कोण जाणे कुणी आखली ही सहल ( तरही )

Submitted by सुप्रिया जाधव. on 10 February, 2017 - 10:11

ओळीबद्दल बेफिजींचे आभार ....

तेच आयुष्य नाही जराही बदल
कोण जाणे कुणी आखली ही सहल

वाचताना तुला होत जाते तुझी
मांडताना तुला होत जाते गझल

भेटतो वायफळ बोलतो वायफळ
मूळ विषयास देतो खुबीने बगल !

भेटल्यावर तुला शांत होते पुन्हा
गाठल्यावर स्वतःला सुरू चलबिचल !

मी तुझी कोण तू कोण माझा असा ?
जीवनासोबती रोजचा हाच खल

शाप आहे म्हणू की म्हणू एक वर
यार प्रेमा तुझी होत नाही उकल

सुप्रिया

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

खूप छान
भेटल्यावर तुला शांत होते पुन्हा
गाठल्यावर स्वतःला सुरू चलबिचल !
ह्या ओळी तर खूपच सुंदर