दिल दोस्ती दोबारा -शीर्षक योग्य की अयोग्य?

Submitted by चैतन्य दीक्षित on 8 February, 2017 - 07:36

झी मराठीवरील नवीन येऊ घातलेली मालिका 'दिल दोस्ती दोबारा' या मालिकेच्या शीर्षकाबद्दल हा प्रश्न.
"मराठी वाहिनीवर असलेल्या मालिकेचे शीर्षक संपूर्णपणे अमराठी असणे तुम्हाला खटकते का? "

Group content visibility: 
Use group defaults

हृदयात वाजे समथिंग गाणे मस्त आहे, मला आवडते...
त्यातली "असतो सदा ऽऽ मी आता ऽऽ ड्रीमींग" ही ओळ येता जाता उगाचच बोलायला मला खूप आवडते.
जोपर्यंत कानाला खटकत नाही तोपर्यंत परकीय भाषेतील शब्दांना मराठीत वापरायला हरकत नाही.
आपण कित्येक ईंग्रजी शब्द याच कारणाने सर्रास वापरतो, कारण त्या शब्दांची आपल्याला सवय झाली असते.
कोणाला कोणते शब्द खटकतात हे व्यक्तीसापेक्ष आहे, त्यामुळे अमुक तमुक शब्दच नकोत असे नियम बनवू शकत नाही.

मस्तं रे ऋन्मेष,
तू राईट केलेलं मी नेहमीच लाईक करत आलेय.
वरचा प्रतिसाद पण सुप्पर लाईक!
कानाला खटकत नाही हॅबिट झाली की.
क्वेश्चन फक्त कुणाला कसली हॅबिट आहे हाच उरतो.
यू क्नो, यू हॅव नेल्ड इट!

काही मुद्दे... भाषा आणि प्रमाणिकरण....
कोणत्याही भाषे मध्ये व्यकरण, लिपी व शब्दसंग्रह हे मुख्य घटक असतात..
१. व्यकरण : मराठी भाषे मध्ये व्यकरण याचे प्रमाणिकरण अगोदरच झालेले आहे..
२. लिपी : "बाळबोध देवनागरी" हि प्रमाणित आहे की नाही हा मुद्द गौण...मराठी भाषेची मुळ लिपी "मोडी" जी ७०० वर्ष जुनी होती, इंग्रजानी मुंबई प्रांताचा व्यवहार सोईचा व्हावा व छापाई सुलभते साठी ती बदलली..आणि आपण स्वीकारली..
(गुजरात वेगळा झाल्यावर त्यानी त्यांची मुळ लिपी परत व्यवहारात आणली, आपण मात्र विसरलो.. असो...)
३. शब्दसंग्रह : हा मुख्य मुद्दा आहे जो इथे चर्चीला जात आहे.. शब्दसंग्रह याचे प्रमाणिकरण हे मुर्खपणाच आहे ..
अ) जगातील कोणत्याही भाषेत शब्दसंग्रह हा केव्हाच बंदिस्त वा संकुचीत नसतो..
ब) नवीन शब्द भाषेमध्ये येत असतात..व जुने शब्द लोप पावतात..
क) नवीन येणारे शब्द हे मुख्यत्वे दुसर्‍या भाषेतील असतात ..
ड) स्वभाषेतील जोड शब्द तयार करुन ही नवीन शब्द बनतात ..पण प्रमाण खुप कमी असत..
इ) शब्दसंग्रह हा प्रवाही असतो.. तो केव्हाच स्थीर नसतो..
ई) मराठी मध्ये ...काळानुरुप.. द्रवीड, प्रशीयन व योरोपीयन भाषेतील शब्द येत गेलेले आहेत व आपण ते स्वीकारले आहेत.. काही शब्द उदा:
पोर्तुगीज - ते - मराठी
ईस्त्री ( कपड्यान करतो ती)
अननस
चावी (मुळ मराठी शब्द कळ)
जुगार
पगार
पाव ( वडापाव चा पाव )
नाव ( पाण्यतील नाव)
कन्नड -
मका,
वेलची
प्रशियन -
बाजार,
दरवाजा
ताजा, (ताजी भाजी )
रो़ज ( प्रत्येक दिवस)
शहर
पसंत
चकमक
खरेदी
बाजी ( जाणकारानी या शब्दावर नीट प्रकाश पाडावा माझी माहिती कदाचीत चुकीची असु शकते)
गरीब
हिशोब
खुर्ची
शरबत ( लिंबु शरबत)
खरा मुद्दा हा आहे..
- शब्दसंग्रहचे प्रमाणिकरण करतबसण्या ऐवजी अशी प्रक्रीया निवडावी ज्याणे नवीन शब्द स्वीकारणे सोपे जावे...

>>येता जाता उगाचच बोलायला मला खूप आवडते.

"बोलायला" नाही रे मित्रा, "म्हणायला"!
आता तू असे म्हणशील की आमच्या मुंबईत बोलायलाच बोलतात Wink

भारतातून गेल्यावर मराठीचा यूझ फारसा करता येणार नाही ही खंत आहे. भाषाशुद्धीचा आग्रह (?) कुणीतरी धरतेय हे समाधान आहे. माझे मराठी त्यामानाने खूपच वीक वाटते कधी कधी. जोपर्यंत महाराष्ट्रात शेवटचा मराठी माणूस उरणार आहे तोपर्यंत शुद्ध भाषा बोलली जाईल असं कल्चर वेगाने जोम धरतेय, त्याचबरोबर बिमारू राज्यातले लोंढे व त्यामुळे हिंदीचे आक्रमण, विलायती भाषांकडे वाढणारा ओढा याचं प्रेशर आहेच..
त्यामुळे मराठी सिरीयल्सची नावे तरी एकाच कुठल्यातरी लॅण्ग्वेज मधे मस्ट आहेत.

ऋन्मेष, मी स्पष्टच लिहिले की, ते हिंदी / इंग्रजी म्हणुन नव्हे तर त्या ठिकाणी मला ओढून ताणुन आणल्या सारखे वाटतात म्हणुन खटकतात.
लेखकानं मत विचारलं कारणांसह, मी सांगितलं.
मला काहे दिया परदेस नाही खटकत. एक दुजे के लियेतील हिंदी गाण्यातल इंग्रजी नाही खटकत आणि तसं कुठल्या मराठी गाण्यातही होऊ शकतं.
मालिका / चित्रपटांमध्ये रुळलेले, तसेच प्रसंगानुरुप आलेले इतर भाषीय शब्द वाक्ये असण्यास हरकत नाही असे माझे मत.

पण सरसकट, "कानाला खटकत नाही तोपर्यंत परकीय भाषेतील शब्दांना मराठीत वापरायला हरकत नाही" याबद्दल मी सहमत नाही. कारण तेच, कोणाला काय खटकते ते व्यक्ती सापेक्ष आहे.

भाषाशुद्धीचा आग्रह (?) कुणीतरी धरतेय हे समाधान आहे. माझे मराठी त्यामानाने खूपच वीक वाटते कधी कधी.
>>>>

अगदी चुक हे समीकरण, पटल नाही सपना ....
भाषाशुद्धी अस प्रकार नसतो हो.... तुम्हाला प्रमाण शब्द अस म्हनायच आहे का?

भाषेमध्ये व्याकरण व लिपी हि कोणी बदलत नाही..ति आहे तशीच आहे...
शब्दच्या प्रमाणिकरणला तुम्ही भाषाशुद्धी च लेबल का लावताय ? आणि शब्दचे अती प्रमाणिकरण हे योग्य नाही. !!!

लक्षात असु द्या ... भाषेचा शब्दभांडार हा प्रवाही असतो.. उगाच कोणाचे शब्द प्रमाणित नाहीत म्हणुन त्याला अशुद्ध म्हणने मुर्खपणाचे ठरेल. असे बोलुन आपण त्याच्या मनामधे न्युणगंड निर्माण करतो हे लक्षात असु द्या... तसे करणे हे मला तरी चुकीचे वाटते...

मोरपंखीस तुमचा मुद्दा: शब्दसंग्रह प्रवाही असतो आणि इतर भाषेतील शब्द पूर्वी पासून आले आहेत, पुढे पण येतील मान्य आहे. प्रत्येक नविन शब्दाला मराठी प्रतिशब्द तयार करणे योग्य होणार नाही, लिफ्टला उद्वाहनच म्हणा वगैरे आग्रह योग्य होणार नाही. ते अतीप्रमाणीकरण होईल.

पण इथे एका विशिष्ट मालिकेचे पूर्ण नाव हिंदी आहे ते खटकते की नाही हा मुद्धा आहे.

>>बोलायला मराठी शब्द नाही का?

आहे रे!..... पण बोलणे आणि म्हणणे हे दोन वेगवेगळे शब्द आहेत आणि त्यांच्या आपापल्या जागा आहेत

गाणे किंवा गाण्याची ओळ वगैरे आपण "म्हणतो".... चित्रपटाचे किंवा नाटकाचे संवाद वगैरे "म्हणतो"
मनातले "बोलतो" किंवा फोनवर "बोलतो"

असो!.... मुद्दा तुझ्या लक्षात आला असेल!

इथे निदान माझातरी बाहेरच्या शब्दांना विरोध नाही आहे.... असेच अनेक भाषातुन अनेक शब्द येउन आपली भाषा समृद्ध झाली आहे आणि होत राहील
आग्रह हा आहे की जे काही मराठी शब्द आहेत त्याचा सुयोग्य वापर करा..... उगाच "सैराट" फेमस झाला म्हणून ज्याला त्याला "सैराट" हे विशेषण लावायची टूम निघाली होती मध्ये.... विराटच्या संघाचा सैराट विजय किंवा पेट्रोलची सैराट भाववाढ वगैरे.... अरे काय हे!

अर्थ समजून घ्या, जातकुळी समजून घ्या, संदर्भ लक्षात घ्या आणि मग वापरा!
उगाच उचलला शब्द आणि चिकटवला वाक्याला असे करु नका!

मानव .... पण इथे एका विशिष्ट मालिकेचे पूर्ण नाव हिंदी आहे ते खटकते की नाही हा मुद्धा आहे.
>>>>

हा मुद्दा मान्य आहे..

होय- मराठी मालिका असेल तर असे शीर्षक मला खटकते
कुठलीच मराठी मालिका पहात नाही, पण चुकुन कधीतरी एखादा भाग पाहिला, तर कलाकारांचे उच्चार किती सदोष असू शकतात, ते ही खटकते.

वर्तमानपत्रातील इंग्रजी मिश्रीत धेडगुजरी मराठी भाषा वाचली की, ते ही अयोग्यच वाटते.

मराठी भाषेत भेसळ करणाऱ्यांत इंग्रजी माध्यमातून शिकलेली मुले आणि त्यांचे इंग्रजाळलेले मराठी बोलून लाड करणारे पालक आघाडीवर आहेत.
कित्येक बायका आपल्या मुलांना अर्ध इंग्रजी अर्ध मराठी बोलत असतात, शिकवत असतात. अशी मुले काय कप्पाळ शुद्ध मराठी बोलतील!
उदा: बेटा, say नमस्ते
Do आ ( तोंड उघड)

ता.क.: असे बोलणाऱ्या लोकांचा आणि आरक्षणाचा काही संबंध नाही. Wink

>>कित्येक बायका आपल्या मुलांना अर्ध इंग्रजी अर्ध मराठी बोलत असतात,

हे एकतर असे पाहिजे:
कित्येक बायका आपल्या "मुलांशी" अर्ध इंग्रजी अर्ध मराठी बोलत असतात
किंवा असे पाहिजे:
कित्येक बायका आपल्या मुलांना अर्ध इंग्रजी अर्ध मराठी "शिकवत" असतात

बाकी असो!

व्यक्ती सापेक्ष हा शब्द पुण्यात नाहीये.
पुण्यात सगळे स्वतःला भाषारक्षक म्हणवुन घेणारे रहातात. त्यांची भाषा हीच प्रमाण भाषा. चुकला एखादा की आले शिकवायला. बरं ते शिकवण / एखाद्याची चुक दुरुस्त करणं पण असं की त्याचा मिनिमम इन्सल्ट तरी झालाच पाहिजे. त्याची अक्कल निघालीच पाहिजे.
येताजाता समोरच्याचा पाण उतारा करणारे, स्वतःला जरा जास्तच (नसले तरी) शहाणे समजणारे, फक्त स्वतःलाच देशाची, धर्माची आण भाषेची काळजी आहे असा गोड गैरसमज असणारे रहातात.

हा माझा समज इथेच आंतरजालावरच्या वावरावरुन झालाय. पुणेरी पाट्या आणि इथे माबोवर पाट्या टाकणार्यांमुळे. कारण मी पुणं पाहिलंय ते फक्त सहलीला गेले होते तेव्हा शिवनेरी फक्त. आणि माझ्या माबोवरच्या पुणेकरांशी येतो तेवढाच काय तो पुणेकरांशी संबंध. माझ्या नात्यात, मित्रपरिवारात कुणीही पुणेकर नाहीये.

>>> आता तुम्ही इतकं म्हणताच आहात, म्हणून म्हणतो. वरच्याच प्रतिसादात तुम्ही 'वांङमय', 'वांङ्मय' अशा दोन प्रकारे एकदा जोडाक्षररहित आणि एकदा जोडाक्षर वापरून हा शब्द लिहिला आहे. त्यातला कोणता बरोबर, हे तुम्हालाही ठाऊक नाही. कारण ते दोन्ही चुकीचे आहेत. 'वाङ्मय' असा तो शब्द आहे. तुम्हीही तुमच्या व्याख्येनुसार मातृभाषेची विटंबनाच करता आहात. फक्त स्वतः ती करून दुसर्‍याने केली म्हणून बोंब मारायचा तुमचा स्वभाव आहे, एवढेच. <<<< Lol
>>>> संकृत, गारगोटि, येवुन, वांङमय, त्यातिल, हिंस्रक, तालसुर, मिडियामधिल <<<<

हातभर पोस्टीमधुन, देवनागरी टाईप करतानाची एक चुक, किंवा र्‍हस्वदीर्घाच्या चुका तितक्याच तेव्हड्या काकदृष्टीने शोधुन त्यावरुन "विटंबना" करीत असल्याचा नि:ष्कर्ष काढण्याची तुमची "क्षमता" वादातीत आहे. Proud

महाशय, वाङ्मय या शब्दा ऐवजी मी "लिटरेचर" वा तत्सम परकीय शब्द वापरला अस्ता तर ती विटंबना झाली असती.
स्वभाषेबद्दलचे माझे अज्ञान वा रोमन सव्विस अक्षरे वापरुन इथे देवनागरी अक्षरे उमटविणे यातिल चुका या तत्काळ "मराठीची" विटंबना कशी काय ठरू शकतात, हे एक कांगावबहाद्दर/कांगावखोर "लालेलोकच" सांगु शकतील ! Wink

>>>> फक्त स्वतः ती करून दुसर्‍याने केली म्हणून बोंब मारायचा तुमचा स्वभाव आहे, एवढेच <<<
माझ्या स्वभावाचे जाऊ द्याहो, इथे मूळ मुद्दा धागाकर्त्याने मांडलाय, तर त्यालाही "बोंब मारतोय" असेच म्हणणार का? का त्याच्या मुद्यात तथ्य आहे असे मानुन चर्चा करणार?

महाशय, वाङ्मय या शब्दा ऐवजी मी "लिटरेचर" वा तत्सम परकीय शब्द वापरला अस्ता तर ती विटंबना झाली असती.
स्वभाषेबद्दलचे माझे अज्ञान वा रोमन सव्विस अक्षरे वापरुन इथे देवनागरी अक्षरे उमटविणे यातिल चुका या तत्काळ "मराठीची" विटंबना कशी काय ठरू शकतात, हे एक कांगावबहाद्दर/कांगावखोर "लालेलोकच" सांगु शकतील ! Wink >> इतरांना कांगावखोर म्हणण्याचा अजून कांगावा. Lol चालू दे, चालू दे. तुमचे ते स्वभाषेबद्दलचे अज्ञान, बाकीच्यांचा तो भाषेविरुद्धचा कट. Lol स्वतःच्या पोस्टी वाचत चला.

उगाच कोणाचे शब्द प्रमाणित नाहीत म्हणुन त्याला अशुद्ध म्हणने मुर्खपणाचे ठरेल. >>> असे २% मुर्ख भरलेले आहे. त्यांना "अंदमानात" टाकायची गरज आहे

Laal salaam limbu!!! Mi manuwadi aahe he tumhala mahit nahi watate. Lol

मिडियामधिल्/वृत्तपत्रिय तसेच मालिकांच्या भाषेबद्दल आक्षेप नोंदविणारा चर्चा होते आहे.
त्यास पुरक म्हणून अजुन एक विषय येतोय "नकटीच्या लग्नाला" या मालिकेत, तो म्हणजे मध्यमवर्गिय पांढरपेशा घरात "दारू पिऊन झिंगत बोलणारे" व्यक्तिमत्व सर्रास दाखवले जाते आहे, व एकप्रकारे मालिकेद्वारे त्याचे सार्वत्रिकीकरण करुन अशा प्रकारे दारु पिऊन झिंगुन भर बैठकीत पाहुण्यांसोबत बोलणे, या बाबीचे "हॅमरिंग" करुन दारु पिऊन झिंगण्याला प्रतिष्ठाच मिळवुन दिली जाते आहे. हे आक्षेपार्ह आहे. किमान झी कडून ही अपेक्षा नव्हति.
माझ्या आजवरच्या आयुष्यात केवळ अन केवळ असे एक व्यक्तिमत्व बघितले आहे, पण ते देखिल पिऊन झाल्यावर "बैठकीत" वगैरे नसायचे, गपगुमान आतल्या खोलित जाऊन पडायचे, नाही पडले, तर त्याची बायको पोरे त्याला आत डांबायची.
आजही, कोणत्या मध्यमवर्गीय पांढरपेशा देशपांडे आडनावाच्या देशस्थी ब्राह्मण घरांमध्ये "झिंगुन गप्पा मारत बसलेले" ते देखिल वरा कडच्या मंडळींबरोबर , असे बघायला मिळतात? हे असले भिकार काल्पनिक "कल्चर" रुजवावयाचा प्रयत्न झी चा कोणता डायरेक्टर का करतो आहे?

भाषेतल्या परकीय शब्दांबद्दल इतकी आग्रही मतं मांडताना स्वभाषेतल्या लेखननियमांकडेही प्रत्येकानं लक्ष द्यावं, असं वाटतं. Happy

http://www.maayboli.com/node/12152

कित्येक बायका आपल्या मुलांना अर्ध इंग्रजी अर्ध मराठी बोलत असतात,
>>>>

ओनली बायकाच? पुरुष का नाही?
जसे संस्कृती रक्षणाचे सारे ओझे बायकांवरच लादले जाते तसे भाषाशुद्धीकरणाचेही सारे ओझे बायकांच्याच खांद्यावर का?
घटाघटा दारू पिऊन पटापटा शिव्या देणारे पुरुष भाषेची जास्त वाट लावतात असे नाही का वाटत?
प्रत्येक साध्या साध्या शब्दाला घाणेरडे डबल मिनींगचे शब्द बनवून ठेवले आहेत की भिती वाटते हल्ली मराठी बोलायला. कोणत्या शब्दाचा काय अर्थ काढून खुसफुस करतात हे त्यांनाच ठाऊक. पण तितकीच त्यांची मराठी समज आणि तेवढ्यापुरतेच मराठी भाषाप्रेम.
सरसकटीकरण करतेय असे समजू नका. पण बायकांपेक्षा पुरुषांमध्ये हे प्रमाण जास्त किंबहुना खूप जास्त असते एवढे मात्र नक्की.

अगदी चुक हे समीकरण, पटल नाही सपना ....भाषाशुद्धी अस प्रकार नसतो हो.... तुम्हाला प्रमाण शब्द अस म्हनायच आहे का? >>>
कसं आहे मोरप्ण्खिज
प्रमान काय आनि भाशाषुद्धी काय, आग्रह धरनारे आनि वीकास करु पाहनारे महाराश्ट्रात संख्य किति आहे ? मराठि जीवन्त ठेवनारे कश्टकरि आहेत असे आपले ते हे एकदा म्हनाले होते. साधन एकीकरन सभारंबाचे खुरचीमाणव हो..
ते नाहि का जेवायला मिळत तिथे
तुमच्य इतर शन्काण्णा हळुहळु उत्तर देते.

दिल हिंदी आहे
दोस्ती सुद्धा हिंदी आहे.
दुनियादारी हा धागाकर्ते यांच्यामते मराठी शब्द होता. (माझ्यामते तो देखील मूळचा अमराठी आहे)
आता त्यालाही काढत पुर्णच नाव हिंदी केल्याने त्यावर आक्षेप आहे.
अर्धे हिंदी अर्धे मराठी होते तेव्हा थोडाथोडका का होईना आपला हक्क मिळत होता,
आता पुर्ण मारला गेला.

दुनियादारी हा शब्द मराठी आहे की अमराठी?
दुनिया हा शब्द बहुतेक हिंदी असावा. मराठीत जग. पाण्याचा नाही, तो बहुतेक ईंग्लिश आहे.
पण दुनिया या शब्दाची फोड करता दुनि आणि या.
बे दुनि चार आणि ईकडे या, हे मराठी शब्द झाले.
तसेच दारी म्हणजे आले कोण माझ्या दारी? हा शब्द देखील मराठी झाला.
तरी दुनियादारीला हिंदीत ढकलायचा ठराव सर्वानुमते पास झालाच तर त्याला पर्यायी मराठी शब्द कोणता? जगरहाटी चालेल का?
पण जर दुनियादारी खरेच मराठी शब्द नसेल तर त्या नावाचा मराठी चित्रपट आला तेव्हाच त्यावर आक्षेप घ्यायला हवे होते. पण आपण काय केले, तर त्याला एवढे हिट केले की दुनियादारी हा शब्द मराठीच वाटू लागला. पण एक मिनिट थांबा. दुनियादारी हा चित्रपट एका दुनियादारी नावाच्याच मराठी पुस्तकावरून आला आहे ना? म्हणजे हा शब्द मराठी साहित्यातीलच आहे.

कसं आहे मोरप्ण्खिज
प्रमान काय आनि भाशाषुद्धी काय, आग्रह धरनारे आनि वीकास करु पाहनारे महाराश्ट्रात संख्य किति आहे ? मराठि जीवन्त ठेवनारे कश्टकरि आहेत असे आपले ते हे एकदा म्हनाले होते. साधन एकीकरन सभारंबाचे खुरचीमाणव हो..
ते नाहि का जेवायला मिळत तिथे
तुमच्य इतर शन्काण्णा हळुहळु उत्तर देते.>>> स्वप्ना, मस्तच. त्यान्च्याच भाषेत उत्तर दिलस.

दुनियादारी हा शब्द मराठी आहे की अमराठी?
दुनिया हा शब्द बहुतेक हिंदी असावा. मराठीत जग. पाण्याचा नाही, तो बहुतेक ईंग्लिश आहे.
पण दुनिया या शब्दाची फोड करता दुनि आणि या.
बे दुनि चार आणि ईकडे या, हे मराठी शब्द झाले.
तसेच दारी म्हणजे आले कोण माझ्या दारी? हा शब्द देखील मराठी झाला.
तरी दुनियादारीला हिंदीत ढकलायचा ठराव सर्वानुमते पास झालाच तर त्याला पर्यायी मराठी शब्द कोणता? जगरहाटी चालेल का?
पण जर दुनियादारी खरेच मराठी शब्द नसेल तर त्या नावाचा मराठी चित्रपट आला तेव्हाच त्यावर आक्षेप घ्यायला हवे होते. पण आपण काय केले, तर त्याला एवढे हिट केले की दुनियादारी हा शब्द मराठीच वाटू लागला. पण एक मिनिट थांबा. दुनियादारी हा चित्रपट एका दुनियादारी नावाच्याच मराठी पुस्तकावरून आला आहे ना? म्हणजे हा शब्द मराठी साहित्यातीलच आहे.>>> मला वाटलच, अशी भन्नाट प्रतिक्रिया तुझ्याशिवाय आणखी कोण देणार म्हणा.

भाषेबद्दल इथे अनेकदा चर्चा झाली आहे. काही उपयोग होत नाही. लोक अजूनहि असे हिंदी इंग्रजी मिश्रित मराठीच बोलतात.

कारण असे की हिंदू राज्यात राज्य करण्याच्या ज्या पद्धति होत्या त्या परकीयांनी बदलल्या, आणि त्यांना खूष ठेवून पोट भरायचे तर त्यांचीच भाषा, शब्द पाहिजेत. हे सर्व मराठी लोकांनी आपणहून स्वीकारले.
तसेहि खुद्द श्री. छत्रपति शिवाजीमहाराजांच्या हिंदू स्वराज्यात किंवा पेशवाई अंमलात (कोब्रा ब्राह्मणांचेच राज्य, ) सुद्धा कुणि म्हंटले नाही की आता हे परकीय शब्द काढून टाका मराठीत बोला. किंवा जनतेनेहि म्हंटले नाही की चला आता आपण आपल्या भाषेतलेच शब्द वापरू.
मग काय होणार?
अजूनहि निर्विवाद पणे मान्य होत नाही की इतर भाषेतले शब्द काढून टाकून शुद्ध मराठी भाषा बोलण्यात, लिहिण्यात असावी.
मायबोली चालू करणार्‍यांनी एक महान काम केले - मायबोली काढली जिथे मराठी बोलणारे लिहीणारे जगभरातील लोक एकत्र यावे नि मराठी वाचावे, लिहावे. तर इथेहि हट्टाने इतर भाषेत लिहायचे नि कारणे सांगायची की विचार महत्वाचे भाषा नाही! असले लोक जिथे आहेत तिथे काय घेऊन बसलात भाषेची शुद्धता?

सपना...
तुम्हि दिलेला प्रतिसाद समजला नाही, त्याचा काही वेगळा संदर्भ असेल तर क्षमा असावी.. पण मला त्या वादामध्ये पडायचे नाही....
माझा प्रतीसाद हा फक्त तुम्हाला नाही तर एकुणच भाषाशुध्दी या संदर्भत आहे...

Pages