माघारी

आई- वडील, भाऊ-बहिण, नात्यांची माया
जीवन मनो-याचा का हाच भक्कम पाया?

उंच शिखर मनो-याचे वार्धक्याने गाठले
आत बाहेर आठवणींचे क्षण सारे गोठले

बघताच सभोवती तन मनही शहारले
जीवन मनोरे माझे अर्ध्यावरच राहिले

ललिता गवंडी

Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद.........
हॅपी वॅलेन्टाइन्स डे कावेरी

कवितेचा भाव छान
जीवन मनोरे माझे अर्ध्यावर राहिले -----असे का वाटते सांगाल?
जीवन मनोऱ्याचे शिखर गाठले आहे .मग मनोरथ अर्धे राहिले असे म्हणायचे आहे का ?
प्रश्न उगीच वाटल्यास सोडून द्यावे

धन्यवाद.........
प्रश्न उगीच नाही....
जीवन मनोऱ्याचे शिखर सर्वांचा गाठता येत नाही...... असा त्यामागील भाव आहे...
विजयाजी तुमचा प्रश्न योग्यच आहे....